झोपताना खूपच खोकला येतो आहे का? या गोष्टीचे सेवन करा सर्व खोकला होईल दूर, खोकल्याची ढास कधीच येणार नाही

आरोग्य

बदलत्या वातावरणामुळे व ऋतु बदलामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल करताना दिसत असतात. अशावेळी आपल्याला ऋतू बदलाचा होणारा प्रभाव सहन नाही झाला तर अनेक शारीरिक विकार होण्याची देखील शक्यता असते. अनेकदा काही आंबट पदार्थ खाल्ले किंवा नॉर्मल सर्दी झाली तर आपल्याला खोकला येतच असतो. परंतु काही लोकांना असे देखील होत असते की रात्री झोपताना खोकल्याची ढास लागत असते.

नेहमीच वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, ताप येणे अशा साधारण समस्या होत असतातच. या जरी साधारण समस्या वाढत असल्या तरी यामुळे आपण खूपच त्रस्त होऊन जात असतो. चुकीच्या खान पानांमुळे तसेच आरोग्याची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अशा प्रकारचे हे लहानसहान आजार उद्भवत असतात. आता सध्या उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्याच्या काळामध्ये अनेक लोक थंड पदार्थ खाण्याकडे आकर्षित होत असतात.

हे वाचा:   लिंबू अशाप्रकारे फ्रिज मध्ये ठेवले तर वर्षानुवर्ष लिंबाला काहीच नाही होणार, या चार ट्रिक्स प्रत्येक गृहिणीला माहिती असाव्या.!

कोल्ड्रिंक्स, थंड पदार्थ, सि’गारेट, धु’म्रपान अशा प्रकारच्या सवयीमुळे खोकला खूपच वाढत जात असतो. अनेकदा रात्री देखील खोकल्याची ढास लागत असते म्हणजेच झोपतेवेळी किंवा झोपेमध्ये अनेकदा खोकल्याची ढास येत असते. अशावेळी आपण एक छोटासा उपाय नक्की करायला हवा. हा उपाय करण्यासाठी अत्यंत सोपा असून याचा खूप फायदा आपल्याला होऊ शकतो.

१. मधाचे करा सेवन:
खोकल्यावर खूपच रामबाण आणि अनंत काळापासून चालत आलेले आयुर्वेदिक औषध म्हणजे मध. मधामध्ये खोकल्याला दूर करण्याचे सर्व तत्व सामावलेले असतात. खोकल्यासाठी मध हे औषध पुरेसे आहे. जर झोपेमध्ये खुपच खोकला येत असेल तर झोपण्यापूर्वी एक चमचा मध खाऊन झोपावे. नक्कीच आराम मिळेल.

२. अद्रक
खोकल्या पासून वाचण्यासाठी अद्रक देखील खूपच फायदेशीर ठरत असते. अद्रकामध्ये अँटीबॅक्टरियल गुण असतात त्यामुळे नॉर्मल सर्दी खोकल्यासाठी अद्रक खूपच उपयुक्त ठरत असते. अद्रकाचा थोडासा चहा आपण रोज प्यायला हवा.

हे वाचा:   दातांना मोत्यांप्रमाणे चमकदार बनवा, फक्त करावा लागेल हा छोटासा उपाय.!

३. दूध आणि हळद
खोकल्या चे नाव आले की या दोन्ही पदार्थांचे नाव येतेच. अनंत काळापासून चालत आलेले खोकल्यावरचे हे रामबाण औषध आहे. आयुर्वेदामध्ये खोकल्यावर सर्वात प्रथम क्रमांकावर हेच औषध सांगितले गेले आहे. कधीही खोकला होत असेल तर हळदीचे दूध पिऊन झोपावे नक्कीच आराम मिळेल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *