मित्रांनो, जर तुमच्या हाडांमध्ये दुखत असेल, चालायला, उठायला, बसायला किंवा पायऱ्या चढते उतरते वेळी तुमच्या सांध्यांमध्ये दुखत असेल तर आजची ही माहिती तुमच्या अत्यंत कामाची आहे. तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी ठेवू शकता. सोबतच शरीरातील कॅलशिमची कमतरता दूर करू शकता. शरीरात रक्ताची बिलकुल कमी होणार नाही आणि सांधेदुखी मध्ये तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अत्यंत कमी खर्च येणार आहे. यासाठी लागणाऱ्या वस्तू ही सहज उपलब्ध होतात. यासाठी तुम्हाला एक मुठ फुटाणे ( भाजलेला चना ) रोज खायचे आहेत. त्यामध्ये कॅल्शिअम अत्यंत भरपूर प्रमाणात असते. तुमच्या शरीराला कॅल्शियमची कमी राहत नाही. सोबतच तुमची पचनशक्ती सुधारते. त्याचं साखरेचे प्रमाण देखील हे फुटाणे नियंत्रित ठेवतात.
शुगर असलेल्या लोकांनी नियमितपणे फुटाणे खाल्लेच पाहिजेत. या उपायासाठी दुसरी वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे गूळ. डायबेटिक लोकांनी गुळाचा वापर करू नये. आयुर्वेदमध्ये अनेक रोगांच्या उपचारामध्ये गुळाचा वापर केला जातो. साखरेऐवजी गुळाचा प्रयोग जास्त फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी एक छोटासा गुळाचा तुकडा खाल्ल्याने शरीरात कधीच रक्ताची कमतरता होणार नाही.
गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे आपले हिमोग्लोबिन लेव्हल वाढते. खास करून थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला गूळ नक्कीच खाल्ला पाहिजे. एक मूठभर फुटाणे आणि एक छोटा गुळाचा तुकडा नियमित खाल्ल्याने जुनाट ठाणे गाठ येणे सूज येणे यांसारख्या तक्रारी दूर होतील. वजन कमी करायचे असल्यास गुळाचे प्रमाण कमी करावे. यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल.
छोटा मोठा आजार तुमच्या पास पास देखील फिरकू शकणार नाहीत. गूळ आणि फुटाणे चे सेवन हा फार पूर्वीपासून खात आलेला उपाय आहे. त्या लोकांना दातामुळे फुटाणे चावून खाता येत नाही त्यांनी मिक्सर मधून फुटाणे बारीक करून पावडर बनवून त्याचे सेवन करावे. एक चमचा फुटाण्याची पावडर एक ग्लास दुधामध्ये घेऊन खाल्ल्याने सांधेदुखी मध्ये खूप फरक पडतो.
बदाम…आपले रोग प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी बदाम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. दोन ते तीन बदाम रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी साल काढून खावेत. त्यामुळे तुमचा मेंदू तल्लख राहतो. सर्व शक्तिशाली बनते पोट साफ होते आणि शरीरावरील नको असलेली चरबी घटवण्याचे काम बदाम करतात. हाडं मजबूत करण्याचे काम देखील बदाम करतात. डायबेटिस सुद्धा नियंत्रित राहतो.
सांधेदुखी मधून तुम्हाला सुटकारा हवा असेल तर तुम्हाला तीळ खाल्ले पाहिजेत. तीळ एक चमचा रोज सेवन केल्याने जवळपास 100gm कॅल्शियम मिळते. यामध्ये मॅग्नेशिअम, झिंक, कॉपर सुद्धा भरपूर प्रमाणात असते. हाडं त्वचा दात मेंदू साठी ती अत्यंत फायदेशीर आहेत. वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम तीळ करते. तीळ भाजून मिक्सरवर पावडर बनवून दुधासोबत ही तुम्ही त्याचे सेवन करू शकता.
तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे वस्तूंचे सेवन तुम्ही नियमित प्रमाणे करा. हाडांना बळकट ठेवा. स्वस्थ रहा, निरोगी रहा..!! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.