अंघोळीपूर्वी शाम्पू मध्ये ही एक गोष्ट नक्की मिळवा.! त्यानंतर जे होईल ते कमालच असेल.! केसांची वाढ दुपटीने होईल.!

आरोग्य

मित्रांनो एकदा का एखाद्या व्यक्तीचे केस गळणे सुरु झाल्यास त्यांना रोखणे असंभव असे वाटू लागते. कारण आपल्याला केस गळतीचे मुख्य कारणच माहीत नसते. यामुळे लाख प्रयत्नानंतर देखील डोक्यावरचे केस हळूहळू विरळ आणि कमी होऊ लागतात. जेव्हा आपण आरोग्याच्या कुठल्याही समस्याने त्रस्त असतो, त्यावर उपाय करण्यापूर्वी त्यामागील मूळ कारण आपल्याला ठाऊक असले पाहिजे.

यामुळे आपण अशा चुका करणे बंद करतो आणि आपल्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागते. आज आम्ही तुम्हाला शेयर करणार आहोत अशा काही घरगुती उपाय याबद्दल आणि काही नेहमीच्या सवयीबद्दल ज्यामुळे तुम्ही आपल्या गळणाऱ्या केसांवरती उपाय करू शकता आणि विरळ केस पुन्हा एकदा दाट होऊ लागतील. शरीरात पोषक तत्वांची कमतरता हे केस गळण्याचे प्रमुख कारण होय.

८०% लोकांचे केसं यामुळेच गळतात. लोह, बायोटीन, व्हिटॅमिन बी 3 निअसिन, फॅटी ऍसिड, सेलिनिम, व्हिटॅमिन A, D, E, अमिनो ऍसिड, प्रोटीन आणि फॉलिक ऍसिड हे सर्व घटक केसांसाठी मुख्यत: गरजेचे असतात. त्यांच्या कमतरतेमुळे तुमचे केस तेजीने गळू लागतात. या पोषणतत्वांची कमतरता आपल्या शरीरात का होते?

रोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या फळे यांचा समावेश नसणे यासोबतच वेळेवर अन्न न खाणे यामुळे अनेक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. धूम्रपान, नशा, दारू पिणारे लोकं त्यांच्या शरीरातील सर्व पोषक तत्व लवकर निघून जातात. अशात केस गळण्या सोबत लवकर पिकू लागतात. सलग व्यवस्थित पुरेशी झोप न होणे हे देखील केस गळतीचे मोठे कारण होय.

हे वाचा:   सुक्या खोबऱ्याचे असे चमत्कारी फायदे, कधी विचारही केला नसेल या फायद्या बद्दल.!

छोटा-मोठा सर्दी-खोकला-ताप येण्यावर गोळ्या खाण्याची सवय असलेल्यांचे केस देखील लवकर गळू लागतात. मासिक पाळी मध्ये अति रक्तस्राव होणे आणि गर्भवती महिलांमध्ये केस गळतीचे प्रमाण जास्त दिसून येते कारण आहे लोहाची कमतरता. रोज पोट व्यवस्थित साफ नसणे, केसांच्या तक्रारी असलेल्या व्यक्तीचे कंगवा टॉवेल इत्यादी वस्तू वापरणे, बाजारात उपलब्ध असल्या तऱ्हेतऱ्हेच्या रासायनिक उत्पादन.

जसे तेल, जेल शाम्पू, कंडीशनर, रंग, पार्लर मधील केसांना अती हिट देणाऱ्या प्रक्रिया यामुळे केसं खराब होतात. वर सांगितलेल्या कारणांमध्ये तुमचे केसं गळण्याचं मुख्य कारण शोधून त्यामध्ये सगळ्यात आधी सुधारणा करा. केस धुण्यासाठी जो शाम्पू वापरतो त्यामध्ये जास्त करून सोडियम लॉरयल सल्फेट, पॅराबेनस, ट्रायक्लोजन सापडते. केस धुण्यासाठी नेहमी हर्बल किंवा बेबी शाम्पू चा वापर करावा.

केसं धुताना आपल्या शाम्पू मध्ये एक चमचा ताज्या आवळ्याचा रस एक चमचा कोथिंबिरीचा रस आणि एक चमचा नारळाचे तेल घालावे. त्यामुळे तुमच्या केसांचा पोत सुधारेल आणि केस गळती थांबेल. आवळ्याचा रस उपलब्ध नसल्यास त्यामध्ये लिंबूचा रस वापरला तरीही चालेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळेस आपल्या डोक्याचा केसांचा नारळाचे दूध, एरंडीचे तेल आणि मध मिक्स करून व्यवस्थित मसाज करावा यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळती थांबते.

हे वाचा:   लाखो लोक याला कचरा समजून फेकून देतात .! परंतु निघाली आयुर्वेदातील खूप मोठी वनस्पती याचे फायदे बघून स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा विश्वास राहणार नाही.!

नवीन केस उगवण्यास सुरुवात होते. केसं धुताना कधीही अति गरम किंवा कडक पाण्याचा वापर करू नये यामुळे जास्त केस गळू लागतात. बऱ्याच पुरुषांमध्ये टाळूवरील मस्तकावरील केस गळतीचे प्रमाण जास्त दिसून येते. स्त्रियांमध्ये देखील साईडचे किंवा मस्तकावर चे केस विरळ दिसतात यासाठी एक चमचा लिंबू च्या बिया, एक चमचा कलौंजी दोन काळीमिरी मिक्सरवर बारीक वाटून घ्या.

यामध्ये पाणी घालून ही पेस्ट विरळ केस असलेल्या जागी दररोज 15 ते 20 मिनिटांसाठी लावा. काळीमिरी मुळे त्वचेवर थोडी खाज येऊ शकते. परंतु या उपायांमुळे तुमचे केस गळायचे थांबतात आणि विरळ जागी नवे केस फुटू लागतात. सुरुवातीला नमूद केलेल्या पोषक घटक असलेल्या आहाराचा समावेश दररोज अवश्य करावा. बाहेरून कितीही उपाय केले तरीही आतून शरीर स्वस्थ असेल तर केस चमकदार आणि निरोगी राहतील.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *