पुरुष असो किंवा स्त्री केसांमुळे प्रत्येकाच्या सौंदर्याला शोभा असते. ते सुद्धा घनदाट, काळेभोर आणि निरोगी असणे सुद्धा महत्त्वाचं असत. आताच्या धावपळीच्या जगात आपण केसांकडे लक्ष देत नाही आणि लक्ष दिलेच तर खूप महागडे उपाय करत राहतो. यामुळे तात्पुरते केस ठीक राहतात आणि नंतर त्यांना सतत जपावे लागते.
आज आपण असाच एक रामबाण उपाय बघणार आहोत. कदाचित तुम्ही सुद्धा हा उपाय केला असेल. फार पूर्वीपासून हा उपाय अनेक लोक करतात आणि याचे औषधी गुणधर्म देखील आहेत. ते म्हणजे जास्वंद. जास्वंदाच्या झाडाचा खूप उपयोग जुन्या काळात केला जात असे. लाल जास्वंद जास्त लोकप्रिय आहे. रंग: जास्वंदाची फुले लाल, पिवळी आणि पांढरी, गुलाबी, केशरी, मिश्र रंगांची अशी विविध रंगांची असतात.
भारतात हजारो वर्षांपासून जास्वंदाचा अनेक पूजा विधींमध्ये, आयुर्वेद, रंगकाम अशा अनेक गोष्टींमध्ये वापर करण्यात येतो. जास्वंदाच्या फुलापासून उदबत्त्या, सेंट, सौंदर्य प्रसाधने, तसेच तेल तयार करतात. पूर्वी या पानाचा उपयोग जखमेवर लावण्यासाठी केला जायचा, यामुळे जखम लवकर बरी व्हायची.
तसेच याची पाने स्वच्छ धुवून वाटून घ्यावीत आणि याचा अर्क केसांना लावावा, यामुळे केसांचे आरोग्य नीट राहते. जास्वंदाची लाल रंगाची फुले घेऊन ती खोबरेल तेलात उकळून घ्यावीत आणि हे तेल गाळून बंद बाटलीत भरून ठेवावे. या तेलाचा वापर केल्यास केसांची वाढ होते तसेच केस काळेभोर होतात.
टक्कल पडली असल्यास जास्वंदीच्या फुलांचा रस खोबरेल तेलात मिसळून दररोज डोक्यावर लावावे या मुळे नवीन केस उगणे सुरू होईल. जर जास्त वय नसेल आणि केस पांढरे होत असतील तर या तेलाचा नक्की वापर करावा. खरं तर, हे तेल केसांना पोषण देते आणि डोक्यातील रक्त परिसंचरण सुधारते.
याशिवाय तेल मालिश त्वचेतील सेबम उत्पादन नियंत्रित करते, केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो. यामुळे केस अकाली पांढरे कमी होणे कमी होते, तसेच केस कोरडे होणे आणि खाज येणे यासारख्या समस्याही दूर होतात. म्हणूनच जास्वंद आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. याचा कोणताही वाईट परिणाम आपल्या केसांवर दिसून येणार नाही. मग हा उपाय तुम्ही नक्की करून बघा.
या वनस्पतीला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्की लिहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.