किडलेल्या दातातून किडा झटकन बाहेर पडेल, दाताची ठनक गायब.! दाढ दुखी वर रामबाण इलाज.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा एका फुलाबद्दल माहिती शेअर करणार आहोत जे आपल्या अंगणाची शोभा वाढवतात. सोबतच मंदिरात सुद्धा चौफेर ही फुले लागलेली असतात. देवपूजा ही या फुलांचा वापर होतो. आज आपण या फुलांचे काही औषधी गुणधर्म ही पाहणार आहोत. ते फुल म्हणजेच झेंडू (गेंदा /merry gold)होय.

दसऱ्यानंतर थंडीत या फुलांना बहर येतो. दिसायला सुंदर असलेले हे फूल खूप साऱ्या आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते. फुलां सोबतच या झाडाचे मूळ, खोड,पान यांचाही आयुर्वेदिक औषधांत मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याचे पूर्ण पंचांगचं महत्त्वाचे आहे असेही तुम्ही म्हणू शकता.

झेंडूच्या फुलाचे झाड चटकन लागते. लावायलाही सोपे आणि मोठ्या प्रमाणात याची फुले उगवतात. कमी जागेतही हे झाड आपण लावू शकतो.खास दसऱ्यासाठी झेंडूच्या फुलांची शेती केली जाते. फुलांच्या पाकळ्या सुकवून, मातीत रुजवल्या की पंधरा दिवसातच झेंडूचे झाड उगवायला सुरुवात होते.

आता आपण बघणार आहोत रोगाचे नाव आणि त्यावर झेंडूचे रोप कसे उपयोगी आहे?
मुतखडा/पथरी: ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी ताजा झेंडूची पाने स्वच्छ धुऊन त्याची बारीक पेस्ट करून रस बनवून घ्यावा. आणि तो रस रोज एक-एक चमचा सकाळी-संध्याकाळी सेवन करा. असं केल्याने मुतखडा फुटून निघून जातो. किंवा काढा बनवून सुद्धा तुम्ही सकाळी पिऊ शकता.

हे वाचा:   डेंग्यू चिकनगुनिया सारखा आजार या उपायाने करू शकता बरा, सर्दी, खोकला, ताप असेल किंवा घसा खवखवणे असेल तर एकदा नक्की करून बघा हे उपाय.!

डाग /फोड /व्रण/सूज/चर्मरोग/खाज: वरीलपैकी काहीही झाल्यास, झेंडूचे पाने स्वच्छ होऊन रस बनवून घ्या. व तो संबंधित भागावर लावा. शरीरावर कोठेही भाजण्याची जळण्याची जखम झाली असेल त्यावरही तुम्ही हा रस लावल्यास जखम लवकर भरते. चेहऱ्यावरील मुरमांवर सुद्धा हा रस लावल्याने मुरूमं कमी होऊन त्वचा तजेलदार होते.

शरीरावरील कुठल्याही अवयवाला खूप खाज येत असेल तर झेंडूच्या पानांचा रस लावल्याने खाज थांबते. कान दुखी: कानात पाणी जाणे. पु होणे. ऐकू कमी येणे. खूप मळ साठणे. अशा प्रकारच्या कानांच्या कुठल्याही तक्रारी वरती तीन थेंब झेंडूच्या पानांचा रसाचे टाकल्याने त्या समस्या त्वरित दूर होतात.

दातदुखी: गोड खाल्ल्यामुळे, चहा कॉफी सिगारेट यांचा अतिरेक, दातांची निगा नीट न राखल्यामुळे, अनुवंशिकता किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे आपल्याला दातांच्या समस्या असतील. दात किडे होणे, सडणे, कॅविटी होणे यामुळे असहनीय दात दुखी होते. यावर झेंडूच्या पानांचा रस रामबाण उपाय आहे. वर दिल्या प्रमाणे झेंडूच्या पानांचा रस करून घ्यावा.

कापसाचा छोटा तुकडा या रसात बुडवून दोन दातांमध्ये(जिथे दुखत आहे ) सुमारे दहा मिनिटे धरावा. तुमचे दात दुखी त्वरित थांबेल. झेंडूच्या पानांतील असलेल्या औषधे गुणधर्मांमुळे दात असलेला किडा निघून जाईल. कोमट पाणी करून त्यात झेंडूच्या पानांचा रस टाकावा. आणि अशा पाण्याने गुळण्या कराव्यात. दात दुखी मध्ये हा फायदेशीर उपाय आहे.

हे वाचा:   या दोन पानाने अनेक लोकांची शुगर जागेवर थांबवली आहे.! अनेक लोक या पानाने झाले आहेत बरे.!

तुम्ही डॉक्टर कडे तर नक्कीच जा पण या घरगुती उपचारांचा प्रयोग तुम्ही नक्कीच करा तुम्हाला आराम मिळेल. असे हे बहुगुणी असलेल्या झेंडूच्या पानांचा रस डोळे जळजळणे, डोकं दुखणे यावर सुद्धा गुणकारी आहे. कापसावर झेंडूच्या पानांचा रस घेऊन तो कापूस डोळे बंद करून २० मिनिटे डोळ्यावर ठेवावा. डोळ्यांचे लाल होणे, डोळे जळजळणे हे एकदम शांत होईल.

हा उपाय आयुर्वेदिक असल्याने यानी तुम्हाला कोणतेही नुकसान नाही. आशा आहे हे हर्बल उपचार तुम्हाला नक्की आवडतील आणि अगदी सहज सोपे उपलब्ध होणाऱ्या झेंडूच्या झाडाचा तुम्हाला नक्की फायदा होईल. हे उपाय तुम्ही नक्की करून बघा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *