21 दिवस केसात हे लावले, केसांना दुप्पट केले. हलके गळणारे केस पूर्णपणे थांबले. नमस्कार मित्रांनो, केसांना दुप्पटीने वाढवेल हा उपाय. जर तुम्ही तुमच्या केसांची लांबी वाढवू इच्छित असाल, परंतु केस लांब होण्या ऐवजी गळतात तुटतात तर हा उपाय तुमचा केसांचे पूर्ण काळजी घेईल त्यामुळे तुमचे केस दुप्पट पटीने वाढू लागतील आणि त्यामध्ये फक्त तीन वस्तूंचा वापर करायचा आहे.
या उपायामध्ये सर्वप्रथम लागणारा घटक आहे ते म्हणजे तांदूळ. अनेक डर्मेटोलॉजिस्ट असं म्हणणं आहे की तांदळामध्ये असे विटामिन्स आणि मिनरल्स इतर घटक असतात ज्यामुळे आपल्या केसांचा पोत सुधारतो आणि केसांची वाढ होण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. तीन चमचे तांदूळ एका वाटीत घ्या. त्यात एक कप पाणी घालून चमच्याने मिक्स करून घ्या. व असेच एक तास राहू द्या.
पुढे लागणारा घटक आहे एक मध्यम आकाराचा कांदा. जांभळा लाल कांदा घेतल्यास उत्तम. कांदा सालं काढून कापून घ्यावा. केस गळण्याचा प्रामुख्यानं कारण आहे म्हणजे केसांमध्ये इन्फेक्शन होणे कोंडा होणे. केसांची मुळं कमजोर होऊन केसांची वाढ खुंटते. कांदा यावर लाभदायक आहे. बाजारातून अनेक विविध प्रकारचे केसांसाठी चे उत्पादन आपण वापरतो जे सुरुवातीला चांगले वाटतात परंतु ते दीर्घकाळासाठी आपल्या केसांवर वाईट परिणाम करतात.
आपण जो उपाय करत आहोत तो पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि तुमच्या केसांची नीट काळजी घेईन. या उपायासाठी आपल्याला तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे कढीपत्ता. ताजा कढीपत्ता चे 10 पानं या उपायात पुरेशी आहेत. तांदूळ भिजवलेले पाणी गाळून वेगळे करून एका पॅन मध्ये घ्या. त्या पाण्यामध्ये कांदा व कढीपत्ता घाला. याला मंद आचेवर गरम करा. दहा मिनिटे हे पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा चहा पावडर घाला.
ऱ्हाट झालेल्या केसांमध्ये चमक आणण्याचे काम करते हि चहापावडर. अजून दोन मिनिटे हे मिश्रण उकळा. गॅस बंद करून हे मिश्रण थंड करा. हे मिश्रण साठवण्यासाठी काचेची बरणी घ्या. हे मिश्रण गाळून या बरणीत साठवून ठेवा. त्याचा वापर तुम्हाला तुमच्या केसांच्या लांबीनुसार करायचा आहे. हे मिश्रण स्प्रे ने किंवा चमच्याने केसांच्या मुळापाशी लावून हलक्या हाताने केसांच्या मुळांना मसाज करायचा आहे.
जेणेकरून हे तुमचा केसांच्या मुळात लवकर शोषले जाऊन लवकर फरक दिसेल. अर्धा तास ठेवून शाम्पूने केस धुवावेत. एक दिवसाआड हा प्रयोग करत रहावा. आठवड्यातून तीन दिवसांपेक्षा जास्त याचा प्रयोग करू नये. 21 दिवसातच वर सांगितल्याप्रमाणे फरक तुम्हाला दिसेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.