मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सुरण या वनस्पतीची माहिती घेऊन आलो आहोत. हे सुरणाचे झाड एक फूट ते तीन फूट उंची पर्यंत वाढते. असं तर घराघरांमध्ये सुरणाची भाजी बनवून खाल्ली जाते. सुरण जितकी चविष्ट भाजी आहे तितकीच फायदेशीर आयुर्वेदिक औषधी देखील आहे हे फार कमी जणांना माहीत आहे. शरीरातील अनेक रोगांना ठीक करण्याचे काम ही वनस्पती करते.
सुरणाचे दोन प्रजाती आहेत एक आहे जंगली सुरण आणि दुसरा आहे देशी सुरण. शेतामध्ये उगवलेले सुरण सफेद रंगाचे देशी असते तर जंगली सुरण हे काळ्या कंदाचे असते. काळे कंद असलेले सुरण आयुर्वेदिक औषधी जडीबुटी मध्ये वापरले जाते. जंगली सुरण च्या झाडाचे खोड काळे असते. आता जाणून घेऊया याच्या फायद्यांविषयी.
तुम्हाला मूळव्याधीची समस्या तीव्रतेने भेडसावत असल्यास, 10 ग्रॅम सुरण(कंद ) चे पातळ काप करून घ्या. त्यामध्ये सुमारे 20 ग्रॅम गूळ घाला. त्यात थोडेसे पाणी घाला. आणि हे मिश्रण मूळव्याध असलेल्या रोग्याला सेवन करण्यास द्यावे. हे न चावता डायरेक्ट गिळायचे आहे. असं केल्याने तीन ते चार वेळेत तुमची मूळव्याधीची समस्या ठीक होते. अगदी रक्त पडणारी मुळव्याध असली तरीही..!
सुरणाच्या कंदामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, लोह, फायबर मोठ्या प्रमाणात असते. वारंवार बद्धकोष्टता होण्याचा त्रास तुम्हाला असेल तर, सुरणाची भाजीचे सेवन आठवड्यातून एकदा केल्याने बद्धकोष्टता ठीक होईल. सोबतच पोटातील सर्व घाण साफ होते. त्यामुळे तुमची पाचन क्रिया सुधारण्यात मदत होते.
सुरण उकडून, मीठ मिरची सोबत कुस्करून खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढते. उष्ण प्रवृत्तीचे असलेल सुरण हे थंडीच्या दिवसात जास्त खाल्ले पाहिजे. या सगळ्या माहिती सोबतच तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की कच्च्या सुरणाचे सेवन तुम्ही कधीही करू नये. कच्चा सुरणाच्या सेवनामुळे घसा खवखवतो.
आणि समजा चुकून कच्चा सुरण खाल्ले गेलंच तर लिंबाचा रस घशामध्ये जाईल असे बघा. यामुळे कच्चा सुरणाचा होणारा दुष्परिणाम नष्ट होईल. सुरणाच्या सेवनाने वीर्य दाट होते सोबतच शीघ्र पतनाची समस्या देखील नष्ट होईल. तुमची ताकद वाढेल. स्वस्थ खा व मस्त राहा आणि ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.