एकदम पटकन ठीक होईल सर्दी, खोकला, ताप आणि घसा दुखी, एकाच उपायात सर्दी खोकला गायब.!

आरोग्य

मित्रांनो थंडीची चाहूल लागताच आपल्याला थंडी भरून येणे, सर्दी, खोकला, ताप येणे, घसादुखी, डोकेदुखी अशा तक्रारींचा पाढा एकामागे एक सुरु होतो. खोकला सर्दी सोबतच आपले नाक पूर्णपणे बंद होते. नाक सतत वाहू लागते. घसा खवखवतो आणि इतका दुखू लागतो की पाणीही पिताना त्रास होतो.

आज आम्ही तुम्हाला एक असा काढा बनवण्यास सांगणार आहोत की जो फक्त दोन दिवस पिल्याने कितीही जुनी सर्दी खोकला असू दे, बंद नाकाची समस्या असू दे ती बिलकुल ठीक होईल. या उपायामध्ये आपण वापरणार आहोत पेरूची पाने. पेरूच्या पानांमध्ये विटामिन सी, लोह सोबतच अँटी ऑक्सीडेंट, अँटी बॅक्टेरियल आणि anti-inflammatory गुणधर्म असतात. यामध्ये फायबरचे प्रमाण देखील भरपूर असते.

असे हे बहुगुणी असल्याने तुम्हाला इन्फेक्शन पासून हे पान वाचवतात. ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला आणि बंद नाकाच्या समस्येपासून आराम मिळतो. सर्वात आधी आपल्या आसपासचा पेरूच्या झाडावरील कवळीताजी पाने तोडून आणा. सुमारे पाच ते सात पाने स्वच्छ पाण्याने धुवा. लक्षात ठेवा पेरूची ताजी व कोवळीच पाने घ्या.

हे वाचा:   सतत दुखणारे पोट काय असते कारणे.! सततच्या पोटदुखीला अजिबात करू नका दुर्लक्ष.! अन्यथा सहन करावे लागेल असे काही.!

जुनाट झालेली पाने घेतल्यास तितका असरदार फरक जाणवणार नाही. हा काढा बनवण्यासाठी पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून उकळायला ठेवा. थोडं गरम झाल्यावर यामध्ये धुतलेले पेरूची पाने टाका. ही पेरूची पाने थोडावेळ यात उकळू द्या. मधन मधन चमच्याने हलवा. लक्षात ठेवा काढा बनवताना गॅस मंद आचेवर असावा.

याच उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला तीन ते चार लवंगा घालायच्या आहेत. अनेकदा घशामध्ये कफ जमा होतो लवंगा चा वापर केल्याने कफ लवकर बाहेर पडण्यास मदत होते. यासोबत पाच ते सहा काळीमिरी देखिल घालाव्यात. काळी मिरी उष्ण प्रकृतीची असल्याने नाक गळती थांबवण्यास आपली मदत करते. हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित उकळू द्यावे.

पाण्याचा रंग थोडा बदललेला तुमच्या लक्षात येईल. व हा काढा गरम-गरम गाळून घ्या. दिवसातून दोन वेळेस सलग तीन दिवस असा प्रयोग केल्याने लवकर परिणाम दिसतो. पिताना याची चव तुम्हाला आवडत नसल्यास त्यामध्ये एक चमचा मध घालून याचे सेवन करू शकता. मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला फायदाच होईल आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

हे वाचा:   या दोन पाना मुळे फक्त दोन तासात थांबली गुडघेदुखी.! आयुष्यातली कटकट म्हणजे ही गुडघेदुखी कायमची निघुन जाईल.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *