चांदीचे काळे पडलेले दागिने मिनिटभरात होतील पांढरेशुभ्र अगदी नवे घेतले तसे.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोतच चांदीचे पैंजण किंवा दागिने, देवाच्या मुर्त्या न घासता हात न लावता चमकावयाची एक जबरदस्त ट्रिक.. पण बाजारात सोनाराकडे चांदी साफ करण्यासाठी तर देतो परंतु हे थोडेसे खर्चिक असते. सोबतच ते केमिकल वापरतात त्यामुळे चांदीच्या वजनामध्ये ही घट होते. पण त्याच पद्धतीने जर नैसर्गिक रित्या घरच्या घरी तुम्हाला ही ट्रिक वापरून चांदीचे दागिने किंवा पैंजण चमकवता आले तर?

आपल्या घरी काळे पडलेले चांदीचे आभूषणे खूप पाडून असतात पण काळजी झाल्यामुळे आपण ते वापरत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्यामुळे तुम्ही हात न लावता किंवा न घासता चांदीच्या वस्तू ह्या साफ करू शकणार आहात. आजची ही अनोखी ट्रिक खूप माहितीपूर्ण आहे. या ट्रिकसाठी आपल्याला लागणार आहे अल्युमिनियम फॉईल, जी आपण चपाती नरम राहण्यासाठी किचनमध्ये वापरत असतो.

हे वाचा:   म'रेपर्यंत केस काळेच राहतील, पुन्हा पुन्हा डाय करण्याची चिंता आता कायमची मिटली.!

या आल्यूमिनियम फॉईल चे चार तुकडे कापून घ्या. गॅस वर दीड ग्लास पाणी एका भांड्यात गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये हे फॉईल चे तुकडे चूरगाळून गोळा करून त्या गरम पाण्यात घालावे. हे तुकडे पाण्यामध्ये बुडले पाहिजे. यामध्ये तुमच्याकडे असलेली काळी पडलेली चांदी / चांदीचे दागिने त्यात टाका. याला पाच मिनिटे पाणी गॅस वर अजून उकळत ठेवा.

यामध्ये तुम्हाला असे दिसेल की फॉईल काळी पडते. काही वस्तू लगेच साफ झालेल्या दिसतील तर काही वस्तू पूर्ण चमकणार नाहीत. ज्या वस्तू अजूनही चमकत नाहीत त्यासाठी अर्धा चमचा मीठ, एक चमचा खाण्याचा सोडा, एक चिमूटभर कपडे धुण्याची पावडर या पाण्यात घालव्यात. त्याला 10 मिनिटे मध्यम आचेवर उकळून घ्या. पाण्यावर फेस आलेला दिसेल.

हे वाचा:   अंघोळ करताना केस असे धुवा, एकही केस गळणार नाही.!

तुम्हाला दिसेल काळपट राहिलेले चांदीचे दागिने सुद्धा न घासता चमकतील. पाणी थंड होऊ द्या. ते दागिने वेगळे करून स्वच्छ गार पाण्याने धुवून घ्या. अगदीच हात न लावता न घासता तुम्हाला नव्याप्रमाणे चांदीचे दागिने चमकताना दिसतील. असे सहजप्रकारे तुम्ही दागिने चमकवू शकता. टीप : चांदीच्या दागिन्यावर बारीक नक्षीकाम असेल तर तुम्हाला त्यावर ब्रश ने हलकेसर घासावे लागेल. त्या बारीक नक्षीमधून घाण निघून ते चमकू लागेल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *