अंडी, मटण, मासे खाणारे भरपूर आहे. अंडी मटण मासे हे एनर्जी चा एक खूप चांगला स्रोत म्हणता येईल. यामध्ये भरपूर पौष्टिक घटक सामावलेले असतात. अंडी देखील भरपूर लोक खात असतात. अंड्या द्वारे आपल्या शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळत असतात. यामध्ये ऍमिनो ऍसिड, विटामीन बी १२, विटामीन डी, विटामीन ई, विटामीन ए तसेच अन्य तत्व सामावलेले असतात.
अंडी खाण्यासाठी खूपच उपयुक्त असतात तसेच हे बनवण्यासाठी देखील खूपच सोपे असते. अतिशय कमी वेळामध्ये याला बनवले जाऊ शकते. तेही अगदी कमी साहित्यामध्ये. तुम्ही अंड्याचे सेवन वेगवेगळ्या प्रकारे केले असेल. अंडी फक्त आपल्या शरीरासाठी नव्हे तर आपल्या मेंदूसाठी देखील खूपच उपयुक्त मानले जातात. यामुळे हाडे देखील मजबूत बनत असतात. डोळ्यांसाठी देखील अंडी अतिशय उत्तम मानले जातात.
हेच कारण आहे ज्यामुळे आपण आठवडाभरातून अनेकदा अंड्याचे सेवन करत असतो. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की एक कोंबडी महिन्याभरात किंवा एका वर्षभरात किती अंडी देत असेल. या प्रश्नाचे उत्तर अतिशय कमी लोकांना माहीत असते. या प्रश्नाचे उत्तर माहीत नसणाऱ्या मध्ये बहुतेक अंडी खाणारे लोक देखील असू शकतात. या प्रश्नाचे उत्तर त्यांनाच माहिती असेल जे पोल्ट्री संबंधित व्यवसाय करत असतील किंवा शेतकरी असतील.
पोल्ट्री वैज्ञानिक डॉक्टर किदवई यांच्यानुसार, एक कोंबडी वर्षभरात 305 ते 310 अंडी देत असते. याचा अर्थ असा की महिन्याभरात ऊन 25 ते 26 अंडी. ही संख्या एकदम करेक्ट किंवा बरोबर नाही. कधीकधी कमी जास्त होऊ शकते. हे झाले पोल्ट्री कोंबड्यान विषयी. परंतु ज्या कोंबड्या गावरान असतात अशा कोंबड्या वर्षभरातून केवळ दीडशे ते दोनशे अंडी देत असतात.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.