नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मूळव्याध आणि त्यावरील उपचारांबद्दल सबंध विस्तार पणे माहिती..! सगळ्यात आधी पाहुयात मूळव्याध का होतो? त्याची लक्षणे कोणती आणि त्यावर काय घरगुती उपाय आहेत याबद्दल.. याठिकाणी लक्षात घ्या मूळव्याध होण्यासाठी कोणतेही एक कारण जबाबदार नाही याला अनेक कारणे असू शकतात.
दिलेल्या माहितीवरून तुम्ही तुमचे नेमके कारण शोधा आणि त्यामध्ये सुधारणा करा. हाच प्रार्थमिक उपाय होय. चुकीच्या खाण्याच्या पद्धती, बद्धकोष्ठता, सततचे बसून करावे लागणारे काम, अनुवंशिकता गर्भवती महिला अथवा लठ्ठपणा असल्यास देखील मूळव्याधीच्या समस्या उद्भवतात. नियमितपणे पोट साफ झालेच पाहिजे. नसल्यास तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
पुढे जाऊन याच समस्या गंभीर स्वरुपाच रूप धारण करतात. त्यापैकीच एक समस्या म्हणजे मुळव्याध होय. आहारामध्ये पोषक तत्वांचा अभाव, शौचास अधिक प्रमाणात त्रास होणे काहीवेळा रक्तही जाते. त्या जागी कोंब किंवा मोड येतात सूज येते. काहींना वेदना होऊन खाज देखिल येते जळजळ होते, आग होते. लक्षात घ्या तुम्हाला असलेल्या लक्षणावरून मूळव्याधीचा प्रकार आणि स्थिती यावर उपचार अवलंबून असतात.
तेव्हा गंभीर शस्त्रक्रिया पासून दूर राहायचे असल्यास आधी कोणत्या प्रकारचे मुळव्याद आहे ते डॉक्टरांकडून व्यवस्थित तपासून घ्यावे. आता पाहुयात मूळव्याधीमध्ये काही घरगुती उपाय जे तुम्हाला फायदेशीर ठरतील. परंतु यासोबतच आपल्याला दैनंदिन जीवनशैली आणि आहारात मात्र बदल करणे गरजेचे आहे हे लक्षात घ्या. मुळव्याधी मध्ये होणारी वेदना आणि सूज कमी करण्यासाठी त्या जागी कोरफडीचा गर लावावा.
असं केल्याने तुम्हाला आराम मिळेल. यासोबतच मूळव्याधीमध्ये कोंब असल्यास त्या ठिकाणी ऑलिव्ह ऑइल देखील लावू शकता यामुळे सूज कमी होते. त्याचप्रमाणे बदाम तेल लावल्याने आग देखील कमी होते. असं म्हणतात नारळाची शेंडी जाळून त्याची राखेचे पावडर बनवा. अशी ही पावडर दररोज सकाळी अनुशापोटी ताकातून घ्या. पाऊस मध्ये होणारी आग शमवण्यासाठी जिरे पाण्यासोबत बारीक वाटून पेस्ट बनवा ती त्या ठिकाणी लावा.
यासोबतच टंटणी या झाडाचे पाच पाने घेऊन अर्धा ग्लास पाणी घ्या. हे दोन्ही एकत्र करून अर्धे पाणी होईपर्यंत उकळवा. गाळून घ्या. असे पाणी सकाळ-संध्याकाळ एक वेळेस एक कप अशा प्रमाणात सेवन करावे. तुम्हाला मूळव्याधीमध्ये नक्कीच फरक जाणवेल. एक चमचा टंटणी च्या मुळाचे चूर्ण एक चमचा हिरड्याच्या मुळाचे चूर्ण कोमट पाण्यामध्ये मिक्स करा.
रोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी हे पाणी तुम्ही सेवन केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल. या उपायामुळे रक्त पडणारी मूळव्याध देखील बरी होते. गॅस व अपचन होत असलेल्या व्यक्तीने देखील घाणेरी म्हणजेच टंटणी या वनस्पतीचे तीन पाने जेवणानंतर चावून खावीत. पोटात कृमी जंत झाले असल्यास या वनस्पतीची फुलं आणि पान एकत्र करुन चावून खाल्ल्याने दोन दिवसातच कृमी जंत पडून जातील.
मूळव्याधीची समस्या असल्यास आहारातील काही गोष्टी टाळाव्यात/वाढवाव्यात त्या आहेत खालील प्रमाणे: आहारात फायबर युक्त अन्नपदार्थांचे सेवन वाढवावं. हिरव्या पालेभाज्या, फळे आणि सॅलड यांचा समावेश करावा. नियमित जिरे ताक प्या. तळलेले, मसालेदार, चमचमीत खारट असे पदार्थ खाण्याचे टाळावे. फास्ट फूड/ जंक फूड, बेकरीचे पदार्थ तसेच पचायला जड असे पदार्थ टाळा. लक्षात घ्या शरीरांना आवश्यक त्या प्रमाणात पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे.
नियमित व्यायाम करा तसेच खूप वेळ एका ठिकाणी बसून राहू नका. छोट्या छोट्या गोष्टीत काळजी घेतल्याने देखील मुळव्याधा पासून तुमची नक्कीच सुटका होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.