कधी जळाले तर ह्या चुका चुकूनही करू नका, खूप महागात पडेल या चुका.!

आरोग्य

मित्रांनो, जळल्यानंतर चुकून सुद्धा करू नका या चुका .. घडणाऱ्या घटनांना कोणीही टाळू शकत नाही हे आपल्याला माहीतच आहे. खरंच, कोणाला काहीही व्हायचं असेल तर ते कस पण होऊ शकते अगदी त्या व्यक्तीने कितीही काळजी घेतली तरीही..! गडबडीत बऱ्याच जणांना काही दुर्घटनांचा सामोरे जावे लागते आणि त्यापैकीच एक दुर्घटना आहे जळणे /भाजणे.

बऱ्याचदा असं दिसून येतं की माणसाला जळण्याच्या त्रासा पेक्षाही जास्त त्रास होतो त्या जळालेल्या भाग चुकीच्या पद्धतीने हाताळला गेल्याचा. खुपदा अनुभव येतो की, जळाल्यानंतर अशा व्यक्ती पुढे येतात ज्यांना ती जखम कशी हाताळायची हे माहीत नसते आणि आपल्या मनाला येईल तसे ते करतात. यात नेमकी ती चूक करतात जी जळाल्या नंतर अजिबात करायला नाही पाहिजे.

तुम्ही मात्र अजिबात काळजी करू नका. आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की,जळल्यानंतर सर्वप्रथम आपण काय केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत? आम्ही तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो की, जेव्हा कोणी व्यक्ती जळत असेल तेव्हा सुरुवातीचे दहा ते पंधरा मिनिटं अगदी खूपच क्रिटिकल असतात आणि अगदी त्याच सुमारास त्या व्यक्तीला योग्य ते उपचार मिळाले असता त्या व्यक्तीला कोणताही त्रास होत नाही.

होणाऱ्या वेदना कमी होतात. आज आम्ही तुम्हाला जगमान्य असलेल्या काही पद्धतींविषयी सांगणार आहोत. जेणेकरून आपण आपल्या स्वतःची किंवा आपल्या जवळच्या जळणाऱ्या व्यक्तीची जखम ही लवकरात लवकर ठीक करू शकता, तेही कुठल्याही प्रकारचे नुकसान न करता. जळल्यानंतर चे उपचार किंवा जखम कशी हाताळावी हे समजण्यापूर्वी आपण जाणून घेऊयात जळण्याच्या स्थितीचे किती प्रकार आहेत?

आणि ते प्रकार आपण कसं ओळखू शकतो जळण्याच्या स्थितीचे एकूण चार स्तर आहेत. पहिला स्तर : ही एक जळण्याची कॉमन प्रकारची स्थिती आहे. ज्याच्याशी आपला सामना दैनंदिन जीवनात अनेकदा होतो. या प्रकारच्या जळण्यामध्ये आपल्या त्वचेचा वरचा भाग ज्याला आपण एपिडर्मिस(Epidermis) म्हणतो, त्याचे नुकसान होते. दुसरा स्तर : ही थोडी मोठी प्रकारची जळण्याची स्थिती आहे ज्यामध्ये आपल्या त्वचेचा दुसरा स्तर ज्याला आपण डर्मिस (Dermis) म्हणतो त्याचे नुकसान होते.

हे वाचा:   कानात जर कधी गेलीच किडा किंवा मुंगी तर झटपट करा हा एक उपाय, क्षणात किडा, मुंगी बाहेर पडेल.!

तिथे आपला रक्तपुरवठा, घामाच्या पेशी आणि नसांचा शेवट असा काहीसा भाग असतो. या प्रकारात त्वचेचे खूप मोठे नुकसान होते. तिसरा स्तर : याप्रकारच्या जळण्याच्या स्थितीमध्ये खूप गुंतागुंत असते. कारण या प्रकाराच्या जळण्यामध्ये जखम ही खूप आतवर जाऊन त्वचेच्या टिशू ला डॅमेज करते. या प्रकारात मात्र डॉक्टरांकडे जाऊन सर्जरी करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही.

