प्रत्येकाची सकाळची सुरूवातही चहाबरोबर होत असते. प्रत्येक व्यक्तीला चहाशिवाय अजिबात जमत नाही. चहा पिणे हे जणू काही भारतीयांचे सकाळचे एक महत्त्वाचे कामच आहे असे समजा. अनेक लोकांना तर चहाची भयंकर अशी तलप देखील जडलेली असते. चहा हा आपल्या शरीरासाठी किती घातक असतो हे माहिती असूनही लोक चहा पीत असतात.
आम्ही तुम्हाला आजच्या या लेखात चहा पिण्याचे नुकसान सांगणार नाही तर, असे काही पदार्थ सांगणार आहोत जे तुम्ही चहा बरोबर कधीही चुकूनही पिले नाही पाहिजे. जर कधी चहा बरोबर हे काही पदार्थ पिलात तर यामुळे तुम्हाला भरपूर असे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच जाणून घेणे हे तुमच्या साठी खूपच गरजेचे आहे. अनेक लोक फक्त चहा पित नाही तर चहा बरोबर काही ना काही पदार्थ खातच असतात. परंतु आपण कधीही चहाबरोबर बेसन पिठापासून बनवलेले पदार्थ खाल्ले नाही पाहिजे.
अशा प्रकारचे पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्याच्या काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. हेल्थ एक्सपर्ट्स असे सांगतात की, चहा बरोबर बेसना द्वारे बनवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता भासत असते ते तसेच पचनास संबंधीच्या समस्या देखील उत्पन्न होत असतात. असे देखील सांगितले जाते की चहाबरोबर कधीही कच्चा पदार्थांचे सेवन करू नये यामुळे पोटाचे नुकसान होत असते.
म्हणजेच याबरोबर सलाद, अंकुरलेली मटकी, असे काही पदार्थ खाऊ नये. तसेच उकडलेले अंडे देखील चहाबरोबर कधीही खाल्ले नाही पाहिजे. चहा पिल्यानंतर लगेच कुठलेही थंड गोष्टीचे सेवन करू नये. असे करणे खूपच हानिकारक असल्याचे सांगितले जाते. अनेक लोक चहा पिल्यानंतर लगेच पाणी पीत असतात परंतु असे देखील आपण केले नाही पाहिजे. कारण अशाप्रकारे चहा पिल्यानंतर पाणी पिल्यास याचा प्रभाव पचन तंत्रावर पडत असतो.
यामुळे पोटा संबंधीच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की ऍसिडिटी होणे, पोटात गॅस होणे अशा काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तुम्हाला जर पाणी प्यायचे असेल तर तुम्ही चहा पिण्याच्या आगोदर पाणी पिऊ शकता परंतु चहा पिल्यानंतर पाणी कधीही पिऊ नये. चहा पिल्यानंतर लगेच अशा पदार्थांचे सेवन करू नये ज्यामध्ये हळदीचा वापर केला गेलेला असेल.
कमी प्रमाणात हळदीचा वापर केलेले पदार्थ खाऊ शकता परंतु जास्त प्रमाणात जर एखाद्या पदार्थात हळदीचा वापर केलेला असेल तर असे पदार्थ चहा पिल्यानंतर कधीही खाल्ले नाही पाहिजे. कारण हळदीमध्ये असलेले रासायनिक तत्त्व पोटामध्ये रासायनिक क्रिया करत असतात त्यामुळे पचन तंत्र खराब होण्याची शक्यता असते. तर हे काही पदार्थ आहे जे तुम्ही चहा बरोबर चुकूनही खाऊ नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.