नमस्कार मित्रांनो, आपण आज एक अशी वनस्पती- एक असे फूल बद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे धार्मिक दृष्टीने खूप जास्त महत्त्व आहे. अति पवित्र असलेले हे फूल लाल रंगाचे असते. आपल्याला समजले असेल जास्वंदीच्या फुलांच्या गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. गणपतीला प्रिय असलेले हे जास्वंदीचे फूल पूजेत तसच आयुर्वेदिक दृष्ट्या ही खूप महत्त्वाचे आहे. याचे झाड घराच्या अंगणात लावणे हे सोपे आहे.
महालक्ष्मी ला अत्यंत प्रिय असलेले हे जास्वंदीच फुल वाहिले आसता माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहते. जास्वंदीच्या फुलांत अनेक प्रकारच्या विविधता पाहायला मिळतात. पांढरा जास्वंद, गुलाबी जास्वंद, नारंगी जास्वंद अनेक प्रकारचे बी हायब्रीड करून वेगवेगळे जास्वंद झाड लावले जातात. दुर्गामातेला हे लाल फुल विशेष प्रिय आहे. जे लोक शारीरिक दृष्ट्या दुर्बळ असतात ते लोक या जास्वंदीचे फुलांची एक पाकळी रोज चावून चावून खातात.
जास्वंदीचे फूल शारीरिक कमजोरी दूर करते. आज काल केस गळती एक मुख्य समस्या झाली आहे. अल्प वयात केस पांढरे होणे याचे प्रमाण वाढले आहे. केसांची वाढ खुंटणे. इत्यादी प्रकारच्या वाढत्या केसांच्या तक्रारींवर हे फूल अत्यंत उपयोगी आहे. ऑलिव्ह ऑइल / तीळ तेल / नारळ तेल या प्रकारचे कोणतेही तुम्ही वापरत असाल ते तेल घ्यायचे आहे.( कोणत्याही प्रकारचे सुगंधित तेल वापरू नये.)
ऑलिव्ह ऑईल आणि नारळाचे तेल समप्रमाणात घेऊन त्यात ३-४ जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून घालाव्यात. हे मिश्रण एका बाटलीत घेऊन तीन ते चार दिवस उन्हात ठेवावे. खूप जास्त प्रमाणात हे तेल एकदमच बनवू नये. हे खूप दिवसापर्यंत टिकत नाही. म्हणून कमी प्रमाणातच बनवावे. दोन ते तीन दिवस उन्हात ठेवल्यानंतर या तेलाने केसांवर व केसांच्या मुळापाशी हलक्या हाताने मालिश करावी.
( Hibiscus oil) जास्वंदीचे तेल केसांसाठी वरदान आहे. आजकाल बाजारात या फुलांना वाळवून त्याची पावडर बनवतात तीही मिळते. या पावडरीचा उपयोग आपण मेहेंदी लावताना कंडिशनर म्हणून करू शकतो. हेअर पॅक बनवताना सुद्धा या पावडरीचा उपयोग करतात. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे जास्वंदीचे पानं ही अत्यंत उपयोगी आहेत. त्वचेचे विकार/ चर्मरोग यात जास्वंदीच्या पानांचा लेपाचा वापर केला जातो.
आपण वर जे जास्वंदीचे तेल कसे बनवतात ते पाहिले त्यात सुद्धा तुम्ही ताजी जास्वंदीची तीन पाने टाका. ते दोन तास तसेच ठेवा. जास्वंदीचे ताजी स्वच्छ पाने घ्यावीत ( पान ओली असता कामा नयेत ) तेल बनवण्यासाठी घेतलेल्या फुलात किंवा पानात मोईश्चर नसावे. मोईश्चर(ओलेपणा )राहिल्यास तेल लवकर खराब होते. बहुतेक आयुर्वेदिक औषधांमध्ये जास्वंदीच्या फुलांचा वापर केला जातो.
हे तेल बनवायला अतिशय सोपे आणि स्वस्त व बहुगुणी असे आहे. या तेलाचा रिझल्ट अतिशय चांगला आहे. तीन-चार दिवस उन्हात ठेवला नंतर हे तेल तयार होते. असे तेल तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेस केसांवर मालिश केसांच्या तक्रारी तर दुर होतीलच शिवाय तुम्हाला शांत झोपही लागेल. तुमच्या केसातील कोंडा ही जाईल आणि त्यामुळे चेहऱ्यावरील मुरमांच्या समस्याही कमी होतील.
बाजारात अनेक प्रकारचे जास्वंदीचे तेल जास्वंदीचे शाम्पू उपलब्ध आहेत. पण नैसर्गिक प्रकारे घरी बनवलेले हे तेल अत्यंत फायदेशीर ठरते. टीप : अधिक परिणामांसाठी जेवढे तेल तुम्हाला केसांवर लावायचे आहे ते लावते वेळी वेगळे काढून घेऊन थोडे कोमट करून लावावे. हा उपाय तुम्हाला कसा वाटला? उपाय केल्यानंतर तुम्हाला फायदा झाल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.