डोके फुटून बाहेर येते की काय असे वाटते.? सतत डोके दुखी होते.? अशा लोकांसाठी आहे महत्वाची माहिती.! अशी माहिती कोणी सांगत नसते.!

आरोग्य

प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन असते या टेन्शनमुळे अनेकदा डोकेदुखीचा त्रास आपल्याला जाणवत असतो. डोकेदुखी जाणू लागल्यानंतर आपण सर्वात प्रथम काम करतो. ते म्हणजे डोके दुखी साठी औषध घेणे. मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण या कधीनाकधी डोकेदुखीच्या समस्येला सामोरे गेले असतील. अनेकदा हाल थोड्यावेळासाठी डोकेदुखी होते आणि आपोआप बरी होते. परंतु वारंवार सतत होणारी डोकेदुखी असेल तेव्हा ते गंभीर ठरू शकते. डोकेदुखी होण्याचे अनेक कारण आहेत जसे जेवण वेळेवर न केल्याने किंवा स्नायूंवर ताण पडल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.

अनेकदा शुद्ध हरपते गोंधळायला होते दृष्टीत फरक पडतो आणि शरीर देखील अशक्त होऊ लागते. तेव्हा आपल्या डोकेदुखीचा प्रकार माहीत असणे महत्त्वाचे आहे. मायग्रेन व क्लस्टर हे व्हॅस्क्यूलर डोकेदुखी चे प्रकार आहेत. आपल्यापैकी आजकाल बर्‍याच जणांना मानसिक ताणतणावामुळे होणारी डोकेदुखी ही सर्वत्र आढळून येते. मायग्रेन च्या डोकेदुखीच्या प्रकारांमध्ये एका बाजूला खूपच दुखत राहते.

यामुळे उलटी होणे प्रकाश सहन न होणे दृष्टीत गोंधळ चक्कर येणे थंडी वाजणे अशी लक्षणे देखील आढळून येतात. अल्कोहोल कॅफिन यामुळेदेखील मायग्रेन उद्भवते. अनेकजणांना सर्दी ताप खोकला झाला की डोकेदुखी होते ही वेगळ्या प्रकारची डोकेदुखी होय. कोणत्याही प्रकारची डोकेदुखी असू दे यामध्ये सर्वात पहिला नियम म्हणजे वेळेत पुरेशी प्रमाणात झोप घेणे शिवाय मानसिक ताणतणावापासून शक्यतो दूर राहणे.

हे वाचा:   कारखान्यातून तुमच्या दारात दूध कसे येते माहिती आहे का.! शेतकऱ्याच्या दारातून आलेल्या शुद्ध दुधावर केली जाते अशी काही प्रक्रिया.!

चालणे पोहणे वाचन करणे यासारखे मन रमणाऱ्या गोष्टी करणे. लक्षात ठेवा मनाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर तुमचे पूर्ण शरीर देखील सुदृढ राहील. तेव्हा मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ दोन्ही गोष्टी जपा. या सोबतच आम्ही तुम्हाला सुचवत आहोत एक उपाय जो केल्यावर तुमचा डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे काळीमिरी, साजूक तूप या दोन्ही गोष्टी.

दररोज काळीमिरी व अर्धा चमचा साजूक तूप याच सेवन तुम्ही करावे. लक्षात घ्या यापेक्षा जास्त काळीमिरी तुम्ही खाऊ नका कारण प्रकृतीने उष्ण असते काळी मिरी. काळी मिरी चे चव आवडतं असल्यास आम्ही तुम्हाला दुसरा घटक सांगतो. तो म्हणजे गुळ. गुळाचा छोटा खडा घ्या. या सोबत अर्धा चमचा साजूक तूप तुम्ही सेवन करून बघा. मधुमेह असलेल्यांनी काळीमिरी व तुपाचे सेवन करावे.

हे वाचा:   अंग दुखी, हाडे दुखणे होईल बरे.! सांधे दुखी वर करावा हा रामबाण उपाय.! कुठलीही सूज झटपट वसरली जाईल.!

सलग दहा दिवस हा उपाय तुम्ही करून बघा. जाऊ पण यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू उच्चप्रतीचे असाव्यात. प्रमाणाचे भान असावे आणि शेवटची गोष्ट म्हणजे हा उपाय करण्याची वेळ याचे लक्ष असू द्यावे. या तीनही वस्तू आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होतात. शिवाय घरगुती उपाय असल्यामुळे खर्चही कमी आणि मुख्यतः या वस्तूंचा तुमच्या शरीराला कोणताही साईड इफेक्ट नाही.

याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तुमची डोकेदुखीची समस्या मुळापासून संपणार आहे तसेच मायग्रेनचा त्रास देखील होणार नाही. हा उपाय तुम्ही अवश्य कराच परंतु या सोबतच सांगितलेला टिप्स देखील तुम्ही अवश्य पाळा. मानसिक ताणतणावापासून मात्र शक्यतो दूरच राहा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.