कितीही जुनी गुडघे दुखी असू द्या, या एका उपायाने कायमची जाईल, हा उपाय गुडघे दुखी चा काल आहे.!

आरोग्य

गुडघेदुखी ही आज-कालची सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे. केवळ वयोवृद्ध लोकांतच नाही तर तरुण लोकांमध्ये सुद्धा गुडघेदुखीचे प्रमाण वाढत आहे. याचं कारण आहे शरीरात पोषक तत्वांची कमतरता. याने सांधेदुखी सुरु होते. दुखणं नवं असू दे किंवा जुनं आपण घरी बसल्या हा उपाय करून आपली गुडघे दुखी तुम्ही बरी करू शकता.

कंबरदुखी, गुडघेदुखी,सांधेदुखी, टाचदुखी, मानदुखी अशा प्रकारच्या कुठल्याही दुखण्यावरती हा एक रामबाण उपाय आहे. दुखापतीमुळे दुखणे यावरही तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायासाठी लागणारे सर्व सामग्री ही आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होते. बाजारात अनेक प्रकारचे जेल क्रीम तेल इत्यादी उपलब्ध आहेतच. परंतु या सहजसोप्या उपायांमुळे तुमचे दुखापत दुखनं लवकर बरे होऊन त्वरित आराम मिळतो.

घरी बनवलेले हे तेल शंभर टक्के खात्रीशीर काम करते. तेंव्हा आता पाहुयात या तेलासाठी लागणारी सामग्री आणि तेल कसे बनवायचे त्याची पद्धत.! चार ते पाच पाकळ्या सोललेला लसूण बारीक कापून घ्यावा. सोबत आलं घेऊन त्याचेही बारीक तुकडे करून घ्या. लसणामुळे दुखणं लवकर बरे होते तर आल्यामुळे सूज लवकर कमी होते. खास करून जॉईंट पेन (दोन हाडं जोडली जातात तो शरीराचा भाग )लवकर बरे करण्यासाठी आल्याचा उपयोग होतो.

हे वाचा:   सततचे वाहणारे नाक खूप परेशान करते का.? अशा वेळी झटपट करायचे हे दोन कामे.! कधीही सर्दी झाली की या दोन गोष्टी लक्षात असू द्या.!

एक छोटा तुकडा दालचिनी घेऊन त्याला खलबत्यात ओबड धोबड कुटावे. दालचिनी स्नायू खेचून घेऊन स्नायू दुखी थांबवण्याचे काम करते. यामुळे सांधेदुखी कमी होते. ४-५ फुलं असलेली लवंग घेऊन ती सुद्धा थोडीशी कुटावी. एन्टीसेप्टिक असलेली लवंग फंगस पासून वाचवते तर याच्यातील गुणधर्मांमुळे सूज कमी होण्यास मदत होते. एक चमचा ओवा व एक चमचा मेथी दाणे घ्यावे. मालिश तेलात हे टाकले असता हाडांना बळकटी येते.

हाडं ठीसूळ होण्यापासून रोखली जातात. आता तीळ तेल/मोहरी तेल किंवा एरंडेल तेल एका भांड्यात घ्या. तेल गरम करायला मंद गॅस वर ठेवा.आता हे सर्व घटक एक एक करून त्यात घालायचे आहेत. सर्वप्रथम लसूण, दालचिनी आलं, ओवा, मेथी दाणे सगळ्यात शेवटी लवंग घालून सुमारे पंधरा मिनिटे हे मिश्रण सतत गॅसवर ढवळावे. थंड झाल्यावर बाटलीत हे तेल भरून ठेवावे.

जेव्हा तुम्हाला कुठे दुखत असेल तेव्हा हे तेल रात्री सुमारे कमीतकमी आठ तास शरीराच्या त्या त्या भागावर लावून ठेवावे. हलक्या हाताने मसाज करावा. एखाद्या जुने सुते कापडाने तो भाग हलकाच बांधावा. जेणेकरून तुमचे कपडे चादर खराब होणार नाहीत. सकाळी स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. तुम्हाला त्वरित फरक जाणवेल.

हे वाचा:   भात खाणारे एकदा हे नक्की वाचा.! सकाळ संध्याकाळ जेवणात भात खाता का.? याचे शरीरावर असे परिमाण होऊ शकतात.!

शारीरिक व्यायामाचा अभाव, अनहेल्दी, तेलकट, फास्टफूड बाहेरचे खाणे, सतत एका जागी बसून काम करणे, अनुवंशिकता, शारीरिक हालचाली ची कमतरता, चालण्याचा अभाव या या सगळ्या गोष्टींमुळे उतार वयातच नव्हे तर अगदी तरुणपणातच गुडघेदुखी सुरू झाली आहे. गुडघ्यांना आवश्यक असणारे वंगन मिळत नाही.

त्यामुळे उतारवयात दाढ दुखी गुडघे दुखी यांसारखे दुखणे येणे स्वाभाविकच आहे. परंतु तरुण वयात असे दिसू लागले असता आत्तापासूनच काळजी घेतली आणि व्यायाम केला तर आपले पुढील जीवन निरोगी राहील. तुमची काळजी घ्या. निरोगी रहा. दुखण्याला करा आता गुड बाय..!

टीप : साठवलेले तेल कोमटसर करून लावावे. उत्तम परिणामासाठी त्या तेलात काळी मिरी घालावी (ऐच्छीक) सलग आठवडाभर हा उपाय केल्याने लवकर आराम मिळतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *