नमस्कार मित्रांनो बाहेरचे पाणी पिले किंवा थंड पदार्थ खाल्ले तर आपल्याला सर्दी होत असते. यामुळे घसा बसला जातो. आपला आवाज बाहेर पडत नसतो. त्यामुळे आपल्याला भयंकर याचा त्रास देखील सहन करावा लागत असतो. अशा वेळी आपण नेमके काय करायला हवे हे आपल्याला सुचत नसते. तर यासाठी सर्वात सोपा आणि साधारण उपाय आहे तो म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या.
यामुळे घसा चांगल्या प्रकारे सुधारला जात असतो. परंतु यासाठी आम्ही एक आयुर्वेदिक सोपा साधा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या घशामध्ये असलेला कफ हा पूर्णपणे बाहेर निघेल. तसेच घसा हा मोकळा होईल म्हणून हा उपाय तुम्ही करायला हवा. आजच्या या लेखामध्ये आपण हा उपाय कशाप्रकारे करायचा असतो हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख पूर्णपणे वाचा.
तुम्हाला तुमचा घसा मोकळा करायचा असेल तर यासाठी तुम्हाला एक गोळी खायची आहे. ही गोळी तुम्हाला घरीच बनवायची आहे. तर ही गोळी कशाच्या साह्याने व कशाप्रकारे बनवायची हे आपण जाणून घेऊया. आपल्याला हा उपाय करण्यासाठी एका वनस्पतीची पाने लागणार आहेत. ही वनस्पती घराच्या आजूबाजूला सहज मिळून जाते ही वनस्पती आहे बोर.
होय मित्रांनो बोरीच्या पानाचे आरोग्यासाठी विशेष असे फायदे सांगितले जातात. आपल्याला हा उपाय करण्यासाठी देखील बोरीच्या पानाची आवश्यकता लागणार आहे. सहा ते सात पाने घेऊन यावी व मिठाच्या पाण्यामध्ये याला चांगल्या प्रकारे धुवून काढावा. यावर असलेला बॅक्टेरिया हा पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर याचा उपयोग कसा करायचा आहे ते पाहूया.
गॅसवर तवा ठेवावा त्यावर सर्व पाने पसरवून टाकावी व याला दोन्ही बाजूने भाजून द्यावे. दोन्ही बाजूने चांगल्याप्रकारे याला भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यावे व यामध्ये आपल्याला थोडेसे सेंधव मीठ टाकायचे आहे. मिठाचे आपल्या आरोग्यासाठी विशेष असे फायदे सांगितले जातात. यामध्ये दोन ते तीन थेंब पाणी टाकून या मिश्रणाच्या गोळ्या बनवायच्या आहेत.
याच्या सेवनाने तुम्हाला तुमच्या घशामध्ये बरोबर बदल झालेला दिसेल घसा हा पूर्णपणे मोकळा होईल. तसेच आवाज बसला असेल तर तो देखील बरा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.