कितीही सुकलेली असू द्या तुमची तुळस.! मुळाशी ही एक वस्तू टाका.! तुळस हिरवीगार होऊन डोलू लागेल.! एकदा नक्की करा.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जणांच्या घरांमध्ये त्यापेक्षा सगळ्यांच्याच घरांमध्ये तुळशीचे रोप असते. पण कधी कधी काही कारणास्तव हे तुळशीचे रोप वाढते म्हणजेच सुकून मरून जाते आणि आपण या रोपाला मेले आहे म्हणून फेकून देतो पण आज आपण जाणून घेणार आहोत हेच मेलेले किंवा वाळलेले रोग आपण फक्त सात दिवसांमध्ये परत जिवंत करू शकतो. ते परत हिरवेगार करू शकतो.

चला तर मग जाणून घेऊया यासाठी आपल्याला कोण कोणते उपाय करायचे आहेत, जेणेकरून ते झाड परत एकदा पूर्वीसारखे हिरवेगार दिसायला लागेल. आता हे तुळशीचे रोप पूर्णपणे मेले आहे का? किंवा पूर्णपणे वाढले आहे का हे तपासून घेण्यासाठी आपल्याला त्या रोपाच्या खोडावर नखाने थोडेस खरचटून पाहायचे आहे.

हे केल्यानंतर जर वरची साल निघून आत मध्ये थोडेसे हिरवे दिसत असेल तर ते झाड परत जिवंत होऊ शकते म्हणजेच ते पूर्वीसारखे हिरवेगार होऊ शकते, हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. आता त्यानंतर आपल्याल या तुळशीच्या रोपाच्या वरील सर्व सुकलेल्या फांद्या तोडून घ्यायच्या आहेत आणि तुळशीचे रोप ज्या कुंडीमध्ये लावलेले आहे.

या कुंडी मधील गळून पडलेली पाने किंवा वरील ज्या काही गोष्टी असतील त्या काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण या तुळशीच्या रोपावर ती करणाऱ्या प्रक्रिया करायला आपल्याला सोपे जाईल. सोबतच आपल्याला या कुंडी मधील माती कशाचाही सहाय्याने थोडी वर वर खोदून घ्यायची आहे आणि आता या मातीवर आपल्याला थोडीशी हळद टाकून द्यायची आहे आपण येथे हळदीचा वापर यासाठी करत आहोत.

हे वाचा:   मरेपर्यंत म्हातारपण येणार नाही.! सकाळी तीन पानांचा असा उपयोग केल्याने, हे दहा हजार कायमचे शरीरातून गेले.! डॉक्टर सुद्धा आहेत हैराण.!

कारण हळद अँटीबायोटिक असते आणि कीटकनाशकांना मारण्यासाठी देखील मदत करते त्यामुळे हळदीचा वापर केल्यास त्या माती मध्ये असणारे कीटक मरून जातील आणि ती माती परत एकदा आपल्या रोपासाठी गुणकारी बनेल. हे करून झाल्यावर एका ग्लास मध्ये पाणी घ्यायचे आहे त्यानंतर मोहरीची पेंढ दोन ते तीन तुकडे मोहरीची पेंढ म्हणजेच मस्त केक यामध्ये टाकायचा आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे हळद देखील टाकायचे आहे.

आता या मिश्रणाला आपल्याला कमीत कमीत 12 तास तसेच झाकून ठेवायचे आहे. बारा तासानंतर हे मिश्रण आपल्याला रोप लावलेल्या कुंडी मध्ये रोपाच्या मुळाशी टाकायचे आहे. आपण बाकी कोणत्याही गोष्टी फर्टीलायझर म्हणून वापरायचा नाही आहे. हे एक अगदी गुणकारी फर्टीलायझर आहे जे आपण घरात बनवून घेतलेले आहे त्यामुळे हे अतिशय गुणकारी आणि उपयुक्त आहे.

हा वापर केल्यानंतर किमान सात दिवसांमध्येच आपले रोप परत एकदा हिरवेगार दिसण्यास मदत होईल. या रोपाला हळूहळू नवीन पालवी फुटायला लागेल सोबतच आपल्याला तर रोपाला जास्तीत जास्त पाणी द्यायचे नाही आहे कारण कधीही आपण एखाद्या रोपाला जास्त पाणी देतो तेव्हा देखील ते रोप मरण्याची शक्यता असते. ते रोप जास्त पाणी घेतल्यामुळे कुजून जाऊ शकते त्यामुळे शक्यतो प्रमाणात पाणी द्यायचे आहे.

हे वाचा:   स्वयंपाक घरात करायला हवे हे जुगाड.! फारच कमी महिलांना हे जुगाड माहिती आहे.! झटपट कामे करायची असल्यास नक्की वाचा.!

सोबतच हिवाळ्यामध्ये आपल्याला रोपांची काळजी घेणे गरजेचे असते. जर तुम्हाला रोपे चांगल्या प्रकारे टिकून राहावी असे वाटत असेल तर कधीही रोपांना जास्तीत जास्त होऊन देऊ नये म्हणजेच तुळशी सारखी रोपे ही अत्यंत नाजूक असतात त्यामुळे त्यांना जेवढ्या प्रमाणात ऊन मिळत आहे तेवढ्याच प्रमाणात सावली मिळणे देखील गरजेचे आहे त्यामुळे छोट्या आणि नाजूक रोपांची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे.

आपण कोणत्याही रोपाला जास्तीत जास्त पाणी देणे देखील त्या रोपासाठी हानिकारक ठरू शकते किंवा आपण कोणत्याही रोपावर जास्त प्रमाणात खतांचा वापर केल्यामुळे देखील त्या झाडांवर किंवा रोपांवर वेगळे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीने रोपांना किंवा झाडांना जपणे देखील तेवढेच गरजेचे आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *