सर्दी खोकल्याच्या साथी पासून मिळेल कायमचा आराम.! फक्त पाच मिनिटे करा हा उपाय.! सर्दी खोकला झटपट होईल बरा.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जुना आजीबाईचा बटव्यातील अद्भुत उपाय ज्यामुळे छातीत साठलेला कफ, खोकला सर्दी इत्यादी समस्यांचे त्वरित निवारण होईल. अत्यंत असरदार असा हा घरगुती उपाय आहे. यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. त्यामध्ये लागणाऱ्या वस्तू देखील तुम्हाला सहज उपलब्ध होतात. याशिवाय त्या फार महागही नसतात.

हा उपाय काय नवीन नाही, आपल्या पूर्वीपासून चालत आलेला आहे तोच आम्ही तुमच्या सोबत शेयर करत आहोत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत खाण्याचे विड्याचे पान. याचा वेल तुम्ही घरी देखील लावू शकता किंवा पानाच्या दुकानातून ताजं पान विकत आणा. या उपायासाठी तुम्हाला केवळ एकच विड्याचे पान लागणार आहे.

अनेक रोगांवर औषध म्हणून आरोग्याच्या दृष्टीने विड्याचे पान फायदेशीर ठरते. भूक वाढविण्यासाठी तसेच मधुमेहावर देखील विड्याचे पान गुणकारी आहे. कितीही भयंकर डोकेदुखी असू दे किंवा कितीही चिघळलेली जखम असुदे विड्याच्या पानाने सर्व होते ठीक. पोटाशी निगडित सर्व समस्या, तोंडाची दुर्गंधी येणे, दात दुखी यासोबतच चेहरा सुंदर करण्यासाठी सौंदर्यप्रसाधनांमध्ये देखील वापरले जातात त्या विड्याचे पान.

हे वाचा:   डोक्यावरच्या केसांना आता वाढल्या शिवाय पर्यायच नाही.! आवळ्याचा हा उपाय अनेक महिलांना लांबसडक केस देऊन गेला.!

यामुळे तुमच्या तोंडाला चव देखील येते. तुमच्या छातीमध्ये कितीही कफ असू दे, खोकून खोकून घसा दुखत असेल, सर्दीमुळे नाक बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील होते. अशा सर्व प्रकारच्या समस्या देखील दूर होतात या उपायाने. या उपायात घेतलेली विड्याची पाने स्वच्छ धुऊन कोरडी करूनच वापरावीत. या उपायासाठी दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे चार पाच तुळशीची पानं.

जे वापरण्याआधी स्वच्छ धुऊन घ्या. घरात प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळशीचे रोप असतेच. आयुर्वेदामध्ये तुळशीला अत्यंत प्रमुख वनस्पतींपैकी एक असे महत्वाचे स्थान दिले आहे. तुळशीमध्ये देखील सर्दी, खोकला, अंगदुखी हे रोग बरे करण्याची मोठी ताकद असते. तुळशीच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरीयल अँटी फंगल anti-inflammatory गुणधर्म असतात.

तुळशीच्या पाना सोबत मधाचे सेवन केल्याने देखील खोकला कमी होतो. एका विड्याच्या पानामध्ये चार ते पाच तुळशीची पाने घाला. या उपायांमध्ये तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे दोन काळीमिरी. काळी मिरी मुळे खासकरून तुमच्या घशाला आराम मिळेल. प्रत्येक घरातील स्वयंपाक घरात काळीमिरी असते ज्याचा आपण मसाल्यात वापर करतो.

हे वाचा:   शरीरातली सगळी गर्मी, लघवीला होत असलेली जळजळ, सगळ काही एकदम बर करता येते, त्यासाठी हा अगदी सोपा घरगुती उपाय करायलाच हवा.!

अन्नपदार्थांचा स्वाद वाढविण्यास सोबतच आपल्या तब्येतीसाठी देखील काळीमिरी उत्कृष्ट आहे. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. विड्याच्या पानाचे देठ काढून घ्या. यामध्ये कांद्याची एक छोटी फोड, दोन काळीमिरी, चार पाच तुळशीची पान हे सगळं ठेवून पान गुंडाळून हे चावून खा. तुमचे कितीही जुनाट खोकला, सर्दी, छातीत साचलेला कफ असेल तरी सर्व होईल गायब.

हा उपाय 100% काम करेल. याशिवाय पंधरा विड्याची पाने तीन कप पाण्यामध्ये उकळून त्यामध्ये मध घाला. असे पाणी पिल्याने जुना कफ बाहेर पडून तीव्र खोकल्या मध्ये आराम मिळेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *