मित्रांनो थंडीच्या दिवसांमध्ये चांगल्या प्रतीचे लिंबू भरपूर प्रमाणात येतात. बाजारात आणखी स्वस्त देखील मिळतात. गरजेचे आहे ते म्हणजे या लिंबांना कशा प्रकारे आपण साठवून ठेवू त्यामुळे ते लवकर खराब होणार नाहीत, याचे ज्ञान असणे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुटवडा जाणवल्यास लिंबु आपल्याला सहज उपलब्ध होईल. अगदी पाच ते सहा महिने अतिशय उत्कृष्ट प्रकारे तुम्ही लिंबू साठवून ठेवू शकता. त्याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.
लिंबामध्ये विटामिन सी मोबाईल प्रमाणात असते. एखाद्या औषधाप्रमाणे लिंबाचा वापर करून आपल्याला अनेक आजारांवर नियंत्रण ठेवता येते. अतिशय महत्त्वपूर्ण अशा गोष्टींपैकी एक म्हणजे लिंबू असे आयुर्वेदात सांगितले आहे. यामुळे पोटातील जंत कमी होतात, पोट दुखी कमी करता येते, भूक वाढते, कफ पित्त या मुळे होणारे आजार देखील कमी करता येऊ शकतात. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये देखील लिंबाचा वापर करता येतो.
त्वचेला केसांना वरदान आहे लिंबू. अगदी जेवायचे ताट वाढताना सुद्धा ताटाच्या कडेला मिठाच्या शेजारी लिंबाची जागा असते. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीचे लिंबाचे लोणचे देखील करतात. कच्च असू दे किंवा कितीही पिकलेले असू दे लिंबाची चव मात्र आंबटच राहते. तेव्हा पाहूयात आपला खट्टा नींबूडा दीर्घकाळासाठी कसा साठवायचा?
ट्रिक १. थोड्या दिवसांसाठी लिंबू ताजे ठेवायचे असेल तर यासाठी वर्तमानपत्राचे छोटे काप करून घ्या. यामध्ये एक एक करून लिंबू गुंडाळून ठेवा. एका बरणीमध्ये पेपर मध्ये गुंडाळलेले लिंबू फ्रीजमध्ये ठेवा. पंधरा दिवसांसाठी हे अगदी ताजे राहतात.
ट्रिक २. सुमारे एक महिन्यासाठी लिंबू साठवायचे झाल्यास यावरती कोणतेही रिफाइंड ऑइल किंवा नारळाचे तेल बोटानेच जसे कोटिंग करतात तसे एक एक करून लिंबावर लावा. हे सर्व लिंबू कोणत्याही साफ बॉक्स अथवा बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. लक्षात घ्या फ्रिजर नाही फ्रिज. एक महिन्यापर्यंत लिंबू खराब होणार नाहीत. वापरायच्या आधी फ्रीज मधून थोडा वेळ काढून ठेवा, मग वापरा. तुमचे काम सोपे होईल.
ट्रिक ३. मोठ्या प्रमाणात लिंब असतील आणि ते आपल्याला अनेक दिवस टिकून राहावे असे वाटत असेल तर, डाग नसलेले स्वच्छ लिंबू काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीत भरा. त्यामध्ये पूर्ण निंबू बुडतील इतके साधे पाणी ओता. त्यामध्ये वरचा थर एक वाटी व्हिनेगरचा घाला. बरणीचे झाकण लावून हे बरणी फ्रीजमध्ये ठेवा. कधीही बघा या पद्धतीने लिंबू साठवल्यास लिंबू ताजेतवाने राहील.
ट्रिक ४. ज्या लिंबावर डाग असतील तर ते लिंबू जास्त साठवून ठेवू शकत नाही. त्यासाठी काय करावे? त्यासाठी लिंबू कापून त्यातील रस काचेच्या भांड्यामध्ये काढून द्यावा. काचेचे भांडे नसल्यास रस कडवट होतो. या रसामधील बिया काढून घ्या. ता लिंबाचा रस बर्फाच्या साच्या मध्ये ओता. हा साचा रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी बर्फा प्रमाणे लिंबाचे क्यूब तयार होतील ते एका डब्ब्यामध्ये काढून घ्या.
पाच ते सहा महिने या पद्धतीने लिंबाचा रस तुम्ही टिकवू शकता. याची चव अगदी ताज्या लिंबाच्या रसाचा प्रमाणेच असते. या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये तुम्ही ताज्या लिंबाचा आस्वाद घेऊ शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.