वडाचं झाड म्हटलं तर आठवते वटपौर्णिमेला. उंच डेरेदार सावली देणारं वडाच्या झाडाच्या पारंब्या आणि वडाचं झाड हे कायमच सर्वांना हवंहवंसं वाटणारं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. या झाडाची पौराणिक महती तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना असेल. पण या झाडाचे आपल्या आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात याची तुम्हाला माहिती आहे का?
कदाचित तुम्हाला याबद्दल जास्त माहिती नसेल. हरकत नाही या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला याचं महत्त्व सांगणार आहोत. वडाच्या झाडाखाली तुम्ही जितक्या जास्त वेळ बसता तितका जास्त वेळ तुमच्या शरीराला आवश्यक असा ऑक्सिजन पुरवठा होतो. वडाची उंची साधारण तीस मीटरपर्यंत असते. तसाच हे झाड सदापर्णी आहे. अर्थात हे झाड कधी सुकत नाही. वडाचा चीक हा दातदुखी, संधीवात तसंच तळपायाच्या भेगांवर फायदेशीर ठरतो.
नियमितपणे वडाच्या सालीच्या काढ्याचे सेवन हे मधुमेहावर गुणकारी ठरते. विंचवाचे विष काढण्यासाठीही तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. तसंच पायावर भिंगरी अथवा चिखल्या झाल्यास, तुम्ही वडाचा चीक लावतात. तुमच्या शरीरात अचानक लचक भरल्यास किंवा सांधे दुखत असल्यास, वडाची पानं लावून थोडी गरम केल्यास, त्या दुखणाऱ्या भागावर लावा.
असं केल्याने सांधे मोकळे होऊन बरे होतात. तुम्ही जर वडाची पिकलेली पानं, जास्वंदीची पानं आणि लाल चंदन पाण्यात एकत्र करून वाटलं आणि त्याची पेस्ट चेहऱ्याला लावलीत तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स निघून जाण्यासही मदत होते. केसांच्या समस्या तर प्रत्येकालाच असतात. त्यावर एक उपाय म्हणजे वडाची मूळं आणि तीळ समान मात्रेत घ्या. दोन्ही नीट वाटून घ्या आणि केसांना लावा.
साधारण अर्धा तास तसंच ठेवा आणि मग त्यावर नारळ आणि भृंगराज तेल लावून मसाज करा. तुमच्या केसांच्या वाढीसाठी हा एक उत्कृष्ट उपाय आहे. तुम्हाला जर अति लघवीचा त्रास होत असेल तर तुम्ही वडाच्या झाडांच्या बियांची व्यवस्थित पावडर करून घ्या. त्यातील साधारण 1-2 ग्रॅम पावडर दिवसातून दोन वेळा गायीच्या दुधात घालून प्या.
याशिवाय डोळ्यांच्या समस्या, नाकांच्या तक्रारी, मूत्रविकार त्वचेच्या तक्रारी एक ना अनेक आजारांवर बहुगुणी उपाय आहेत वडाचे झाड, साल, पान, मूळ, पारंब्या..! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.