नुसता भात भात करणारे हे पण वाचा.! जास्त भात खाल्ल्यानं काय झालं आता तुम्हीच बघा.!

आरोग्य

मित्रांनो, भात खाणे हे अनेक लोकांना आवडत असते भात खाणे तसे काय चुकीचं नाही पण सगळ कसं प्रमाणात असायला हवं नाही का.? नाहीतर आपल्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो.! आपल्यातील बऱ्याच जणांना दररोजच्या जेवणामध्ये भात लागतोच. कारण मित्रांनो भात खाल्ल्याशिवाय आपल्यातील अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही. मित्रांनो भात खाणे तसे सर्वांनाच पसंत असते आणि सर्व लोक तो खूपच आवडीने खातात.

परंतु तुम्हाला माहीत आहे का, हाच तांदूळ तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवू शकतो. ज्याबद्दल तुम्ही कधी विचारच केला नसेल. नेहमीच लोक भाताचे सेवन हे छान स्वादिष्ट अशा पक्वानांच्या बरोबर करतात आणि त्याचप्रमाणे जेवणाच्या ताटात जर भात नसेल, तर जेवण अपूर्ण वाटते. पण जर जेवणात भात असेल तर मात्र असे वाटते, की छान आता पोट नक्की भरणार. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला कदाचित माहीत असेल की तांदूळ दोन प्रकारचे असतात.

एक पांढरा आणि दूसरा पिवळ्या रंगाचा असतो ज्याला ब्राऊन राइस असे म्हणतात. मित्रांनो पांढरा तांदूळ शरीरास नुकसानकारक असतो. पांढर्‍या तांदुळावरचे टरफल काढून टाकले जाते. ज्याला साधारण भाषेत पॉलिश तांदूळ म्हणतात. त्याच्या उलट, पिवळ्या तांदुळावरील टरफल काढले जात नाही. कारण याला प्रथम हलके शिजवले जाते, ज्यामुळे त्याचे टरफल कडक होते. आणि मित्रांनो पॉलिश केलेला भात लवकर शिजतो.

हे वाचा:   ऑक्सीजन ची लेवल बॅलन्स मध्ये ठेवण्यासाठी एवढे काम करा, हा एकच उपाय पुरेसा आहे.!

लवकर तसा पचतोही परंतु लवकर पोट भरले तरी रिकामेही लवकरच होते. तसेच त्यामुळे आपली पचनशक्ती कमजोर बनते. त्यामुळे पचनसंस्थेवर असा परिणाम होतो की, तिला कमी वेळात पटापट अन्न पचवण्याची सवय लागते जी शरीराला अतिशय घातक असते. तसेच जर भात सोडून इतर पचनास जड पदार्थ खाल्लात तर त्याचे पचन होत नाही याउलट पोटाचे विकार वाढतात. सफेद तांदुळात विटामीन सी ची मात्रा अजिबात नसते.

ज्यामुळे हाडे कमजोर होऊ शकतात. मधुमेह झालेल्या लोकांसाठी भात नुकसान करणारा आहे आणि त्यामुळे अशा लोकांनी भाताचे सेवन करू नये. अस्थमा झालेल्या लोकांनी भात खाऊ नये. त्याचबरोबर मित्रांनो भातात ग्लुकोजची मात्रा खूप असते. त्यामुळे मधुमेही लोकांनी याचे सेवन करू नये. अस्थमाच्या लोकांना पण भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो आणि म्हणून अश्या रुग्णांनी भातापासून दूर राहावे.

तुमच्या पोटात अल्सर ची समस्या असेल तर शिळा भात उपयुक्त ठरतो. त्यासाठी आठवड्यातून तीन वेळा शिळा भात खाणे गरजेचे आहे. यामुळे लवकर आराम मिळतो. पांढऱ्या भाताला पर्यायही आहे तो म्हणजे ब्राऊन भात. तो जास्त आरोग्यदायी असतो. मित्रांनो ब्राऊन भातामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. ब्राऊन भातामुळे त्वचा मुलायम राहते. तांदळाची पेजही शरीरासाठी चांगली असते. भात मुळीच खाऊ नका असे नाही त्याचे प्रमाण कमी करा.

हे वाचा:   कितीही कुरळे केस असू द्या या उपायाने मऊ मुलायम केस बनतील.! फक्त दहा रुपयात बनवा केस लांसडक मऊ आणि मुलायम.!

जर जास्त खात असाल तर तितका भरपूर व्यायाम करा. तसेच जेवणामध्ये सर्वप्रथम ज्वारीचा समावेश करा. कोणताही आजार होणार नाही आणि त्यानंतर गहू, मक्का यांचा समावेश करा. नाचणीचाही समावेश करा. शेवटी भाताचा पर्याय ठेवा. रोजच्या जेवणात पांढऱ्या भाताचं प्रमाण कमी करून ब्राऊन भात खा आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण जो आपल्या आहारामध्ये दररोजचा पांढरा भात वापरतो त्यामुळे आपल्याला अनेक समस्या उद्भवू शकतात.

म्हणूनच मित्रांनो आपल्या आहारामध्ये आपण पांढरा भात कमी प्रमाणात वापरायचा आहे किंवा जर शक्य असेल तर पांढरा भात वापरणे आपल्याला बंदच करायचे आहे. त्या ऐवजी आपण ब्राऊन भात खायला सुरुवात करायची आहे म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. असं डॉक्टरांचे म्हणणं आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.