तोंडाला चव राहिली नाही का.? अन्नाचा वास सुद्धा येत नाही का.? घरीच या गोष्टींचे सेवन करा सर्व समस्या होतील दूर.!

आरोग्य

अनेकांना आरोग्य संबंधीच्या अनेक समस्या उद्भवलेल्या दिसत असतात. त्यातीलच अशा काही समस्या असतात ज्यामुळे आपण खूपच हैराण होत असतो. अशाच काही समस्या म्हणजे ‘लॉस ऑफ स्मेल’ आणि ‘लॉस ऑफ टेस्ट’ म्हणजेच तोंडाला चव नसणे व कुठल्याही पदार्थाचा सुगंध न येणे. यासारख्या समस्या उद्भवल्या नंतर आपण खूपच घाबरून जात असतो. परंतु काही घरगुती उपाय केले तर या समस्या बऱ्या होऊ शकतात.

असे काही पदार्थ असतात ज्यामुळे या समस्या नष्ट होऊ शकतात. वास न येणे किंवा तोंडाला चव नसणे ही तशी खूपच भयंकर वाटणारी समस्या नाही परंतु तुम्ही काही घरगुती पदार्थ खाल्ले तर सहजपणे यातून मुक्ती मिळवू शकता. सर्वात आधी आपण हे बघूयात ही अशी समस्या का निर्माण होत असते. अशी समस्या निर्माण होण्याची अनेक कारणे सांगितली जातात. जसे की नॉर्मल सर्दी-खोकला होणे, हार्मोन्समध्ये बदल येणे, जास्त प्रमाणात गोळ्या औषधांचे सेवन करणे, जास्त प्रमाणात सि’गरेट पिणे.

हे वाचा:   चमचाभर मोहरी अशी वापरा, गजकर्ण बघायला सुध्दा उरणार नाही.!

अशा प्रकारच्या काही गोष्टी असतात त्यामुळे या समस्या आपल्याला उद्भवत असतात परंतु घरगुती काही पदार्थ जर खाल्ले तर तुम्ही या समस्या बऱ्या करू शकतात. एरंडीचे तेल यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकते. अनेकदा आपले सर्दी मुळे नाक कोंडले जात असते व यामुळे कुठल्याही पदार्थाची चव लागत नाही तसेच कुठल्याही पदार्थाचा वास आपल्याला येत नाही. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी एक ते दोन थेंब एरंडीचे तेल नाकात टाकले तर नाक मोकळे होते.

लसुन हा तोंडाला चव देण्यासाठी खूपच उपयुक्त मानला जातो. गरम पाण्यामध्ये थोडासा लसूण टाकून त्यात थोडेसे लिंबू पिळावे. हे पाणी सकाळच्या वेळी प्यावे यामुळे तोंडाला चव येत असते. तसेच पदार्थांची स्वाद घेण्याची क्षमता देखील वाढत असते. अनेकदा सर्दीमुळे छाती मध्ये भरपूर प्रमाणात कफ निर्माण होत असतो अशावेळी जर तुम्ही पुदिन्याचे पाने हे उकळून त्याचा काढा केला व त्यात थोडेसे मध टाकले तर ही समस्या देखील बरी होऊ शकते.

हे वाचा:   हा उपाय एकदा करा.! पावसाळा संपेपर्यंत घरात एकही डास घरात फिरकणार नाही.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *