मित्रांनो संधिवात आणि शरीरातील सांधेवर येणारी सूज आणि त्यांच्या वेदना गुडघेदुखी यांसारख्या समस्या जर तुम्हाला असतील तर यापेक्षा बेस्ट माहिती तुमच्यासाठी काहीच असू शकत नाही. हा लेख तुमच्यासाठीच! सर्वप्रथम आपण पाहूया आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे दुखणे का येते? वयोमानानुसार शरीरातील हाडं स्नायू मधील लवचिकता कमी होणे, वंगण कमी होणे हे झाल्यामुळे सांधेदुखीची समस्या उद्भवते.
आजकालचे वातावरण, खाण्यापिण्याच्या बिघडलेल्या सवयी, वाढता ताण तणाव, अनियमित झोपण्याच्या सवयी, वी’र्यनाश यामुळे तुमची जीवनशैली बदलून जाते. याचा तुमच्या वयाशी काहीही फरक पडत नाही. ही काही मुख्य कारणं आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ही दुखणी सुरू होतात. आता आपण पाहूयात पाच असे उपाय की ज्याचे सलग एक महिना पालन केल्यास कितीही जुनी गुडघेदुखी सांधेदुखी असल्यास ती चुटकीसरशी मुळापासून बरी होईल.
१)शुद्ध तांब्याच्या भांड्यामधील पाणी रोज प्यावे. अर्धा चमचा हळदी पावडर ( कच्च्या हळदीचे पेस्ट असल्यास उत्तम), अर्धा चमचा निम पावडर हे नियमित (तांब्याच्या भांड्यातील) पाण्यासोबत सेवन केल्याने ७५-८०% दुखणं असच ठीक होईल.
२) आंबट, खूप थंड, विरुद्ध अन्न (जसे फ्रुटसॅलड, मीठ -दूध ), आंबवलेले पदार्थ, सिगारेट, दारू यांसारख्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. एक चमचा अश्वगंधा पावडर एक चमचा शतावरी पावडर याचे रोज सेवन करावे. हाडांना बळकटी देण्याचे काम हे करतात. स्नायूना ग्रीस देतात. शरीराला लवचिकता येते. बाजारात अशा कित्येक प्रकारच्या आयुर्वेदिक कॅप्सूल ही उपलब्ध आहेत.
३) आयुर्वेद सांगत की तुम्ही सकाळी उठून अनवाणी पायाने हिरव्या गवतावर चालत असाल, शरीराला माती सोबत कनेक्ट ठेवत असाल तर ते तुमच्यासाठी खूप चांगले असते. कारण आपल्या शरीर पंचमहाभूतांनी बनलेल आहे. आणि आपल भौतिक शरीर हे मातीपासून बनले आहे. म्हणून दिवसातील कोणत्याही वेळी तुम्हाला जमेल तसे १-२ तास जमिनीवर अनवाणी पायाने चाला.
४) योगासन सूर्यनमस्कार..!संपन्न आरोग्याची चावी आहे योग आसन. सकाळी व संध्याकाळी दररोज सूर्यनमस्कार केल्याने तुमचे गुडघेदुखी सांधेदुखी एका आठवड्यात ९०% बरी होऊन आरोग्य उत्तम राहते. पण बर होतंय म्हणून ते मधूनच सोडून देऊ नका. चांगल्या सवयी अशाच पुढे आचरणात ठेवा.
५) आहारातील लसणाचे सेवन वाढवावे. देशी लसूण मिळाल्यास रोज सकाळी एक पाकळी लसूण कच्चा खावा. सूज येणे दुखणे यावर रामबाण उपाय आहे. सोबतच अक्रोडचे दूध तुम्ही घेऊ शकता. एक दिवसाआड दोन अक्रोड सकाळी पाण्यात भिजवून बारीक पेस्ट बनवून गाईच्या दुधात घालून रात्री प्यावे. आयुर्वेदानुसार रात्री झोपताना दूध पिणे केव्हाही चांगले.
हे सगळे उपाय करत असतानाच तीळ तेल /मोहरी तेल आंघोळ केल्यानंतर हलक्या हाताने दुखणाऱ्या भागावर मसाज करावा. यामुळे तुमच्या सांध्यातील स्नायूतील वंगण परत येण्यास मदत होते. त्या भागातील रक्ताभिसरण सुधारते. अशाप्रकारे तुमचे सांधेदुखी कमी होते. खाण्यापिण्याच्या सवयीवर लक्ष द्या. नॉन व्हेजिटेरियन खाण्याने जाईंट पेन वाढते. हिरव्या पालेभाज्या, फळं, पाणी असलेले अन्न, सॅलड यांचा आहारात आवर्जून समावेश करावा.
तेव्हा आता सांधेदुखीना करा गुडबाय आणि हे माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.