या वनस्पतीला सर्वजण समजतात विषारी वनस्पती पण आहे ही खूप फायदेशीर वनस्पती.! याचे फायदे जाणून घ्या आणि दवाखाण्याचे असंख्य पैसे वाचवा.!

आरोग्य

धोतरा ही वनस्पती विषारी आहे. या वनस्पतींचा प्रसार जगभरातील सर्व उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत झालेला आहे. भारतात काळा धोतरा आणि पांढरा धोतरा या जाती विशेषकरून दिसून येतात.
पांढरा धोतरा हे झुडूप १-१.५ मी.पर्यंत उंच असते. फांद्या नागमोडी असतात. पाने फिकट हिरवी, मऊ, अनियमित असतात. त्यांवर लव असते. फुले सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत येतात आणि संध्याकाळी उमलतात.

ती पांढरी, कर्ण्याच्या आकाराची व ६-२० सेंमी. लांब असून तिला पाच त्रिकोणाकृती खंडीत पाकळ्या असतात. फळ गोल व तीक्ष्ण काटेदार असते. फळात अनेक लहान गडद बिया असतात. आजकाल लाल, पिवळी, गुलाबी रंगाची धोतऱ्याची फुले ही दिसून येतात. मूळव्याधीवर लावण्याच्या मलमात ही वनस्पती वापरतात. डोळे दुखणे, नाकाचा त्रास व केस गळणे यांवर पाने गरम करून लावतात.

हे वाचा:   एक रुपयाची सुपारी एवढे फायदे देते हे अजूनही कोणाला माहीत नसेल.! कफ आयुष्यात कधी होणार नाही.!

धोतऱ्याच्या बिया मादक, ज्वरनाशक व कृमिनाशक आहेत. त्या चुकून खाल्ल्यास डोके दुखते व उलटी होते. धोतऱ्याची मात्रा अधिक प्रमाणात सेवन केल्यास मृत्यूही होऊ शकतो. बियांत १६–१७% स्थिर तेल असते त्या तेलात कित्येक मेदाम्ले (ओलेइक, लिनोलीइक, पामिटिक, स्टिअरिक इ.) आहेत. रेचक व वांतिकारक औषधे देवून विषबाधा कमी करता येते.

या वनस्पतीचा पिवळसर चीक औषधी असून कावीळ, खरूज, फोड ,जखमा इत्यादींवर उपयुक्त असतो. दुधाबरोबर कुष्ठावर व तुपाबरोबर परम्यावर देतात. मुळांचा काढा आरोग्य पुनःस्थापक व जुनाट चर्मरोगनाशक आहे. बिया अधिक प्रमाणात विषारी असून त्या रेचक, वांतीकारक, कफोत्सारक व शामक आहेत. बियांतील कडू अखाद्य तेल (२२–३६%) कमी प्रमाणात सौम्य रेचक आहे मोठ्या प्रमाणात तीव्र रेचक व वांतीकारक असते.

हे वाचा:   या सोप्या उपायाने लाखो लोकांना बरे केले आहे.! गुडघ्याचा त्रास सहन होत नाही का.? मग आता विचार करू नका आजच करा हा जबरदस्त उपाय.!

कातडीच्या रोगांवर हे तेल उपयुक्त आहे. शिवाय ते वंगणाकरिता उपयुक्त असते. या वनस्पतीचे अनेक फायदे आहेत पण खासकरून केसांचे तक्रारी/ टक्कल पडणे/ चाई पडणे आणि शरीरातील गुडघेदुखी, सांधेदुखी, गाठी होणे यावर ही वनस्पती अत्यंत लाभदायी आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास तुम्ही इतरांसोबत शेअर करा. आम्हाला तुमच्या माहितीत भर घालताना आनंद होतो.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *