मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की भारतामध्ये आयुर्वेदिक वनस्पतींना किती महत्त्व दिले जाते. अशा अनेक आयुर्वेदिक वनस्पती असतात ज्यांच्या पानांमध्ये तसेच फळांमध्ये, बिया मध्ये, फुलांमध्ये विशेष असे गुणधर्म सामावलेले असतात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एका औषधी वनस्पती बद्दल माहिती देणार आहोत. एक अशी आयुर्वेदिक वनस्पती जी अनेक समस्यांना दूर करेल.
अनेक लोकांना कफ होणे, गॅस होणे अशा प्रकारच्या पोटासंबंधी च्या समस्या उद्भवल्या जात असतात अशावेळी तुम्ही पेरू, या वनस्पतीच्या पानांचा उपयोग करू शकता. यासाठी पेरूच्या झाडाची पाने आणावीत. पाने आणत असताना झाडाची मऊ व कोवळी पाने आणावी. जी सहजपणे चूरगळी जातील. अशी पाने पाण्याबरोबर सेवन करावे.
तुम्ही जे पाणी यासाठी वापरणार आहात ते तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर ठेवलेले असेल तर अतिशय उत्तम आहे. असा उपाय जर तुम्ही दोन ते तीन दिवस केला तर कुठल्याही प्रकारचा गॅस हा उरणार नाही. ज्या लोकांना कफ ऍसिडिटी होते अशा लोकांसाठी देखील हा उपाय फारच उपयुक्त म्हटला जाईल. अगदी सहजपणे करता येईल असा हा उपाय आहे.
या पानांचा एक सर्वात मोठा व महत्त्वाचा फायदा असा आहे की यामुळे रक्तशुद्धीकरण खूपच चांगल्या प्रकारे होत असते. जर आपले रक्त शुद्ध नसेल तर वेगवेगळ्या शारीरिक समस्या आपल्याला निर्माण होत असतात. परंतु जर तुम्ही या पानांचे सेवन हे कोमट पाण्याबरोबर केले तर रक्त शुद्धीकरण चांगल्याप्रकारे होते. यामुळे रक्तशर्करा मधुमेह इत्यादी प्रकारच्या समस्या उद्भवल्या जात नाही.
अनेक वेळा आपल्या शरीरावर विशिष्ट प्रकारची अशी गाठ निर्माण झालेली असते. अशी गाठ शरीरावर कोणत्याही भागावर निर्माण होऊ शकते. अशा वेळी या पानांचा उपयोग करुन तुम्ही अशा प्रकारची ही गाठ सहजपणे गायब करू शकता. यासाठी तुम्हाला या पेरूच्या झाडाची पाने घ्यायची आहेत. याला चांगल्याप्रकारे बारीक करून घ्यायचे आहे. यामध्ये काही गोष्टी एकत्र करायच्या आहेत.
सर्वप्रथम पाने धुऊन घेऊन याची मिक्सरच्या साह्याने बारीक पेस्ट बनवून घ्यावी. त्यानंतर या मध्ये थोडेसे एलोवेरा जेल टाकावे व एक ते दीड चमचा हळद टाकावी. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे व ज्या ठिकाणी गाठ आहे त्या ठिकाणी हे लावावे. असे केल्याने काही दिवसातच गाठ देखील गायब होते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.