काय तुम्हाला माहित आहे का की शिरीष काय आहे ? किंवा शिरीष चा उपयोग (Shireesh Uses) कोणत्या कामासाठी केला जातो? जर तुमचे उत्तर नाही असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. शिरीष एक औषधी आहे ज्याचा उपयोग रोगांचा इलाज करण्यासाठी केला जातो. आयुर्वेदिक ग्रंथामध्ये शिरीष चे प्रयोगा संदर्भात खूप साऱ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.
शिरीष मध्यम आकार चे सघन छायादार झाड आहे. याची साल, फुल बीज, मूळं, पानं, इत्यादी प्रत्येक गोष्टीचा उपयोग औषधी साठी केला जातो. शिरीष ची अनेक प्रजाती असतात, परंतु मुख्यतः तीन प्रकारच्या असतात. लाल शिरीष,काळे शिरिष, सफेद शिरीष. आज आपण माहिती बघणार आहोत ती सफेद/ श्वेत शिरीष बद्दल.हे झाड जवळजवळ 30m पर्यंत उंच असते.
पानं हिरव्या रंगाची असतात तर फुल सफेद व पिवळ्या रंगाची असतात. त्याचे फळ नारंगी किंवा भुऱ्या रंगाची असतात. यात बियांची संख्या 10 ते 12 च्या दरम्यान असते. सिरस, Lebbeck tree, शिरस, चिंचोळा, शुकतरु असे अनेक नावं या झाडाला आहेत. मायग्रेन ने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी शिरीष संजीवनी चहोय. यामध्ये शिरीष ची मुळं आणि फळ चा रस चे एक दोन थेंब नाकात टाका.
असं केल्याने दुखणं कमी होते. शिरीष च्या पानांचा रस काजळा प्रमाणे लावल्यास डोळ्या संबंधीच्या सर्व तक्रारी दूर होऊ लागतात. शिरीष ची आंब्याच्या पानांच्या सोबत वाटून रस एक ते दोन थेंब कानात टाकल्याने कानदुखी थांबते. शिरीष ची मुळे वाटून तुम्ही दातांचे मंजन करू शकता. त्याच्या पाण्याने तुम्ही गुळणा करू शकता. असं करून दातांना मजबुती येते.
शिरीष चा डिंक व काळी मिरी वाटून मंजन केल्याने दात दुखीच्या सर्व समस्या दूर होतात. जुलाबामध्ये शिरीष च्या बियांचे चूर्ण एका दिवसातून 3 वेळा घेतल्याने जुलाब थांबतात. शिरीष बीजच्या 2 ग्राम चूर्ण मध्ये 4 ग्राम साखर मिसळा. हे रोज गरम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ सेवन करा. असं केल्याने वीर्य विकार दूर होतात आणि वीर्य दाट होते.
यासोबतच सूज, ट्यूमर, अल्सर, विषप्रयोग दूर करण्यासाठी, मूत्र समस्या, त्वचा रोग इत्यादी अनेक रोगांवरती हे झाड आपल्याला मदत करते.
टीप : अत्यंत उपयोगी असून सुद्धा याच्या दीर्घकाळ वापराने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. तसेच शुक्राणू नष्ट होणे किंवा गर्भ गळणे याची समस्या होऊ शकते. तेव्हा वापर करताना सांभाळून.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.