आवडीने मॅगी खाणारे, मॅगी कशी बनते ते पण बघा.!मॅगी खाऊन शरीराचे नुकसान तर होत नाहीये ना.?

आरोग्य

मॅगी ही आपल्या सर्वांचीच आवडती आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मॅगी खायला सगळ्यांनाच आवडते. कोणताही ऋतू असो, काहीही आपल्याला चटपटीत खावेसे वाटले, चवदार खावेसे वाटले तर आपल्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे मॅगी. मॅगी लवकर बनवून तयार होते त्या बरोबर ती स्वादिष्ट देखील लागते त्यामुळे आपल्यापैकी अनेक जणांना मॅगी आवडते. मॅगीच्या उत्कृष्ट जाहिरातींमुळे मॅगी हा ‘टॉप-ऑफ-माइंड’ ब्रँड बनला आहे.

ने’स्लेचा ब्रँड असल्याने ‘मॅगी’कडे उत्पादनांमध्ये सातत्याने वैविध्य आणणे शक्य होत आहे. आपल्या उत्पादनांची चव ग्राहकांच्या जिभेवर रुळवण्यात ‘मॅगी’ यशस्वी ठरली आहे. ‘मॅगी’ची इन्स्टंट नूडल्स व्यतिरिक्त सूप, सॉस आणि इतर उत्पादनही लोकप्रिय ठरली आहेत. मॅगी आवडत जरी असली तरीही मॅगी कोणत्या गोष्टीने बनवली जाते किंवा ती कशाप्रकारे बनवली जाते हे आपल्यापैकी अनेक जणांना माहीत नसेल तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत की मॅगी ही कशी बनविली जाते.

कोठे बनविले जाते आणि कशाच्या मदतीने मॅगी बनविली जाते चला तर मग जाणून घेऊया. मॅगी मैदा पाणी आणि पीठ याचे मिश्रण असते त्यानंतर या मिश्रणाला एका मोठ्या पात्रांमध्ये ठेवून मळले जाते. एका गोष्टीची बारकाईने काळजी घेतली जाते ती म्हणजे की चुकूनही पीठ ओले झाले नाही पाहिजे. त्यानंतर या पिठाला मोठा लाटण्याच्या खाली लाटले जाते त्यामुळे या पिठाचे मोठ-मोठ्या झिग झाक शीट मध्ये रुपांतर होते.

हे वाचा:   सात दिवसात सात किलो वजन कमी, लोण्यासारखी चरबी वितळेल.!

त्यानंतर या झिकझाक शीट ला मोठमोठ्या कटर द्वारे पुढे पुढे पाठविले जाते ज्यामुळे त्याचे रूपांतर नूडल्सच्या शेप मध्ये तयार होते. त्यानंतर पुढे एका वेगळ्या मशीन मध्ये टाकून या नूडल्सचा शीट ला एका छोट्या छोट्या भागांमध्ये कापले जाते आणि त्यांना पॅकेट्स मध्ये पॅक करून आपल्या घरापर्यंत पोहोचविले जाते. मॅगी मध्ये अजिनोमोटो चे प्रमाण असते. परंतु जास्त प्रमाणात एमएसजीचे किंवा साध्या भाषेत आपण ज्याला अजिनोमोटो म्हणतो त्याचे सेवन केल्यास शरीरावर गंभीर परिणाम होतात.

जास्त प्रमाणात एमएसजी शरीरात गेल्यास त्याने डोकेदुखी, मळमळ, अति प्रमाणात घाम येणे, छातीत दुखणे, तसेच चेहेऱ्याची आग होणे, मानेला व इतर ठिकाणी मुंग्या आल्याची भावना होणे असा त्रास होतो. त्यामुळे जर प्रमाणात मॅगी खाल्ली तर ती आपल्या शरीराला काही हानी पोचवू शकत नाही पण जर.

हे वाचा:   हे एक पान करेल चमत्कार, सर्दी, खोकला, ताप, छातीतला कफ चुटकीसरशी गायब.!

कोणत्याही गोष्टीचे सेवन आपल्याला प्रमाणातच करायचे आहे जास्त खाल्ल्यास त्याचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात आणि भविष्यात शरीरावर हानी देखील होऊ शकतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.