अंग दुखी, हाडे दुखणे होईल बरे.! सांधे दुखी वर करावा हा रामबाण उपाय.! कुठलीही सूज झटपट वसरली जाईल.!

आरोग्य

मित्रांनो संधिवात हाडांचे दुखणे हा एक असा आजार आहे ज्यामुळे संपूर्ण जगच त्रस्त आहे. या दुखण्याचा काय त्रास असतो हे एक तो रुग्ण स्वतः आज सांगू शकतो. सहसा हे दुखणे जेष्ठ लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. तरूणांमध्ये देखील आढळते परंतु फार कमी प्रमाणात. संधिवात म्हणजे हाडांच्या सांध्यांमध्ये सूज निर्माण होणे. बऱ्याच लोकांना केवळ एकाच सांध्यात हा त्रास जाणवतो तर काहीजण अनेक विविध ठिकाणी हा त्रास जाणवतो.

एक गोष्ट सर्वात चांगले की आजवर आयुर्वेदामध्ये रामबाण औषधे व उपचार आहेत. एखादा सांध्याचे आयुष्य हे तो सांधा हलवणार या स्नायूंच्या हाडांच्या आणि रक्तवाहिन्यांच्या परस्पर ताकदीवर व वात-पित्त-कफ दोषावर अवलंबून असते. स्नायूंची ताकद देखील तितकेच महत्वाचे असते. सांधे अजिबात हलले नाही तरी निकामी होतात किंवा अतिरिक्त झाले तरीदेखील निकामी होतात.

सावधान मधील वंगण कमी झाल्यास सांधे दुखू लागतात आणि दुखतात म्हणून त्यांची हालचाल कमी होते. हालचाल कमी झाली की स्नायूंची ताकद कमी होते आणि त्यामुळे चालणे फिरणे व्यायाम कमी होते परिणामी वजन वाढते. आणि पुन्हा यामुळे अजून जास्तच प्रमाणात सांधे दुखू लागतात असे हे दुष्टचक्र सतत चालू राहते. संधिवात होण्याचे कारण म्हणजे हाडांची झीज, सांध्यांचा ताठरपणा, सांधे हलवण्या मध्ये स्नायूंची ताकद कमी होणे.

हाडांना आवश्यक असणाऱ्या पोषण तत्त्वांचा अभाव, वाढलेले वजन, वात-पित्त-कफ असंतुलन दोष, शरीरात योग्य प्रकारे रक्तपुरवठा न होणे, स्टेरॉईड इ चा बेसुमार वापर.. यापैकी तुमचे नेमके कारण कोणते हे तुम्ही जाणता. आजाराचे निदान केल्यावर औषधे घेणे आवश्यक असते तसेच साधकांसाठी रसायन कर्म करणारी औषध नित्य घ्यावी लागतात. आहारामध्ये काही पथ्य-अपथ्य असतात ते पाळावे लागतात.

हे वाचा:   फक्त दोन दिवस तळपायांना आणि तळहातांना चोळून लावावे.! डोळे दहापट मजबूत होतील.! हे एक काम आयुष्यात एकदा तरी कराच.!

अनेक जणांना पंचकर्म केल्याने देखील फायदा होतो. योगासने व्यायाम देखील नित्यनियमाने सुरू ठेवावेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिक भरपूर स्वस्त प्रमाणात असणारा स्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. विटामिन डी नैसर्गिक प्रमाणात मिळवण्यासाठी तसेच सांधेदुखी नैसर्गिकरीत्या कमी करण्यासाठी सुमारे 40 मिनिटे दररोज सूर्यप्रकाशात बसा.

बरेचजण सांधेदुखी कंबर दुखी यावर उडदाच्या डाळीचे सुकामेवाने युक्त असे साजूक तुपातील पोस्टीक लाडु देखील करतात. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीराच्या तक्रारींकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले जाते. जेव्हा या समस्या गंभीर बनू लागतात तेव्हा आपण जागे होतो. त्यानंतर सायटिका मनका मुंग्या येणे अशा समस्या वाढीस लागतात. इतकेच काय तर अनेक जणांना बसताना उठताना देखील त्रास होतो.

यासाठी आपला आहार विहार बदलावा लागतो. एक चमचा जवस पावडर, एक चमचा तीळ, एक चमचा आवळा पावडर हे तीनही एकत्र करून सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घ्या. मेथीदाण्याचे पूड अर्धा चमचा, अर्धा चमचा अश्वगंधा पावडर दोन्ही गोष्टी एक कप दुधात घालून प्यावे. घोडी साठी थोडासा गूळ वापरावा यामुळे स्नायूंना बळ मिळते. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या फळे डाळी यांचा भरपूर वापर करावा.

हिंग ओवा दालचिनी धने जिरे मिरे लवंग हे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणामध्ये अवश्य वापरावे. दररोज जेवताना दोन चमचे साजूक तूप सेवन करावे. यामुळे हाडांना वंगण मिळते. सांधे दुखीवर रामबाण औषध आणि वाताचा मित्र म्हणून गुग्गुळाला आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्व आहे. अनेक आयुर्वेदिक दुकानांमध्ये सिंहनाद गुग्गुळ, वातविध्वंसक वटी, मेदोहर गुग्गुळ, योगराज गुग्गुळ अशा विविध नावाने औषध उपलब्ध आहेत.

हे वाचा:   बीपी शुगर च्या गोळ्या आजच फेकून द्याव्या लागतील.! सर्व रोगाचा बाप आहे ही वनस्पती.! मूतखडा तर सात दिवसात गळून पडेल.!

वैद्याच्या मदतीने तुम्ही याचे सेवन करू शकता. यामुळे सांधेदुखी पासून तुमची सुटका होते. यामध्ये आंबट फळांचे सेवन करू नये. लसूण तीळ तेलामध्ये शिजवून तेल बनवा याने सांध्यांचे मालिश करा. तुम्हाला खूप आराम मिळेल. निरगुडीचा पाला मोहरीच्या तेलामध्ये शिजवून घ्या या तेलाने देखील तुम्हाला फरक पडेल. हे तेल लावत असताना उन्हामध्ये बसल्यास अधिक जास्त प्रमाणात परिणाम दिसून येईल.

पोट साफ होत आहे की नाही याकडे विशेष लक्ष द्या. नसल्यास रोज एक चमचा त्रिफळा चूर्ण पाण्यासोबत घ्या यामुळे कोठा साफ होतो. अशाप्रकारे आतून व बाहेरून आपल्या शरीराचे व्यवस्थित काळजी घेतल्यास असे रोग उद्भवणार नाहीत. शरीराचे थोडी हालचाल करत राहा आणि वजन नियंत्रणात ठेवा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *