मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुमचे हे कितीही पांढरे झालेले केस घरच्या घरी होणार आता काळे काळेभोर ते ही कोणत्याही साइड इफेक्ट शिवाय. आज काल आपण आपल्या बाजूला पाहत असाल तर वृद्ध व्यक्तींचे नाही तर तरुण मुलांचे देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात पांढरे केस झालेले दिसून येतात. यालाच आपण अकाली केस पिकणे अशी समस्या म्हणतो. वयोमानानुसार केस पिकणे ही सहाजिकच बाब आहे.
एका सर्व्हे मधील आकडेवारीनुसार अकाली केस पिकणे याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ताणतणाव. त्याखालोखाल केमिकल युक्त शाम्पू कंडिशनर साबळे यांचा सारखा सौंदर्यप्रसाधनांचा बेसुमार वापर हे होय. मित्रांनो बाह्य उपाय हे केवळ तात्पुरतेच असतात. समूळ उपायांसाठी तुम्हाला अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही पद्धतीने उपाय करायला हवेत. यासाठी आपल्या समस्या याचे मुख्य कारण शोधले पाहिजे.
आणि पहिला त्यावर उपाय केला पाहिजे. जसे केस पिकण्या मध्ये अनुवंशिकता, वाढते प्रदूषण, केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा वापर, मानसिक ताण तणाव, निरोगी केसांसाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचा शरीरामध्ये असणारा अभाव, दैनंदिन सवयी जसे रात्रीचे अकारण जागरण किंवा ओले केस विंचरणे इत्यादी, आहार-विहार सर्वच गोष्टी लक्षात घेऊन उपाय करायला पाहिजे.
समस्या एक असली तरी प्रत्येकाचे कारण मात्र वेगळे असू शकते. तुम्हाला कदाचित खोटे वाटेल परंतु अवेळी खाण्यापिण्याच्या सवयी आणि रात्रीचे अकारण केलेले जागरण तुमच्या त्वचेला आणि केसांना खूप नुकसान पोहोचवते. या दोन्ही सवयी बदलून बघा पन्नास टक्के समस्या तुमच्या येथेच संपतील. केस पिकला नंतर सुरु होतो तो केस काळे करण्यासाठी अनेक वेगळे केमिकलयुक्त रंग क्रीम लोशन यांसारखे अनेक वेगळे पर्यायी उपाय.
याचा तात्पुरता फरक पडतो देखील परंतु दुष्परिणाम जास्त होतात. केस पांढरे होत आहे असे दिसू लागताच केमिकलयुक्त प्रसाधनांचा वापर बंद करून त्वरित घरगुती उपाय करायला घ्या. याचा तुम्हाला लवकर फायदा होईल. आपल्या शरीरातील मेलॅनिन यामुळे केस काळे राहण्यास मदत होते. याचं प्रमाण कमी होऊन नवीन पेशी तयार होण्याचे थांबल्याने आपले केस पांढरे होऊ लागतात.
या उपायासाठी आपल्याला लागणार आहे कडीपत्ताची सावलीत सुकवलेली पाने. अशा चांगल्या प्रकारे सुकलेल्या कडीपत्त्याच्या पानांची बारीक पावडर बनवून घ्या. दुसरा घटक आहे आवळा पावडर. विटामिन सी ने परिपूर्ण असलेले गुण आपल्या केसांच्या तक्रारी दूर करण्यासाठी फायदा होतो. तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला लागणार आहे एक ताज लिंबू.
एक चमचा बारीक केलेली कढीपत्त्याची पावडर एका वाटीत घ्या. त्यामध्ये समप्रमाणात आवळा पावडर घाला. या दोन्ही पावडर चमचा च्या मदतीने व्यवस्थित मिक्स करा. यामध्ये एक लिंबू चिरून त्याचा रस घाला. लक्षात घ्या तुमचे केस जितके कमी अधिक प्रमाणात पांढरे किंवा मोठे असतील त्यानुसार यावर पायातील प्रमाण कमी अधिक करा. दुसरी गोष्ट यामध्ये आपण पाणी किंवा अन्य कोणतेही द्रव्य पदार्थ मिक्स करणार नाही त्यामुळे त्याच प्रमाणात तुम्हाला लिंबाचा रस देखील लागणार आहे.
हे तीनही घटक वाटीमध्ये एकत्र करून घ्या. साधारणपणे मेहंदी लावतो त्याप्रमाणे ही पेस्ट डोक्याला केसांना लावू शकतो त्या प्रमाणात बनवा. अनेक लोकांना लिंबू सूट होत नाही अशा तक्रारी असतात त्यांनी यामध्ये लिंबा ऐवजी दह्याचा वापर करावा. मिश्रण केसांना व्यवस्थित लावता येईल इतके पातळ घट्ट प्रमाण असावे. लावण्याआधी सुमारे तासभर आधी हे मिश्रण भिजत ठेवा. त्यानंतर केस व मूळावर लावून एक तास तसेच ठेवा.
केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन वेळेस हा प्रयोग तुम्ही करू शकता. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. टिप्स: १. केस धुताना अति गरम पाणी वापरू नका यामुळे केस गळती वाढते. २. केस विंचरण्यासाठी लागणारा कंगवा प्रत्येक व्यक्तीच्या वेगळा असावा. तसेच उशी, टॉवेल देखील. यांची वेळोवेळी स्वच्छता देखील करावी. ३. सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या. केस काळे राहण्यास मदत होईल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.