चौथा स्तर:हा सर्वात भयानक प्रकारचा अपघात होय. जर तुम्ही चौथ्या प्रकारच्या जळाल्याने ग्रस्त असाल तर हे खूप घातक आहे कारण याचा सरळ परिणाम हा हाड,पेशी यांच्यावर होतो. जास्त करुन हा अपघात इलेक्ट्रिकल शॉक मुळे झालेला बघायला मिळतो. आता प्रश्न येतो तो सगळ्या प्रकारच्या काळजी नंतर देखील ही असे अपघात झाले असता काय करावे? किंवा काय करू नये हे आपण पाहणार आहोत.

सर्वप्रथम, मायनर बर्न म्हणजे प्रथम आणि द्वीतीय स्तर या प्रकारातील जळणे. हे दोन इंचापेक्षा ही छोटे असतात. कोणत्याही प्रकारच्या जळल्यानंतर सगळ्यात आधी त्याला हलक्यात घेऊ नका. इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी, नेहमी नॉर्मल टेंपरेचर असलेल्या पाण्यामध्ये आपल्या जळलेल्या भागाला ठेवावे. असे आपल्याला सलग पाच मिनिटे करायचे आहे. लक्षात घ्या हे थंड पाण्याने करू नये.

पाच मिनिटानंतर आपण हा आपल्या शरीराचा भाग कोणत्याही एका सुट्टी सुक्या कपड्याने झाकून ठेवावा. जळालेला भाग पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्या भागावर एखादे मॉइश्चरायझर अथवा कोरफड जेल लावावे. जळालेला भाग प्रेशर किंवा धक्का लागण्यापासून वाचण्यासाठी सुती पट्टीने बांधावा. सूज आणि दुखणं जर जास्त असेल तर Mafenide Acetate / Cinchocaine नावाच्या गोळ्या द्या. या आपल्या घरात नेहमी असल्या पाहिजेत. इन्फेक्शन होऊ नये याची विशेष खबरदारी घ्यावी.

मेजर बर्न झाले असता काय करावे? म्हणजेच तिसऱ्या किंवा चौथ्या स्तरावरचे प्रकारातील जळणे असता काय करावे? या स्थितीमध्ये वेळ न दवडता तुम्हाला डॉक्टरच्या मदतीची आवश्यकता आहे. जेव्हा आपल्याला अशा प्रकारचा स्तरातील जळणे ओळखू आले असता मनानेच कोणतेही उपचार न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सगळ्यात आधी तुम्ही जळालेल्या व्यक्तीला जळणाऱ्या जागेपासून/स्थितीपासून लांब करा.

हे वाचा:   डोक्यावर एकही पांढरा केस दिसणार नाही, केस काळे करणेच विसरून जाल.!

जर तुमच्या स्वतःच्या कपड्याला आग लागली असेल त्यावेळी तुम्ही Stop, Drop and Roll टेक्निकचा वापर करा. जर कोणाला इलेक्ट्रिक बर्न झाला असेल तर तुम्ही त्याला डायरेक्ट हात लावू नका. सगळ्यात आधी सुक्या लाकडाने त्याच्या भोवती असलेल्या इलेक्ट्रिक तारांना दूर करण्याचा प्रयत्न करा. नंतर श्वासोश्वास तपासून तो चालू नसल्यास CPR द्यावे. तुम्ही डायरेक्ट हात लावला असता तुम्हालाही विजेचा झटका बसू शकतो.

जळालेला भाग हा स्वच्छ कपड्याने झाकावा, जेणेकरून त्याला तुम्ही धक्का बसण्यापासून वाचवू शकता.सगळ्यात महत्त्वाचे घ्यायची काळजी म्हणजे कोणत्याही प्रकारचे जळाले असेल तरीही आपण त्यावर बर्फ किंवा थंड पाण्याचा वापर करू नये.असे केले असता त्वचेचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. तिसर्‍या आणि चौथ्या प्रकारच्या स्तरावरील जळण्या मध्ये पाणीच टाकू नये कारण या प्रकारांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता दाट असते.

ती जखम कोरडी ठेवावी. जखमेला वारंवार हात लावू नये फक्त त्याला स्वच्छ कापडाने झाकावे. काहीही झालं तरी जळालेल्या भागावर बटर,तेल,ओईल मेंट याचा वापर अजिबात करू नये. यामुळे इन्फेक्शन तर होईलच परंतु वैद्यकीय इलाजामध्येही अनेक अडचणी येऊ शकतात. आशा आहे तुम्हाला दिलेली प्राथमिक माहिती नक्कीच आवडली असेल. तुमची व तुमच्या प्रिय व्यक्तींची काळजी घ्या.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *