कधीही घसा बंद पडला, खूप सर्दी झाली, ताप आला तर हे एका मिनिटांचे काम करायला विसरू नका.! ना गोळी ना औषध झटपट बरे होईल कोणतेही दुखणे.!

आरोग्य

मित्रांनो आता पावसाळा ऋतू चालू आहे. पावसाळ्यामध्ये जसे प्रसन्न वाटते, वातावरण छान व सुंदर वाटते तसेच आपल्याला पावसामुळे व थंड वातावरणामुळे सर्दी होण्याची शक्यता असते व खोकला देखील होतो. कधी कधी आपल्या घशाला इन्फेक्शन सुद्धा होते. जर तुमचा घसा खवखवत असेल, जर तुम्हाला असे वाटत असेल की सर्दी खोकल्यामुळे घसा जाम झाला आहे तर हा उपाय एकदा नक्की करून पहा.

फक्त एक दोन वस्तूंचा वापर करूनच हा उपाय तयार करायचा आहे आणि त्या वस्तू देखील आपल्याला आपल्या घरी उपलब्ध असतील. पहिल्या वापरानंतरच तुम्हाला बरं वाटू लागेल. मित्रांनो या उपायासाठी आपल्याला सर्वप्रथम लसूण घ्यायची आहे. घशाच्या उपायासाठी लसूण एक रामबाण उपाय आहे. कधी कधी खोकल्यामुळे असे वाटते की गळ्यामध्ये काहीतरी अटकले आहे किंवा कफ जमा झाला आहे.

हे वाचा:   सोन्याहूनही मौल्यवान आहे ही एक वनस्पती, जिथे दिसेल तिथून घेऊन या.!

भरपूर वेळ खोकला लागल्यामुळे हे असे होते. एका वेळेसाठी मध्यम आकाराच्या लसणीच्या चार पाकळ्या घ्यायच्या आहेत. जर लसूण जाडी असेल तर आपल्याला तीनच पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या सोलून त्यांना एका वाटीत घेऊन नीट ठेचून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे एका बाजूला पाणी गरम करायला ठेवून द्यायचे आहे. लसूण ठेचून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे गरम केलेले पाणी टाकायचे आहे.

गरम पाण्यामुळे लसणीचा जेवढा रस असेल तेवढा त्या पाण्यामध्ये मिसळून जाईल. मिश्रण आता एका ग्लास मध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास भरेल एवढे गरम पाणी टाकायचे आहे. आता हे दहा मिनिटांसाठी असेच ठेवून द्यायचे आहे जोपर्यंत पाणी साधारण थंड होत नाही. पाणी जास्त थंड होऊ द्यायचं नाही साधारण आपल्याला तोंडामध्ये घेऊन गुळण्या करता येतील एवढेच पाणी थंड होऊ द्यायचे आहे.

हे वाचा:   आवडीने तूप खाणारे.! तुपाचे शरीरात काय होते माहिती आहे का.? तूप शरीरात जाऊन नेमके काय करते.? तुपाचे पचन क्रिया समजून घ्या.!

यामध्ये दोन ते तीन चिमटीभर मीठ मिसळायचे आहे. हे पाणी गाळून घ्यायचे आहे आणि एकदा तोंडात घेतलेल्या पाण्याने पाच मिनिटापर्यंत या पाण्याने गुळण्या करायच्या आहेत. आपण जर हे लहान मुलांसाठी तयार करत असाल तर याचे लसणीचे व पाणी दोन्हीचे प्रमाण कमी करायचे आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.