आपल्यापैकी काही जणांना कधी ना कधी साप चावला असेल आणि साप चावल्यानंतर जी भीती वाटते ती अनेक जणांनी इथे अनुभवली असेल. तर अनेकांना साप दिसल्यानंतर आपले काय होते हे तर माहीतच असेल म्हणजे साप हा एक असा सरपटणारा प्राणी आहे त्याच्या पासून सर्वांनाच भीती वाटते कारण कोणता साप कधी आणि कसा चावेल हे सांगता येत नाही किंवा कोणता साप जास्त विषारी असू शकतो, हेही आपल्याला सांगता येणार नाही.
त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत, साप चावल्यानंतर किंवा साप दिसल्यावर काय केले पाहिजे आणि चावल्यानंतर आपल्याला नेमके काय केले पाहिजे त्याबद्दल. त्यासाठी सर्वप्रथम जर तुम्ही कोणत्याही जंगलामध्ये किंवा कुठेही पिकनिकसाठी जात असाल तर अशी जागा निवडा जी जागा मोकळी असेल आजूबाजूला रान नसेल. कारण जेव्हा आजूबाजूला रान असते आणि आपण तिथे जाऊन बसतो तर त्या जागेवर साप असण्याची शक्यता असू शकते.
कारण रान हे त्यांच्यासाठी फायदेशीर असते. रान त्यांना सूर्यकिरणांपासून दूर ठेवते आणि सावली देते त्यामुळे ते जंगलामध्ये आणि राना मध्ये जास्त सापडतात म्हणून जर तुम्ही पिकनिक साठी जागा निवडत असाल तर मोकळी जागा निवडावी. त्याचबरोबर जर समोर साप असेल तर आपल्याला थोडावेळ तसेच हालचाल न करता तिथे थांबायचे आहे. आणि आपल्याला विचार करायचे आहे की इथून आपण गपचुप कसे निघू शकतो आणि जर तुम्ही साप दिसला म्हणून धडपडून धावण्याचा प्रयत्न कराल तर साप तुम्हाला चाऊ शकतो.
कारण त्याला असे वाटते की तुम्ही आता त्याला काहीतरी हानी पोचणार आहात. त्यामुळे एक तर तिथे हळुवार पावलांनी तिथून निघून जाणे हे योग्य असेल किंवा तुम्ही जर धावत असाल तर सरळ न धावता क्रिस क्रॉस पद्धतीने धावणे योग्य असते. कारण साप वेडावाकडा जास्त वेळ पळू शकत नाही त्यामुळे वेड्यावाकड्या पद्धतीने धावणे हे कधीही चांगले. त्यानंतर आजकाल अनेक लोकांना सोलो ट्रीप खूप वेड लागले आहे.
आपल्यापैकी अनेक जण सोलो ट्रिप साठी जातात तर सोलो ट्रीप ही जास्त प्रमाणात धोकादायक ठरू शकते कारण आपण सोलो ट्रीपसाठी जंगला मध्ये किंवा माऊंटन स्वत: जात असतो आणि जंगलामध्ये सर्वात जास्त धोका असतो तो सापांपासून म्हणजे इतर प्राणी देखील असतात पण आपण जिथे टेन्ट लावणार आहोत किंवा पण जिथे राहणार आहोत तिथे सापांपासून आपल्याला धोका असू शकतो.
त्यामुळे अशा ट्रिप वर जाताना कमीत कमीत अजून एका माणसाला आपल्या सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे कारण जेव्हा तुम्हाला असा कोणता तरी साप दंश होईल तेव्हा तुमच्या सोबत असणारा व्यक्ती त्या सापाचा फोटो काढेल किंवा तुम्हाला कोणत्यातरी प्रकारची मदत नक्की करेल. कारण अनेकदा आपल्या हातावर किंवा पायावर कुठेही साप चावल्यावर तिथली त्वचा सुजते आणि त्वचा सुजल्यामुळे तिथे कोणत्या सापाने चावा घेतला आहे.
हे देखील कळत नाही अशा वेळी डॉक्टरांना नक्की कोणते उपचार करायचे याचा अंदाज येत नाही पण जर तुमच्या सहकार्याने त्याचा फोटो काढला असेल तर डॉक्टरांना कळून येते की कोणता साप चावला आहे आणि आता आपल्याला कोणता उपचार करायचा आहे. त्यानंतर जेव्हा ही आपण जंगलामध्ये जातो ट्रेकिंग ला जातो तेव्हा आपल्याला फुल जीन्स आणि शूज घलने गरजेचे आहे.
कारण जर आपल्याला साप चावला देखील तरी तो आपल्या त्वचेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि आपल्याला त्याच्यात चाव्यातून सुटता येते. जर आपल्याला एखादा साप चावला असेल तर ते कसे कळेल तर ज्या जागी आपल्याला साप चावला आहे तिथली त्वचा सर्वप्रथम सुज जायला लागेल आणि त्यानंतर उलटी व्हायला सुरुवात होईल. डोळ्यासमोर पूर्ण अंधार व्हायला लागेल.
अशा परिस्थितीत जर तुम्हाला साप चावला असेल तर शरीराची जास्त हालचाल करू नये त्यामुळे आपला ब्लडप्रेशर हाय होतो. सापाने चावलेले जे आपल्या शरीरात गेलेले जे विश आहे ते लवकरात लवकर शरीरामध्ये पसरते त्यामुळे जर साप चावला असेल तर शांत आणि स्थिर एका जागेवर रहावे आणि शक्य असल्यास जो साप आपल्याला चावला आहे त्याचे वर्णन करता येईल तेवढे त्या सापाला आपल्याला बघून ठेवायचे आहे.
साप चावल्यानंतर उपाय ही लांदा आपल्याला कोणत्याही जवळपास असलेल्या सरकारी हॉस्पिटल मध्ये जायचे आहे कारण साप चावल्यावर देणारे इंजेक्शन हे जास्त प्रमाणात सरकारी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असते त्यामुळे जर तुम्हाला सापाचा चेहरा किंवा सापाची रूपरेखा लक्षात असेल तर त्यावरून इंजेक्शन द्यायला सोपे जाते त्यामुळे चेहरा आणि रूपरेखा लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
त्यानंतर आपल्याला अनेकदा चित्रपटांमध्ये दाखविले जाते की ज्या ठिकाणी साप चावला आहे त्या ठिकाणी आपण तोंडाने ते विष काढून फेकू शकतो तर असे करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होईल. यामुळे ज्यांना साप चावला आहे आणि जो साप चावलेले विष काढत आहे या दोघांना देखील इजा होऊ शकते सोबतच साप चावल्यानंतर ज्याला साप चावला आहे त्याला पाहणे व्यतिरिक्त डॉक्टरला विचारल्याशिवाय म्हणजेच डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आपल्याला पाण्यात व्यतिरिक्त काहीही द्यायचे नाही आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन देखील होऊ शकते.
सोबतच आज ज्या ठिकाणी साप चावला आहे त्या ठिकाणी चाकू च्या मदतीने कोणताही कट मारू नये यामुळे देखील शरीरामध्ये इन्फेक्शन वाढवू शकतो सोबतच आपल्याला हाडांमधील अंगठी घड्याळ अशा गोष्टी काढून ठेवायचे आहेत म्हणजे रक्तप्रवाह होत राहील. तर साप चावल्यानंतर या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.