सतत अर्धे डोके का दुखत असते.? त्यामागे असते हे एकमेव कारण.! काहीच नाही ह्या काही गोष्टी थांबवायच्या डोके आपोआप थांबते.!

आरोग्य

नाव जरी अर्धशिशी असल तरी यात बऱ्याचदा पूर्ण डोके पण दुखते इतकं की अगदी घाव घातल्यासारखे वाटते,असह्य वेदना होतात. आपल्यापैकी बर्‍याच जणांना अशा प्रकारचा त्रास झाला कधी ना कधी सामोरे जावेच लागते. मायग्रेन हा आजार पित्त आणि रक्त आणि थोड्या प्रमाणात वात यांना धरून होणारा आहे.त्यामुळे तरुण वयात साधारण २५ ते ४५ वयापर्यंत हा त्रास जास्त होतो कारण तरुणपणी शरीरात पित्ताचे आधिक्य असते..

आणि याच वयात unhealthy lifestyle मुळे जसे की उपवास,रात्री जागणे,उशिरा उठणे, junk food ,left over food खाणे,वेळी अवेळी जेवण,cold drinks पिणे यांनी हा त्रास अधिक वाढतो.त्यामुळे अर्धशिशी च्या पेशंट नी या गोष्टी टाळाव्यात नाहीतर औषधे ही काम करत नाहीत.. वारंवार pain killer घेणे हे काही solution नाही..

“जिथे धूर आहे तिथे आग असणारच” या उक्ती प्रमाणे जिथे रोग आहे तिथे काहीतरी त्याचे कारण असणार च.. शरीराच्या खोड्या काढल्या , दिन चर्या ,ऋतू चर्या follow केली नाही,जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वेडे वाकडे खाल्ले की आजार झालेच म्हणून समजा.. बऱ्याच स्त्रियांच्यात पा’ळी च्या मागे पुढे अर्धशिशी जास्त जाणवते.अशा वेळी पाळीच्या काही तक्रारी आहेत का ते तपासावे लागते..त्याची ट्रीटमेंट केली की मायग्रेन चा त्रास कमी झालेला दिसतो.

हे वाचा:   तरुणांसाठी आनंदाची बातमी.! तरुणपणी सफेद केस होण्याचे कारण सापडले.! असा करावा त्यावर उपाय.!

constipation / पोट साफ न होणे आणि मायग्रेन हे पण खूपदा एकत्र दिसतात..रोजच्या रोज सकाळी उठल्यावर पोट साफ झालेच पाहिजे..kitchen मधला ओला कचरा दोन दिवस बाहेर टाकला नाही तर कुजतो आणि दुर्गंधी पसरते..त्याचप्रमाणे शरीरातून मल रोज बाहेर पडणे अपेक्षित आहे नाहीतर तो कुजतो. आणि आजाराला निमंत्रण मिळते.

काही patient ना उन्हात गेले की डोके दुखायला लागते अशावेळी टोपी किंवा छत्रीचा न कंटाळता वापर करावा.. रोज रात्री झोपताना नाकात २ थेंब शुद्ध तूप किंवा अणू तेल घालावे..चांगला परिणाम जाणवतो . फक्त सातत्य हवे. acidity,gases आणि मायग्रेन असा तक्रारींचा त्रिवेणी संगम पण बऱ्याच पेशंट मध्ये पाहायला मिळतो. इथे परत पचन व्यापार बिघडला आहे.

तो दुरुस्त करणे गरजेचे असते. नुसती symptmatic treatment घेऊन जुने आजार कमी होत नाहीत तर त्याच्या मुळाशी घाव घालवा लागतो. नाहीतर जोपर्यंत औषधे चालू आहेत तोपर्यंत आराम मिळतो पण ट्रीटमेंट थांबली की त्रास पुन्हा सुरू.. ही शुद्ध चिकित्सा नाही. यासाठी अति विचार करणेची सवय असल्यास ती त्वरित थांबवा. वेळेत झोपा वेळेत उठा.

हे वाचा:   तांबे, पितळाचे भांडे जास्त घासत बसायचे नाही.! त्यावर टाकायचा हा एक पदार्थ तिसऱ्या मिनिटाला भांडी चमकू लागतात.!

इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे मोबाईल लॅपटॉप टीव्ही यांचा कमीत कमी वापर करा. या आरती दैनंदिन किरकोळ सवय आहेत ज्या बदलणे आपल्या हातातच आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या आरोग्याचा फरक पडेल. बाकी आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे तुमच्या वैयक्तिक प्रकृतीनुसार उपाय तुम्ही करालच…! आणि आम्ही सुचवलेले काही उपाय ते देखील करून बघा याचा तुम्हाला फायदा होईल. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.