भाता मुळे खरचं चरबी वाढते का.? भात खावा की चपाती.? वजन कमी करण्यासाठी काय खायला हवे.!

आरोग्य

भात किंवा चपाती हा ऑप्शन आपल्यापुढे अनेक वेळा आला असेल. भात असो किंवा चपाती दोन्ही भारतीय खाद्यसंस्कृतील महत्त्वाचे पदार्थ आहेत. सकाळचे जेवण असू द्या किंवा रात्रीचे जेवण प्रत्येक जेवणामध्ये भात आणि चपाती असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नसते. सकाळच्या नाश्त्यामध्ये देखील अनेकदा भात किंवा चपाती चा समावेश केला जात असतो.

भात किंवा चपाती खाल्ल्याशिवाय पोट भरल्या सारखे वाटत नाही त्यामुळे भात चपाती हे दोन्ही पदार्थ प्रत्येक घरांमध्ये बनवले जातातच. वजन वाढीची समस्या असलेल्या लोकांना नेहमी एक प्रश्न पडत असतो की आपण भोजनामध्ये नेमके खावे तरी काय? भात खावा की चपाती खावी हे त्यांना समजत नाही.! अनेक लोकांना असे वाटत असते की भात खाल्ल्यामुळे वजन खूप वाढत असते, तसेच अनेकांना वाटत असते की चपाती मध्ये देखील भरपूर कॅलरी असतात त्यामुळे लोक दोन्ही खाण्यासाठी घाबरत असतात.

अनेक लोक चपाती खातात परंतु भात बिलकुलही खात नाही. परंतु वजन कमी करण्यासाठी कशाचे सेवन करणे योग्य असते. वजन कमी करायचे असेल तर कोणतीही गोष्ट बिलकुल खाऊ नये हे आपण पाहूया. आपण जर पोषकतत्व संबंधीचा विचार केला तर भात आणि चपाती दोन्हीमध्ये कार्बोहायड्रेट सारख्या प्रमाणामध्ये असतात. 100 ग्रॅम पिठामध्ये कार्बोहायड्रेट 70 ग्रॅम असतात तर प्रोटीन हे 13 ग्रॅम असते, फायबर 10.7 ग्रॅम, फॅट 2.5 ग्रॅम, कॅलरी 340 असतात.

हे वाचा:   हार्ट अटॅक चे हे लक्षण कोणीही ओळखू शकत नाही.! हे लक्षण प्रत्येकाला माहिती हवे.! आयुष्यात खूप उपयोगी पडेल ही माहिती.!

तर 100 ग्रॅम भातामध्ये कार्बोहायड्रेट 78 ग्रॅम, प्रोटीन 6.8 ग्रॅम, प्रोटीन 0.5 ग्रॅम, फायबर 0.7 ग्रॅम, कॅलरीज 130 असतात. जसे की आपण पाहिले की भले ही कार्ब चे प्रमाण भात आणि पोळी मध्ये एक समान असते परंतु चपाती मध्ये प्रोटीन आणि फायबर यांचे प्रमाण भाताच्या तुलनेमध्ये अधिक असते. हेच कारण आहे ज्यामुळे चपाती खाल्ल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा पर्यंत भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटत असते.

परंतु भात खाल्ल्यावर असे होत नाही, भात खाल्ल्यानंतर आपल्याला काही वेळातच भूक लागत असते. असे का होते? कारण भातामध्ये स्टार्च चे प्रमाण जास्त असते त्यामुळे भात अगदी सहजपणे पचत असतो. ज्यामुळे तुम्हाला भूक लगेच काही वेळातच लागत असते. जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा जेवण कराल व जास्तीत जास्त अन्न खाल तर यामुळे वजन तर वाढणारच. यामुळे वजन कमी होणे अवघड होत असते.

हे वाचा:   पचनाचा त्रास होत असेल तर आजपासून हे एक काम करा.! पचनशक्ती जबरदस्त मजबूत होईल.! कधीच गॅस, पित्त, अपचन होणार नाही.!

एक्सपर्ट द्वारे असे सांगितले जाते कि वजन कमी करायचे असेल तर दोन्ही चांगले आहे. परंतु तुम्ही याचे प्रमाण खाण्यामध्ये किती घेत आहात हे देखील महत्त्वाचे आहे. आपण चपाती किंवा भात कशासोबत खातात आहोत हे पाहणे देखील गरजेचे आहे. कारण त्या पदार्थांमध्ये देखील किती कॅलरीज आहेत ज्याचे कॉम्बिनेशन होऊन शरीरात किती कॅलरीज जातात हे पाहणे देखील गरजेचे असते.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल फॅट आणि चरबी कमी करायची असेल तर तुम्ही भात खाणे टाळावे खूपच कमी प्रमाणात भाताचे सेवन करत जावे. परंतु ज्या लोकांना मसल्स गेन करायचे आहे अशा लोकांनी भात खायला हवा कारण भात देखील शरीरासाठी उत्तम मानले जाते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.