मंडळी सर्व प्रकारच्या रोगांचे मूळ हे आपल्या पोटामध्ये असते. पोट साफ तर तुमचे आरोग्य चांगले, शरीर सुदृढ राहते. आपल्यापैकी बर्याच जणांना पोटाच्या तक्रारी कधी ना कधी भेडसावतात. पोट साफ न होणे, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यांसारख्या पोटाच्या अनेक तक्रारी मुळे शरीरावर किती वाईट परिणाम होतात हे आपल्याला माहित देखील नसेल.
अकारण वजन वाढत जाते चरबी वाढत जाते. केस गळती च्या समस्या देखील उद्भवतात. त्वचेवर फोड येणे त्वचा निस्तेज दिसू लागणे हे देखील पोट साफ नसल्यामुळे होते. नियमित योग्य वेळेत पोट साफ होणे किती महत्त्वाचे आहे याचा तुम्हाला आता थोडा अंदाज आला असेल. बाजारात अनेक प्रकारचे लिक्विड, गोळ्या, जेल पोट साफ करण्यासाठी उपलब्ध आहेत.
आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सुचवणार आहोत ज्यामुळे तुमचे पोट एकदम साफ होईल ते ही नैसर्गिक प्रकारे वापरलेल्या घटकांमुळे. आम्ही सांगितलेला उपाय तर तुम्ही नक्की करून बघाच पण सोबतच 45 मिनिटे चालणे हलका व्यायाम हे देखील तुम्ही केले पाहिजे. चला तर मग पाहूया हा उपाय कसा करायचा.
या उपायात आपल्यला लागणार आहे जिरा, ओवा, काळ मीठ, लिंबू, आलं असे पाचक घटकच लागणार आहेत. दोन चमचे ओवा, दोन चमचे जीरा एका पॅन मध्ये घेऊन मंद आचेवर पाच मिनिटासाठी भाजावे. यात एक चमचा बडीशेप घालून मिक्सर मध्ये वाटून घ्या. यात अर्धा चमचा काळे मीठ घालावे. रक्तदाब असल्यास मिठाचे प्रमाण कमी करावे. हे झाले आपले चूर्ण तयार..!
एका बाटलीमध्ये भरून साठवून ठेवा. रात्री जेवण झाल्यावर एक तासाने गरम पाण्यासोबत एक चमचा हे चूर्ण घ्यावे. सकाळी उठल्यावर तुमचं पोट अगदी सहज साफ झाल्याचे तुमच्या निदर्शनास येईल. तुम्हालाच प्रसन्न वाटेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.