या भूतलावर भरपूर वनस्पती आहेत त्यापैकी बऱ्याच या वनस्पती ह्या औषधी वनस्पती आहे. म्हणजे या वनस्पतीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एका अशा वनस्पती बद्दल माहिती देणार आहोत. या वनस्पतीचे पाने आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले जातात. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहे ही वनस्पती.
अशी अनेक वनस्पतीचे पाने आहेत जी औषधी गुणांनी समृद्ध आहेत. यामध्ये कडुलिंब, तुळस, बाभूळ इत्यादीचे पाने आहे. ही सर्व पाने अनेक रोगांवर घरगुती उपचार म्हणून वापरली जातात. हिरड्यांच्या समस्येपासून ते त्वचा रोग आणि केस गळण्यापर्यंत, ही पाने औषधांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे. चला तर मग जाणून घेऊया या पानांच्या काही फायद्यांविषयी.
कडूलिंबाचे पाने: तसे तर, आरोग्याच्या दृष्टीने कडुलिंबाची पाने प्रत्येक प्रकारे फायदेशीर आहेत. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कडूनिंबाच्या पानांचे सेवन केले तर तुम्ही कधीही त्वचेच्या आजारांना बळी पडू शकत नाही. याशिवाय कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून डोके धुवून केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळते. असे अनेक फायदे हे कडू लिंबाच्या पानाचे आहे.
तुळशीचे पाने: तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यामध्ये खूप आराम मिळतो. जर तुम्ही रोज सकाळी तुळशीच्या पानांचा चहा घेत असाल किंवा नियमितपणे तुळशीची पाने खाल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, कारण तुळशीच्या पानांच्या सेवनाने तुम्ही अनेक आजारांना बळी पडण्यापासून वाचू शकता.
बाभूळ चे पाने: अनेक ठिकाणी शेतावर किंवा मैदानी भागावर बाभूळ ही वनस्पती आढळून येत असते. याचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. बाभळीची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. बाभळीची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या करा दात याने हिरड्या मजबूत होतात.
बोरीचे पाने: बोरीचे पाने अनेक समस्यांमध्ये खूप फायदेशीर आहेत. ही पाने केस गळण्याच्या समस्येपासून आपल्याला मुक्त करत असतात. बारीचे आणि कडुलिंबाची पाने बारीक करून घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिसळून केसांवर लावा, हे केस मजबूत करते आणि केस गळण्याच्या समस्येपासून आराम देते.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.