नमस्कार, आज आपण पाहणार आहोत, घरातीलच असे तीन धान्य ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियम कधीच कमी पडणार नाही. आपल्या रोजच्या जेवणात -आहारात या तीन धान्यांचा जर आपण समावेश केला तर आपले कॅल्शियम तर वाढेलच शिवाय हिमोग्लोबिन देखील वाढेल. रक्ताची कमतरता भासणार नाही. तसे तीन धान्य कोणते? यांचा काय उपयोग आहे? आणि त्यांचा वापर कसा करावा हे आपण पाहूया.
बाजरी : कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचा भरपूर प्रमाणात साठा बाजरीमध्ये असतो. बाजरी हृदयासाठी अत्यंत पोषक असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. थंडीमध्ये बाजरीची भाकरी सर्रास घराघरांमध्ये आढळते. कोलेस्टोरेल ची पातळी नियंत्रणात राहण्यास बाजरीचा मोठा वाटा असतो. यामुळे हृदयासंबंधित आजार होत नाहीत. वजन कमी करत असल्यास बाजरीची भाकरी खाणे आपल्यासाठी फायदेशीर असते.
नाचणी : कॅल्शियम आणि आयर्न(लोह) मोठ्या प्रमाणात असणारे धान्य म्हणजे नाचणी. नाचणीचे सेवन केल्याने शरीरामध्ये अमिनो ऍसिड ची निर्मिती होते. मानवी शरीरासाठी हे अमिनो ऍसिड अत्यंत उपयुक्त असतात. नाचणी मुळे लहान मुलांच्या मेंदूचा विकास अत्यंत झपाट्याने होतो. लहान मुलांची हाडे मजबूत होतात. लोह मोठ्या प्रमाणात असल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढीस मदत होते.
ज्वारी : वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त धान्य म्हणजे ज्वारी. मधुमेह, हृदयविकाराचे रोगी यांच्या साठी ज्वारी हे वरदानच. ज्वारी मध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या मांस पेशींना ताकद मिळते. मेंदू साठी द्वारे अत्यंत पोषक असते. केसांची मुळे मजबूत होण्यासाठी ज्वारीची मदत होते.
असे तिने धान्य एकत्र करून त्याचे पीठ दळून आणावे. त्यापासून बनवलेली भाकरी तुम्ही रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करावी. असं केल्याने तुम्हाला आयुष्यात कधीही कॅल्शियमची कमतरता पडणार नाही. कधीही रक्ताची कमतरता जाणवणार नाही. अगदी शंभर वर्षे तुमची हाडे मजबूत राहतील. लहान मुलांचा मेंदू अतिशय तल्लख होईल.
असे तीनही धान्यांचे पीठ हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. तुमच्या आहारात याचा नक्कीच समावेश करा आणि तुमचे जीवन निरोगी बनवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.