आयुर्वेदातील या दैवी वनस्पती ला गवत समजून बसू नका, याचे असंख्य फायदे तुम्हाला रोगमुक्त करून टाकेल.!

आरोग्य

मित्रांनो, आयुर्वेदिक जडीबुटी विषयी माहिती शृंखला पुढे नेत आज आपण जाणून घेणार आहोत कुकरौंधा या अनोख्या वनस्पती विषयी… प्रत्येक प्रांतामध्ये या वनस्पतीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. या वनस्पतीची पाने हिरवी आणि फुले पिवळी असतात. आकाराने छोटीशी असते ही वनस्पती. हिंदीत याला – कुकरौंधा, कुकरोदा, जंगली मूली म्हणतात. BLUMEA LACERA इंग्रजीत म्हणतात.

या वनस्पतीमध्ये कडू, पचायला हलक,वीर्यशक्ति – उष्ण, कफपित्त शामक हे गुणधर्म आढळतात. खालील प्रकारच्या समस्यांवर उपाय आहे ही वनस्पती. 1. मुळव्याध : मूळव्याधीच्या समस्येवर ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. या समस्येमध्ये उठण्या बसण्या पासून चालण्या फिरण्या पर्यंत त्रास होतो. शौचास असंख्य वेदना होतात. अनेकदा फिशर ची समस्या देखील होते.यावर कुकरौंधाची पानं लाभदायक आहेत.

या वनस्पतीची पाने दोन ग्लास उकळवून एक चौथांश करून थंड करा. हे सकाळ संध्याकाळ 30-40ml घ्या. लहान मुले असतील तर 10-15ml द्या. 2. पोटासंबंधी तक्रारींवर : बऱ्याचदा लहान मुलांमध्ये पोटामध्ये जंत कृमींचा समस्या आढळतात. अशावेळी वर सांगितल्याप्रमाणे या वनस्पतीच्या पानांचा काढा बनवून सकाळ-संध्याकाळ 30-40 ml घ्यावा. लक्षात ठेवा ताज्या काढ्याचे सेवन करायचे आहे शिरळा काढा सेवन करू नये.

हे वाचा:   आज पासून घरात एकही मच्छर आढळणार नाही.! कारण हा उपाय मच्छरांचा पण बाप आहे.! याच्या सुगंधाने एक पण मच्छर घरात येणार नाही.!

3.खोकला सर्दी ताप व डोकेदुखी : वातावरणातील अचानक बदलामुळे होणारी सर्दी कफ खोकला डोकेदुखी यावर या वनस्पतीचा काढा म्हणजेच संजीवनी होय. या वनस्पतीचा काढा पिल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. ताज्या काढ्याचे सेवन करावे. 4.जखम सूज : या वनस्पतीमध्ये अँटी बॅक्टरियल व anti-inflammatory गुणधर्म असतात. या वनस्पतीची पाने व तुळशीचे पानं सोबत वाटून जखम झालेल्या जागेवर लावल्यास जखम त्वरित भरून निघते.

त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही. या वनस्पतीच्या पानांची पेस्ट सूज आलेल्या जागेवर लावली असता सूज उतरते. ही पेस्ट डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या. 5.तोंड येणे : या वनस्पतीच्या पानांचा काढा बनवून त्याने गुळणा केला असता तोंड येण्याची समस्या कमी होते. या वनस्पतीचे पाने चावून खाऊन ते नंतर लाळ थुंकून द्यावे त्यांनीही तोंड येणे कमी होते.

6. सफेद केसांची समस्या : आज-काल अचानकपणे अकाली केस पिकण्याची समस्या वाढली आहे. यासाठी या वनस्पतीच्या पानांचा काढ्याने केस धुतले असता ही समस्या कमी होते. 7. लिव्हर मध्ये फायदेशीर : काही लोकांमध्ये लिव्हर वाढण्याची समस्या दिसून येते. तर काही लोकांमध्ये दारु पिल्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या आढळते. यामध्येसुद्धा या वनस्पतीच्या पानांचा काढा अत्यंत लाभदायी आहे.

हे वाचा:   एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल इतके सुंदर केस बनतील.! ही जादुई वस्तू आयुष्याची कायमची समस्या नष्ट करणार.! कंटाळा येईपर्यंत केस वाढणार.!

श्वसन संबंधित कोणताही रोग असल्यास नियमितपणे या पानांच्या काढ्याचे सेवन करावे. तुम्हाला आराम मिळेल. ही होती आजच्या अनोखी वनस्पती बद्दल माहिती. आम्हाला आशा आहे तुमच्या ज्ञानात आम्ही भर घालत आहोत. ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि त्यांचेही ज्ञान वाढवा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *