रोज सकाळी उठल्यावर चुटकीभर हे चूर्ण खा, पोटाची चरबी पूर्णपणे कमी होऊन जाईल.!

आरोग्य

अनेकजण पोट कमी करण्यासाठी अनेक उपाय करताना आपल्याला दिसून येतात. खरं पाहिले तर पोटावरची चरबी ठराविक वेळेतच जास्त वेगाने कमी करता येते. एक म्हणजे जेव्हा आपण व्यायाम करत असतो तेव्हा आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण झोपतो तेव्हा. चकित झालात ना?

पण जर आपण झोपण्यापूर्वी कमी प्रमाणात जेवला असाल किंवा चरबी कमी करणारे उपाय करत असाल तर झोपेत सुद्धा पोट कमी होते. ज्या व्यक्ती झोपण्यापूर्वी दोन ते तीन तास आधी जेवतात अशा व्यक्तींवर वजन कमी करणाऱ्या उपायांचा कमी वेळेत परिणाम दिसून येतो.

अशाप्रकारेच कोणताही सामान्य व्यक्ती रोज ८०० ग्राम ते १ किलो वजन कमी करू शकतो तेही फक्त झोपताना कोणतेही व्यायाम न करता. आज आपण जाणून घेउयात, पोटाचा घेर कमी करण्याचा हा एकदम सोपा आणि घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता असा उपाय.

हे वाचा:   वर्षानवर्षं गजकर्ण अंगावर ठेवणाऱ्यांनो आता हा उपाय करा आणि गजकर्ण कायमचे घालवा, त्वचाविकार वर सर्वात प्रभावशाली उपाय.!

यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आपण बघुयात. बडीशेप, हळद, अलशी, जिरे, मीठ, हिंग, सैंधव मीठ, हरड पावडर, त्रिफळा चूर्ण, कडीपत्ता पावडर इत्यादी. यामध्ये बडीशेप, अलशी, जिरे हे थोडे गरम करून घ्या पण ते जास्त भाजू नयेत. जर हे साहित्य जास्त भाजले तर त्यास कडवटपणा येतो आणि यातील पोषक तत्वे नष्ट होतात.

हे भाजून घेतल्यानंतर त्याची पूड करून घ्या आणि त्यात हळद, मीठ, सैंधव मीठ, त्रिफळा चूर्ण, हिंग, हरड पावडर आणि कडीपत्ता पावडर एकत्र करा. कडीपत्ता पावडर तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. थोडा ओला कडीपत्ता घेऊन तो उन्हात वाळवा. आणि त्याची पूड करून घ्या.

हे मिश्रण एकत्र करून एका बंद बरणीत भरून ठेवा. हे चूर्ण रात्री जेवल्यानंतर एक चमचा साध्या पाण्यासोबत घ्यावे. जर आपणास लवकर परिणाम पाहिजे असेल तर हे दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे. हे चूर्ण घेतल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.

हे वाचा:   पोटातली घाण दोनच दिवसात होईल एकदम साफ.! याच कारणामुळे अनेक लोकांना रोगाचा करावा लागतो सामना.! आयुष्यभरासाठी यामुळे होतात रोग.!

शिवाय त्यांना बद्धकोष्ठता आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे चूर्ण उपयोगी ठरते. कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो. शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते. या चूर्णाचा उपयोग तुम्ही नियमित देखील करू शकता. पण हे करताना बाहेरचे पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा. जास्त बाहेरचे पदार्थ खाऊ नका.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *