हातापायांना मुंग्या येणे, हातांच्या नसाचे दुखणे किंवा नसांची कमजोरी, शरीराच्या सर्व नसा मोकळ्या करा.!

आरोग्य

अनेकदा हातांच्या दुखणाऱ्या नसा रात्री झोपेच्या वेळी प्रचंड प्रमाणात दुखू लागतात यामुळे आपल्याला निवांत झोप देखील लागत नाही. अशाप्रकारचे रुग्ण सांधे दुखणे उद्भवणा-या मागे अनेक वेगवेगळी कारणे आहेत. जसे की आपण अनेकदा खुर्चीत बसताना आपल्या शरीराच्या पोश्चरकडे दुर्लक्ष करतो. आपले उठणे, वाकणे, बसणे, जड सामान उचलणे किंवा झोपताना अंगाखाली येऊन शरीराचा अवयव अवघडणे.

यामुळे स्नायू दुखावला जाऊन नसांमध्ये वेदनेची तीव्रता जाणवू लागते. अनेकदा अचानक होणारा अपघात यामुळे लागलेला झटका देखील याला कारणीभूत ठरतो. यावर आम्ही तुम्हाला एक असा व्यायाम सुचवत आहोत जो पाच मिनिट केल्याने तुम्हाला त्वरित लाभ मिळेल. दहा ते पंधरा दिवस सलग केल्याने ही समस्या मुळापासून नष्ट होईल. नसा ओढल्या गेल्याने, दबल्या गेल्यामुळे हातामध्ये असे दुखणे सुरू होते.

यासोबतच बऱ्याचदा नसांमधील रक्तप्रवाह व्यवस्थित नसल्यामुळे देखील नसा दुखू लागतात. तुम्ही नियमित व्यायाम करा आणि सांगितल्याप्रमाणे हा उपाय केला तर तुम्हाला अशी समस्या असेल तर ती जाईल याचं परंतु भविष्यात अशी समस्या तुम्हाला कधीही त्रास देऊ शकणार नाही. समूळ नष्ट करेल हा उपाय असे नसांचे दुखणे.

उपाय १: ज्या लोकांचे वय झाले आहे ते लोक अशा दुखणार्‍या भागावर मसाज करू शकतात. असा मसाज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे निलगिरीचे तेल. निलगिरीचे तेल तुम्हाला बाजारात अगदी कमी किंमतीत सहजरित्या उपलब्ध होईल. तुम्ही असे तेल घरी देखील बनवू शकता. याची रेसिपी देखील आम्ही पुढे कधीतरी तुमच्या सोबत शेअर करू.

हाता मध्ये होणारे दुखणे अनेकदा इतके वाढते की आपण हात उचलल्यानंतर ते आपल्याला अवघड जाते आपले हात सहजासहजी उचलल्या जात नाही. आपल्याला त्रास होतो. तरीदेखील हात उचलल्यास भयंकर दुखणे जाणवते. अशा प्रकारच्या दुखण्या मध्ये आपल्या हाताचे आणि खांद्याचे निलगिरीच्या तेलाने हलक्या हाताने मसाज करावे. हे तेल लावते वेळी एका वाटीत काढून घ्या व गरम पाण्यामध्ये ही वाटी थोडा वेळ धरून अशा पद्धतीने गरम करून घ्या.

हे वाचा:   दहा रुपयांच्या बिस्कीट पासून बनवा ही अनोखी रेसिपी.! खाणारे कौतुकाचा वर्षाव करेल.! 10 रुपयात सर्वांना करा खुश.!

कमीत कमी पाच ते दहा मिनिटे अशा पद्धतीने मसाज करावा. जर तुम्हाला गुडघेदुखी सांधेदुखी कंबरेचे दुखणे असेल तर त्याजागी देखील तुम्ही अशाप्रकारे या तेलाने मसाज करू शकता. हातांमध्ये असणारी नसांची समस्या मांस पेशी आखडलेल्या गेल्या असतील तर, हात उचलल्या जात नसतील तर किंवा झोपताना रात्रीच्यावेळी हातामध्ये जास्त दुखणे होत असेल तर अशा वेळी हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा.

ज्या लोकांचे वय कमी आहे किंवा जे व्यायाम चांगल्या प्रकारे करू शकतात अशा लोकांना कोणत्याही प्रकारच्या मसाजची आवश्यकता नाही. कमी वय असलेल्या नि अशा प्रकारचे तेल लावून हा उपाय करू नका त्यांनी व्यायामा सोबतच पुढील उपाय करावा. उपाय २: कमी वय असलेल्यांनी हा उपाय करावा. जर तुम्हाला रात्री झोपेच्या वेळी अथवा काम करतेवेळी बसताना जास्त दुखणे जाणवत असेल तर हा उपाय जो आम्ही सांगत आहोत सलग तीन दिवस करून बघावा.

सकाळी रिकाम्या पोटी हा उपाय करावा. फक्त सलग तीन दिवस उपाय करण्याची गरज आहे जास्त दिवस हा उपाय करू नये. परंतु या सोबतच केला जाणारा व्यायाम मात्र नियमित स्वरूपात असावा. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे दालचिनीची पावडर. जी तुम्ही घरी देखील बनवू शकता किंवा बाजारात देखील मिळते. दालचिनी पावडर तुमच्या शरीरात असणाऱ्या कोणत्याही प्रकारचे दुखणे संपवण्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.

हे वाचा:   कितीही जुनाट मूळव्याध असू द्या.! या सोप्या उपायाने १००% गुण येणार.! रक्त पडत असेल तर होईल बंद.!

दालचिनी पावडर च्या सेवनाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे दुखणार तर होते कमी सोबतच नसांमध्ये तो रक्तप्रवाह अडखळला आहे किंवा नियमित होत नाही तो देखील सुरळीत होऊ लागतो. पाव चमचा दालचिनी पावडर तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये घालून हे पाणी प्यायचे आहे. म्हणजे जवळजवळ तीन ग्रॅम दालचिनी पावडर एका वेळेस अशा पद्धतीने सेवन करायचे आहे. लक्षात ठेवा दालचिनी उष्ण प्रकृतीची असल्यामुळे याच्या पेक्षा जास्त प्रमाणात तुम्ही याच सेवन करू नये.

नाहीतर कारण शरीरातील उष्णता भडकेल. फक्त सलग तीन दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. लक्षात ठेवा यासोबतच नियमित दिवसातून दोन वेळेस तुम्हाला व्यायाम करायचा आहे. घराचा हाताला मुंग्या येऊन हात सुन्न पडतो. यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करा. कोणता व्यायाम कराल? सूर्यनमस्कार हा एक अत्यंत प्रभावशाली व्यायाम आहे. यासोबतच हात घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असे क्रमाक्रमाने दहा वेळा गोलाकार फिरवा. सुरुवात पाच वेळेपासून केली तरी चालेल.

हात कोपऱ्यामध्ये आत दुमडून पुन्हा घडाळ्याच्या आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असे दोन्ही वेळेस दहा वेळा गोलाकार फिरवा. थोडक्यात काय तर तुमच्या हाताला आणि खांद्यांना हलचाल होऊन नसा ताणल्या गेल्या पाहिजेत. सलग अशा प्रकारचे विविध व्यायाम करून तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. लक्षात ठेवा केवळ एकाच हातामध्ये दुखणे असेल तरीदेखील व्यायाम मात्र दोन्ही हातांचा करावा. जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *