आपले आरोग्य हे आपल्यासाठी एखाद्या संपत्ती प्रमाणे आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या मोठ्या चुका करत असतो. याचा असर हा पूर्णपणे आपल्या शरीरावर आरोग्यावर दिसून येत असतो. चुका म्हणजे आरोग्य संबंधीच्या चुका जसे की खाण्यामध्ये चुकीचे पदार्थ येणे, तसेच काही गोष्टींची काळजी न घेणे.
कमी होणारे आयुर्मान आणि सध्याची जीवनशैली पाहता, अन्नपदार्थाबाबत गंभीर होणे आवश्यक झाले आहे. तुम्हाला माहित आहे का की बाजारात महाग किंमतीत विकला जाणारा पिझ्झा तुमचे वय कमी करत आहे. एका अभ्यासानुसार, पिझ्झाचा एक तुकडा खाल्ल्याने व्यक्तीचे आयुष्य सुमारे 7-8 मिनिटे कमी होऊ शकते.
ऐकण्यास विचित्र वाटत असले तरी हे सत्य आहे. मिशिगन विद्यापीठातील तज्ञांनी कार्बन फुटप्रिंट्स आणि पोषण आधारावर काही खाद्यपदार्थांची गणना केली आहे. द टेलीग्राफ मधील एका अहवालानुसार, बदाम खाल्ल्याने तुमच्या आयुष्याच्या खात्यात 26 मिनिटे अधिकची भर पडू शकते.
अहवालात असेही म्हटले आहे की पीनट बटर आणि जाम सँडविच खाल्ल्याने व्यक्तीचे आयुष्य अर्ध्या तासापेक्षा जास्त वाढू शकते. त्याचबरोबर पिझ्झासह बेकन आणि बर्गरसारख्या गोष्टी मानवी आयुष्य कमी करण्यासाठी काम करत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पिझ्झा खाल्ल्याने माणसाचे आयुष्य सुमारे 10 मिनिटे कमी होत असते किंवा संपत असते.
नेचर फूड जर्नलमध्ये प्रकाशित झालेला हा अभ्यास निरोगी आयुष्यावर आधारित आहे. शास्त्रज्ञांनी सुमारे 6,000 प्रकरणांमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, नाश्ता आणि पेये यांचे थेट परिणाम मोजले आहेत. अभ्यासाच्या लेखकांनी लिहिले, ‘आम्हाला आढळले की अमेरिकेत प्रति ग्रॅम प्रक्रिया केलेले मांस वापरणाऱ्या लोकांचे सरासरी वय 0.45 मिनिटांनी कमी होत आहे.
अशा प्रकारचे भयंकर परिणाम हे शरीरावर दिसून येत असतात त्यामुळे आपण आपले आरोग्य वाचवणे गरजेचे आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.