तुम्हालाही जर असेल या सवयी तर पुढे चालून तुम्हीच कराल तुमच्या आरोग्याचे मोठे नुकसान.!

आरोग्य

आज कालच्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी देखील वेळ नसतो. अशा वेळी जर चुकीच्या सवयी असतील तर यामुळे आरोग्य हे पूर्णपणे बिघडले जाऊ शकते. चुकीच्या सवयींमुळे आपल्याला अनेक भयंकर अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही सवयी सांगणार आहोत ज्या सवयी तुम्ही आजच सोडून द्यायला हव्या.

अ’ल्कोहोलचे जास्त सेवन करणे: डॉक्टरांच्या मते अ’ल्कोहोल हा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे शरीरातच नाहीतर मनाचेही म्हणजेच मानसिक आरोग्यावर देखील याचा परिणाम होत असतो. यामुळे केवळ शरीरच नाही तर लिव्हर किडनी हृदय यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना धोका पोहोचण्याची शक्यता असते. जर तुम्हीही अ’ल्को’होलचे सेवन करत असाल तर आजच सोडून द्या. तुम्हाला भविष्यात पश्चाताप करावा लागणार नाही.

खूपच जास्त प्रमाणात पेन किलर खाणे: अनेक लोकांना काहीही झाले की लगेच पेनकिलर खाणे किंवा एखाद्या मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या औषधांचे सेवन करणे ही सवय असते. परंतु यामुळे तात्पुरते आजार बरे होतात पण याचा सर्व परिणाम हा शरीरावर दिसून येत असतो. यामुळे डिप्रेशन सारखी समस्या निर्माण होऊ शकते. त्या बरोबरच चिडचिडेपणा देखील वाढला जाऊ शकतो.

हे वाचा:   जाणून घ्या का तुळशीच्या पानांचे सेवन दाताने चावून करू नये, तुळशीचे पाने खायचे तरी कसे.?

वेळेवर झोप घेणे: आज-काल वेळेवर झोप घेणे हे काम क्वचितच काही लोक करत असतील. आजकालची तरुण पिढी ही मोबाईलच्या आहारी गेली आहे. अनेक लोक रात्रभर टीव्ही बघत असतात. वीकेंड असेल तर संपूर्ण रात्र ही मौजमजा करण्यात घालवली जाते. टीव्ही पार्टी मोबाईल इत्यादी मजा केली जाते यामुळे रात्रीचे जागरण हे वाढले जाऊ लागले आहे.

जास्त जागरण करणे हे आरोग्यासाठी अतिशय घातक मानले जाते. अनेक लोकांना तर उशिरापर्यंत जगण्याची सवय असते. अशावेळी झोप देखील कमी होत असते. यामुळे संपूर्ण दिवस हा चिडचिडा जात असतो. यामुळे डिप्रेशन देखील वाढले जात असते व ब्लड प्रेशरची समस्या देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशी सवय असेल तर ती सवय आजच सोडून द्यावी.

हे वाचा:   मनका दुखी आणि कंबरदुखी पासून त्रस्त झाला का? आता करा याचा परमनंट इलाज.!

तर मित्रांनो या काही सवयी आहेत ज्या तुम्ही आज सोडून द्यायला हव्यात. तुम्ही यातली कोणती सवय आजपासून सोडणार आहात हे कमेंट मध्ये नक्की लिहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *