आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या लहान मोठ्या समस्या निर्माण होतच असतात. यापैकीच एक आहे उचकी लागणे. उचकी लागणे ही समस्या जरी सामान्य असली तरी कधी कधी ही व्यक्तीला हैराण करुन सोडत असते. यामुळे अनेकदा भयंकर असा त्रास शरीरात सहन करावा लागत असतो.
अशावेळी आपण वेगवेगळे उपाय करून बघत असतो. उचकी लागल्यानंतर आपण भरपूर पाणी पीत असतो. पाणी पिणे हा त्यावर अत्यंत उपयुक्त व सर्वप्रथम केला जाणारा उपाय आहे. हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. परंतु अनेक वेळा पाणी पिल्यावर देखील उचकी थांबली जात नाही.
अशा वेळी मग करायचे तरी काय? परंतु चिंता करण्याची काही गरज नाही. आम्ही तुम्हाला उचकी लागल्यानंतर काय करायला हवे यासाठी एक नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने उचकी लागणे कायमचे बंद होऊन जाईल. हा उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल.
चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा नैसर्गिक उपाय व कशाप्रकारे करायचा आहे हा नैसर्गिक उपाय. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे ती साखर. साखर ही सहजपणे कोणाच्याही घरांमध्ये उपलब्ध असते. साखरेच्या उपयोगाने आपण सहजपणे उचकी थांबवू शकतो.
जेव्हा पण तुम्हाला उचकी लागली जाईल तेव्हा चमचाभर साखर घेऊन आपल्या तोंडात ठेवावी व याला दाताने चावायचे नाही केवळ यातून याचा रस ओढत राहायचा. जेव्हा तोंडात टाकलेली साखर ही पूर्णपणे संपेल तेव्हा कपभर पाणी प्यायचे आहे. असे केल्याने अगदी काही सेकंदातच उचकी लागणे थांबून जाईल.
हा उपाय तुम्ही सहजपणे घरी करू शकता.जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.