जेनेरिक मेडिकल मधून गोळ्या औषधे खरेदी करणे कितपत योग्य आहे.? जेनरिक आणि ब्रँडेड गोळ्या औषधांमधला फरक माहिती असू द्या.!

आरोग्य

आजार हे काही सांगून येत नसतात. आज-काल प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासले आहे. कुठलाही आजार झाला की यावर एकच पर्याय उपलब्ध असतो तो म्हणजे दवाखान्यात जाणे व डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोळ्या औषधांचे सेवन करणे. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांकडून आपल्याला गोळ्या औषधांची भली मोठी लिस्ट हातात पकडवली जाते.

अशावेळी आपल्या मनामध्ये एक शंका नेहमीच निर्माण होत असते की गोळ्या औषधे नेमके कोठून खरेदी करावे जेनेरिक मधून की ब्रँडेड मेडिकल मधून ब्रँडेड गोळ्या औषधे खरेदी करावेत. चला तर मग आजच्या या लेखाद्वारे आपण याबाबतची सर्व माहिती समजून घेऊया. जेव्हा एखादी कंपनी नवीन औषधांची निर्मिती करते तेव्हा ती कंपनी आपल्या नावाने औषधाचे पेटंट रजिस्टर करत असते.

जेव्हा एखादी कंपनी अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करते तेव्हा त्या कंपनीकडे त्या औषधाचे पूर्णपणे हक्क असतात, त्या जोरावर अनेक अशा काही कंपनी असतात ज्या औषध निर्मिती कंपनी सोबत काम करून त्याचे काही हक्क विकत घेत असतात आणि त्यामध्ये पुढील संशोधन सुद्धा करत असतात. जेव्हा एखाद्या औषधाचे पेटंट संपून जाते तेव्हा ते औषध सार्वजनिक केली जाते म्हणजेच औषधावर कोणत्या संस्थेचा व्यक्तिगत हक्क नसतो.

अशा प्रकारचे औषध कोणतीही संस्था बनवू शकते अशा प्रकारच्या औषधांना जेनेरिक औषधे असे म्हणतात. दरवेळी औषधे ही वेगवेगळी सॉल्ट आणि केमिकल यांचा वापर करून बनवलेले असतात आणि त्यांना नावे दिलेली असतात परंतु जेनेरिक औषधे ही ज्या केमिकल सॉल्ट द्वारे बनलेली असतात त्या नावाने ओळखले जातात. विशिष्ट कंपनीने त्यांना ओळख मिळत नसते. उदाहरणार्थ जसे की पॅरासिटॅमॉल हे एक सॉल्ट केमिकल आहे जे ताप अंगदुखी यासारख्या समस्या यावर उपयुक्त ठरते.

हे वाचा:   घशामध्ये आणि छातीमध्ये साचलेली घाण, कफ मिनिटात बाहेर पडेल.! सर्दी खोकला ज्या कारणामुळे होतो ते कारणच नष्ट होईल.!

जेव्हा एखादी संस्था ही औषधे बनवते तेव्हा त्याचे पेटंट संपलेले असेल तर तेव्हा त्याला पॅरासिटॅमॉल या नावाने ओळखले जाते आणि जेव्हा एखादी संस्था कंपनी हे पॅरासिटॅमॉल बनते तेव्हा ते त्या संस्थेच्या नावाने ओळखले जाते उदाहरणार्थ कोंबिफ्लेम इत्यादी. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सर्दी खोकला यासारख्या सर्वसाधारण समस्यासाठी ज्या काही जेनेरिक औषधे उपलब्ध असतात त्यांची किंमत 50 पैसे पासून ते दीड रुपयांपर्यंत असते.

या समस्यावर ब्रँडेड कंपनी एक रुपयापासून ते पन्नास रुपये एवढे दर आकारत असतात. तसे पाहायला गेले तर जे काही असाधारण आजार आहेत उदाहरणार्थ कॅन्सर सारख्या समस्या यावर ब्रँडेड कंपनी औषध तयार करून पेटंट बनवत असतात आणि मोठ्या किमतीवर बाजारामध्ये विकत असतात आणि ह्याच आजारावर जर जेनेरिक औषधे उपलब्ध झाली तर त्यांची किंमत खूपच कमी होऊन जाईल व या आजारांवर उपचार करणे सुद्धा सोपे होऊ शकते.

त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की जेनेरिक औषधे आणि ब्रॅण्डिंग औषध या दोघांची गुणवत्ता कशा पद्धतीने असते तर आपणास सांगू इच्छितो की जेनेरिक औषधे आणि बंडिंग औषधे त्या दोघांची गुणवत्ता एकसारखेच असते त्यामध्ये कोणताही फरक आपल्याला पाहायला मिळत नाही.

या दोघांच्या गुणवत्तेबद्दल चुकीची आतापर्यंत तरी कोणत्या पुरावे द्वारे ही माहिती समोर आलेली नाही. ब्रँडेड औषधी कंपन्या औषधांच्या निर्मितीसाठी पेटंट प्राप्त करण्यासाठी व त्यांच्या मार्केटिंग व अन्य खर्चासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत असतात परंतु जेनेरिक औषधं ही त्याच्या गुणवत्तेची असली तरी सुद्धा त्याची किंमत सरकारद्वारे नियंत्रण केले जाते आणि किंमत सुद्धा सरकार ठरवत असते अशावेळी सरकारद्वारे योग्य ते उपचार केल्यामुळे न केल्यामुळे जेनेरिक औषधे फारसे काही प्रकाश झोतात येत नाही.

हे वाचा:   आता पोटाच्या चरबी ला गायब व्हावेत लागेल.! केवळ सात दिवसांमध्ये सात किलो चरबी झाली कमी.! ना कुठले डायट ना कुठला व्यायाम, जाणून घ्या कशी.?

अनेक वेळा आपण औषधाच्या तुलनेमध्ये जेनेरिक यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. सर्वसाधारणपणे जेनेरिक औषधे ही प्रधानमंत्री औषधांच्या सेवा केंद्रांमध्ये सहज उपलब्ध होऊन जातात आणि सध्याच्या काळामध्ये भारतामध्ये अनेक ठिकाणी जन औषधी केंद्र उभारण्यात आलेल्या आहेत तेथे कॅन्सर सारख्या असंख्य अशा आजारावर सुद्धा आपल्याला जेनेरिक औषधे सहजरीत्या उपलब्ध होऊन जाते.

या जेनेरिक औषधांची किंमत अतिशय परवडणारी स्वस्त दरामध्ये असते. भारतामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती केली जाते आणि भारत हा असा देश आहे की खूप मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशांना औषध पुरवत असतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.