पांढरे झालेले दाढी आणि मिशाचे केस बनतील जबरदस्त काळे कुळकुळीत.! एकदा करून बघा चेहरा खुलून जाईल.!

आरोग्य

आज काल अनेकांचे खूप कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आणि यामागे अनेक कारणे आहेत. अशी काही कारणे आहेत जसे की अनुवंशिकता किंवा व्यसन हे तसं तर अनेक आजारांना कारणीभूत असतं. याचा आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. पण केस पांढरे होण्यामागचं हे ही मोठं कारण आहे. आपल्या शरिरात मेलानिन हा रंगद्रव्य असतो,जो केसाचा रंग काळा ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो.

शरिरात जेव्हा मेलानिन कोशिकांची निर्मिती होणे बंद होते तेव्हा केसाचा रंग बदलतो. त्यामुळे कमी वयातही केस पांढरे होतात.अनेक दिवसांपासून आजारी असल्यास केस पांढरे होण्याची शक्यता असते. कारण या वेळेत आपण मोठ्या प्रमाणात औषधाचे सेवन करतो. त्याचा परिणाम केसांच्या रंगावर होतो. म्हणजेच आपण आजारी असलो तरी देखील आपले केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर आहार हा शरिरातील प्रत्य़ेक गोष्टीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

आपण कशा प्रकारचा आहार घेतो यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. आहारात जीवनसत्व-बी, प्रथिने, कॉपर आणि आयोडीन यासारख्या घटकांच्या कमतरतेमुळेही केस पांढरे होतात. सोबतच केसाची निगा न राखणे हे देखील केस पांढरे होण्यामागचं मोठं कारण आहे. प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे केसांची निगा राखणं गरजेचं झालं आहे. याशिवाय ताण-तणाव, शरिरात कॉपरची कमतरता, हे देखील केस लवकर पांढरे होण्यामागची कारणे आहेत.

हे वाचा:   तांब्या-पितळेची भांडी...सोन्या सारखे चमकवा.! जास्तीची मेहनत करणे बंद करा आणि या सोप्या ट्रिक्स वापरा.!

ज्याप्रमाणे आपले केस पांढरे होतात त्याप्रमाणे आपली दाढी देखील पांढरी होत असते, आता ही दाढी पांढरी असलेली परत काळीभोर करण्यासाठी आपण एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. तर या पिकलेल्या दाढीचे म्हणजेच पांढरे झालेल्या दाढीला परत कसे काळेभोर करायचे यासाठी घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे ते आता आपण जाणून घेऊया.

सर्वप्रथम आपल्याला इथे घ्यायचे आहे ते म्हणजे एलोवेरा जेल. जर तुमच्या घरी एलोवेरा चे झाड असेल तर तुम्ही नैसर्गिक एलोवेरा जेल देखील वापरू शकता पण जर नसेल तर तुम्ही बाहेर बाजारामध्ये उपलब्ध असलेले देखील वापरू शकतो. त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला एक चमचा कोरफड जेल घ्यायचे आहे. एलोवेरा म्हणजेच कोरफड हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते यामध्ये अनेक औषधी गुणधर्मांचा सामावेश असतो.

कोरफड मध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2′, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. आणि म्हणूनच आपल्याला इथे कोरफड म्हणजेच एलोवेरा जेल चा वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बाजारात उपलब्ध असणारे कोणतेही डोक्याला थंडावा देणारे तेल घ्यायचे आहे.

हे वाचा:   चमकदार दात हवे असतील तर रात्रीच्या वेळी करा हे १ काम; दात मोत्यासारखे चमकतील.!

ते देखील एक चमचा टाकायचे आहे हे तेल तुम्ही कोणत्याही ब्रँडचे वापरू शकता. आणि तेल एलोवेरा जेल एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. शेवटी आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये वापरायची आहे ती म्हणजे काळे तीळ. हे काळे तीळ बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि ती देखील एक चमचा यामध्ये टाकून परत एकदा हे मिश्रण तयार करायचे आहे.

हे मिश्रण तयार झाल्यावर आता हे आपण आपल्या पांढरा झालेल्या दाढीवर लावायचे आहे जेणेकरून आपले पांढरे झालेले केस लवकर काळे होतील याच्या एकदा एका वापरामध्ये आपल्याला चांगला रिझल्ट दिसून येईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.