गळणाऱ्या केसांवर आठवड्यातून फक्त तीनदा लावावे लागते हे द्रावण.! केस गळतीसाठी सर्वात बेस्ट टेक्निक आहे ही.!

आरोग्य

प्राचीन काळात मानवाच्या शरीरावर प्राण्यांसारखे खूप केस होते. परंतू जस-जसे वातावरण बदलत गेले हे केस गळू लागले. केसांची उत्पत्ती प्रकृतीने सजीवांच्या त्वचेचे रक्षण ऊन, थंडी व पाऊस यांपासून व्हावे म्हणून केले. आता मानवाच्या डोक्यावर केस असतात याचे कारण म्हणजे आपल्या डोक्यात शरीराचा महत्वाचा भाग असतो मेंदू याच्या संरक्षणासाठीच.

परंतू आता डोक्यावरचे केस म्हणजे लोकांना आकर्षित करणारी गोष्ट बनले आहेत. डोक्यावर घनदाट, काळेकुट्ट व चमकदार केस आपल्या सौंदर्याला सुद्धा अजून खुलवून टाकतात. सुंदर लांब-सडक व डौलदार केस असावेत असे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेकांना निसर्गाकडून आकर्षक केसांची देणगी मिळालेली असते. परंतू आपल्या परिसरातील काही लोकांना केसांच्या अनेक समस्यांना सामना करावा लागतो.

काही केस गळतीमुळे तर काही टक्कल पडले आहे म्हणून त्रस्त आहेत. तर काहींचे केस लवकर सफेद होतात तर काहींच्या केसांची चमक गेली आहे. केसांच्या समस्येची दोन मूळ कारणे आहेत ती आधी जाणून घेवूया. सर्व प्रथम आपल्या आजू बाजूला वाढत असणारे प्रदूषण. होय प्रदूषणाच्या प्रभावाने आपले केस निस्तेज होवू लागले आहेत. या सोबतच चुकीच्या खान-पानामुळे देखील आपल्या केसांना वाढ मिळत नाही.

असंतुलित तेलकट-तिखट आहार जर तुम्ही ग्रहण करत असाल तरी ही तुम्हाला केसांच्या समस्येला तोंड द्वावे लागेल. बाजारात आता अनेक उत्पादने उपलब्ध आहेत जी तुमच्या केसांच्या सर्व तक्रारींना गायब करण्याची 100% हमी देतात. परंतू हे सर्व प्रोडक्ट्स अनैसर्गिक पद्धतीने तयार केले गेलेले असतात. अनेक कृत्रिम केमिकल रसायने टाकून यांना बनवले जाते. काही काळासाठी तुम्हाला याचा फायदा जाणवेल मात्र काही वेळाने केस ड्राय होवू लागतील.

हे वाचा:   हे एक फुल आपल्या आयुष्याचे सोने करून टाकेल.! आरोग्यासाठी इतके फायदे आहेत वाचून हैराण व्हाल.! दुसरे अमृतच जणू.!

मात्र आता चिंता सोडा व सुटकेचा निश्वास घ्या. आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्यासाठी केसांच्या सर्व समस्येचा समूळ नाश करणारा एक उपाय घेवून आलो आहोत. हा एक आयुर्वेदीक नैसर्गिक उपाय आहे. आपल्या महान वैद्यांनी या उपाया बाबत आयुर्वेदात लिखित करुन ठेवले आहे. हा एक घरगुती उपाय आहे त्यामुळे हा तुम्ही घरच्या-घरी देखील तयार करु शकता.

सोबतच अगदी सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल असा हा कमी खर्च असणारा रामबाण उपाय आहे. हा नैसर्गिक असल्याने याचा आपल्या शरीराला कोणता ही अपाय होत नाही. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपात. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला आवश्यकता आहे ती म्हणजे कोरफडीच्या रसाची. तुमच्या घरात अथवा शेजारी जर अलोवेरा म्हणजेच कोरफडीचे झाड असल्यास याचा ताजा रस या उपायासाठी घ्यावा.

या उपायासाठी 40 ते 50 मि.ली. कोरफड वनस्पतीचा रस घ्या. कोरफडीचा रस आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत गुणकारी मानला जातो. आता आपला दुसरा घटक आहे आवळा चूर्ण. आवळा चूर्ण तुम्हाला तुमच्या बाजूच्या कोणत्या ही मेडिकल शॉप मध्ये हमखास मिळेल. आवळ्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्व क असते. आपल्या केसांच्या आरोग्यासाठी जीवनसत्व क खूप जास्त फायदेशीर आहे.

हे वाचा:   घसा इन्फेक्शन गायब.! सर्दी खोकला झाला तर पटकन करा हा उपाय.! प्रतिकारशक्ती दुप्पट होईल.! रामबाण उपाय.!

30 ते 40 ग्राम आवळ्याच्या चूर्ण या उपायासाठी घ्या. आता हे दोन्ही घटक एका काचेच्या भांड्यात एकत्र करुन दोन-तीन तासांसाठी ठेवा. याचा वापर रात्री झोपताना करायचा आहे. हे मिश्रण आपल्या केसांना मूळांपासून लावा. आठवड्यातून फक्त दोन वेळा हा उपाय करायचा आहे याची नोंद घ्या. सकाळी कोमट पाण्याने केस धुवून टाका. याच्या वापराने केस गळीत थांबेल व तुमच्या केसांना चांगली वाढ मिळेल.

तुमच्या केसांच्या सर्व समस्या काही दिवसात गायब होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.