चालताना गुडघे दुखणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त माहिती, एकच उपाय; पाठ दुखी, कंबर दुखी, गुडघे दुखी, सांधे दुखी सर्व दुखणे होईल बरे.!

आरोग्य

मित्रांनो, आजवर आम्ही तुम्हाला कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, मान दुखी यावर अनेक घरगुती उपाय सुचवले आहेत. आजही आम्ही तुम्हाला असाच एक घरगुती उपाय सांगणार आहोत जो एकदम अनोखा आणि स्वतः आजमावून बघितलेला उपाय आहे. असे दुखणे किती भयानक पणे त्रासदायक होऊ शकते हे फक्त समस्याग्रस्त व्यक्तीच समजू शकते.

बाजारात अनेक प्रकारचे मलम किंवा तेल उपलब्ध आहेत. डॉक्टरांकडे जाऊन आपण अनेक उपचार करतो. औषध गोळ्या टेस्ट सर्व करतो फिजिओथेरपी देखील करतो. या सगळ्या सोबत हा घरगुती उपाय जर तुम्ही करून बघितला तर आम्हाला खात्री आहे ९९% तुमचे दुखणे थांबेल. उपाय बघण्याआधी वर दिलेले दुखणे का होते ते नीट माहिती करून घेऊ.

पहिलं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव शारीरिक हालचालींची कमतरता होय. चुकीच्या पद्धतीने बसणे. यामुळे खांदे, पाठ,कंबर, मान दुखण्यास प्रारंभ होतो. वयोमानानुसार गुडघ्यातील वंगण कमी होणे. शरीरात अनेक गरजू पोषक तत्वांची कमतरता जसे की कॅल्शियम इत्यादी कमी असणे ही चार कारण आहेत वरील दुखणे उद्भवण्याची.

हे वाचा:   हा उपाय पोटातला गॅस वाढू देतच नाही.! कितीही असू द्या ऍसिडिटीचा त्रास होईल ऍसिडिटी ना येईल पुन्हा पुन्हा पाद.!

यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत एक अनोखा उपाय. या उपायाच्या केवळ सलग दहा दिवस प्रयोगाने वर दिलेली सर्व दुखणे होतील ठीक. यासाठी आपल्याला लागणार आहे खाण्याचा एक वाटी डिंक. डिंक आपल्या हाडांना बळकटी देतो. पेशी नसा दुखणं देखील थांबत. दुसरा घटक म्हणजे दोन मोठे खडे, धागे वाली खडीसाखर. मधुमेह असलेल्यांनी खडीसाखर टाळावी.

खडीसाखरेमुळे शरीरातील थकवा दूर होऊन चांगली झोप लागते. या दोन्ही गोष्टी मिक्सरवर बारीक वाटून घ्या. अर्धा ग्लास उकळलेले दूध घ्या. दूध कोमटसर असावे. यामध्ये अर्धा चमचा डिंक पावडर आणि आपल्या आवडीनुसार कमी जास्त गोड असे खडीसाखरेचे पावडर यात घाला. हे मिश्रण नीट मिक्स करा. याचा प्रयोग सकाळी रिकाम्या पोटी आणि संध्याकाळी जेवणानंतर झोपताना करावा.

हे वाचा:   सर्दीमुळे ताप येणार नाही.! सर्दीचा त्रास होणार नाही.! आयुष्यात कधीही झाली सर्दी-ताप-थंडी तर पटकन करायचे हे एक काम.!

सलग दहा दिवस हा प्रयोग केल्याने आश्चर्यकारक फायदा तुम्हाला दिसून येईल. तुमची असलेली गुडघे दुखी, कंबर दुखी, सांधे दुखी, खांदे दुखी, मान-पाठ दुखी सर्व काही ठीक होईल. दहा दिवसानंतर फक्त सकाळी रिकाम्या पोटी एकदाच असे दूध सलग दोन ते तीन महिने घेतल्याने अशी समस्या मुळापासून समाप्त होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *