वाढत्या वजनाला असा आवर घाला.! तुमचे वजन तुम्हीच १५ दिवसात कमी करू शकता.! जाणून घ्या ते कसे.!

आरोग्य

सध्याच्या युगामध्ये प्रत्येकाला आपल्या वाढत्या वजनाला नियंत्रणात आणायचे असते. यासाठी बद्दल आपल्या परीने वाटेल ते प्रयत्न करत असतो. परंतु काही केल्याने आपल्याला याचा रिझल्ट बघण्यास मिळत नाही अशा वेळी आपण खूपच निराश होत असतो. परंतु चिंता करण्याची काही गरज नाही. आम्ही तुम्हाला तुमच्या वाढत्या वजनाला कसे नियंत्रित करायचे याबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.

आपले वाढलेले वजन हे अनेकांची समस्या बनत चालली आहे याला आवर घालण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपापल्या परीने करत असतो. परंतु आपल्या मनाला हवे तसे वजन आपल्याला मिळत नाही. यासाठी अनेक लोक सकाळी उठल्यानंतर जिममध्ये जाऊन व्यायाम करतात तर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही औषधांचे सेवन करत असतात. अनेक महिला तरी यासाठी डाइट प्लान सुद्धा बनवून घेतात.

परंतु एवढे सर्व करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्ही नक्की करून बघा. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला वाढत्या वजनाला नियंत्रित करण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत या टीप्स.! आजकाल प्रत्येक तिसरा व्यक्ती पोटाची चरबी वाढल्याने त्रस्त आहे, परंतु योगासने करून त्यावर नियंत्रण ठेवता येते. कारण योगामुळे शरीर तंदुरुस्त राहते.

हे वाचा:   अंथरुणात खिळलेला व्यक्ती उठून पळू लागेल, ही जडीबुटी मानवासाठी वरदानच म्हणावे लागेल.!

चला तर मग आज तुमच्यासाठी अशाच काही प्रभावी योगासनांची चर्चा करूया, ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी लोण्यासारखी वितळेल. ज्या योगासनांची आम्ही येथे चर्चा करत आहोत, ती तुम्ही घरीही करू शकता. तुमच्या दैनंदिन जीवनात या योगासनांचा समावेश केल्यावर १५ दिवसांत तुम्हाला फरक दिसू लागेल. म्हणजेच तुमच्या पोटाची चरबी घरी बसून काढून टाकली जाऊ शकते, त्यासाठी तुम्हाला आजपासूनच आळस दूर करून योगावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

वजन नियंत्रित करण्यासाठी आपल्याला भुजंगासन नौकासन, उस्त्रासन, धनुरासन, चालनासन असे काही योगासने करावी लागेल. त्याच्या मदतीने शरीर निरोगी ठेवता येते. पोटाची चरबी कमी करण्यासोबतच योगाचे अनेक फायदे आहेत. हे हृदय, ताण, वजन कमी करण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. सकाळी उठून रिकाम्या पोटी १-२ ग्लास पाणी प्या. यामुळे चयापचय वाढेल. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्या.

त्यामुळे जास्त अन्न खाण्याची इच्छा कमी होईल. जास्त तेलकट पदार्थ, बर्गर, पिझ्झा, चीज इत्यादी खाणे टाळा. साखरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा कारण त्यामुळे वजन झपाट्याने वाढते. ताटात जास्त भाज्या, सॅलड ठेवा. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहील. तसेच वजनही नियंत्रणात राहील. झोपण्याच्या अर्धा तास आधी फॅट फ्री दूध प्या. खाली बसून हळूहळू खाण्याची सवय लावा. त्यामुळे अन्न पचते आणि काही वेळाने भूकही लागणार नाही.

हे वाचा:   एक रुपयाचा शाम्पू तुमचे पाय बनवेल गोरेपान.! चप्पल मुळे पडले असेल असे डाग तर लगेच करा हा उपाय.! अजिबात विश्वास बसणार नाही.!

जर तुम्हाला ताटात जास्त जेवण घेण्याची सवय असेल तर हाताने न खाता चमच्याने खा. सवय निघून जाईल. यासोबतच तुम्हाला कमी अन्न खाण्याची सवयही लागेल. दुधाच्या चहाऐवजी आल्याचा चहा किंवा ग्रीन टी पिण्याची सवय लावा. कारण ग्रीन टी वजन कमी करण्यास मदत करते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *