वाटीभर बेसन पिठाची जादू, ही एक वस्तू टाकून चेहऱ्याला लावा, गोरापान चेहरा बनवा.! एकदा नक्की ट्राय करा.!

आरोग्य

आपल्याला अचानक कुठेतरी जायचे असेल किंवा अचानक कोणती तरी पार्टी असेल आणि आपल्याला ती पार्टी अचानक कळली असेल आणि तेवढा वेळ नसेल त्याचा पार्लर कधी जायचे आणि फेशिअल करायचे किंवा पार्लर ला जाऊन रेडी होण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. अशावेळी आपल्याला हवे तसे सजता किंवा सावरता येत नाही. त्यामुळे आज आपण असा एक घरगुती फेसपॅक बद्दल जाणून घेणार आहोत, जो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक निखार देईल.

चेहरा उजळ बनवेल. चेहऱ्यावरील काळे डाग पिंपल्स देखील निघून जातील आणि कोणत्याही कार्यक्रम किंवा कुठेही जायचं असेल तरी मिनिटांमध्ये तुमचा चेहरा उजळ आणि सुंदर दिसायला लागेल. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे आणि त्याची पद्धत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे घ्यायचे आहे बेसन.

त्वचेचे सौंदर्य वाढविण्याकरिता बेसनाचा वापर करण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वीपासून चालत आली आहे. अगदी तान्ह्या बाळापासून ते नव्या नवरीपर्यंत सर्वांच्याच त्वचेची उत्तम काळजी घेण्यासाठी बेसन सहायक आहे. त्वचेवर उन्हामुळे आलेला काळसरपणा, मुरुमे पुटकुळ्या आणि त्वचेवरील मृत पेशी आणि त्वचेवरील लव हटविण्यासाठी बेसनाचा वापर करण्याची पद्धत आहे.

हे वाचा:   दवाखान्यात जाऊन सुद्धा बरा न होणारा खोकला आता काही मिनिटात बरा होईल.! खोकल्यावर याहून जालीम उपाय तुम्हाला शोधूनही सापडणार नाही.!

आताशा परदेशामध्ये ही, बेसनामुळे त्वचेला होणारे फायदे लक्षात घेता, बेसनाचा वापर केला जात आहे. बेसनामध्ये प्रथिने, अनसॅच्युरेटेड फॅटी असिड्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात. ज्या व्यक्तींना लो कार्ब डायट ठेवायचे आहे, त्यांनी आपल्या आहारामध्ये बेसनाचा समवेश करावा. त्यामुळे इथे आपल्याला बेसनाचा वापर करायचा आहे. सोबतच आपल्याला दोन ते तीन चमचे दुधाचा वापर करायचा आहे.

दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि प्रथिने आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. परंतु केवळ दूध पिणेच नव्हे तर त्वचेवर लावणे देखील अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. त्वचेला पोषण देण्याबरोबरच, चेहऱ्यावरील वयस्कपणाच्या खुणा दूर करण्यासाठी दूध उपयुक्त आहे.कच्चे दूध अत्यंत लाभदायक मानले गेले आहे.

एवढेच नाही तर कच्चे दूध तुमच्या चेहर्‍यावरील फ्री रॅडिकल्स दूर करून तुमच्या त्वचेवरील मृतपेशी दूर करते आणि तुमचा चेहरा अगदी उजळण्यासाठी मदत करत असते. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका वाटीमध्ये एक चमचा बेसन आणि एक चमचा दूध टाकून एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे म्हणजे बेसन आणि दूध एकमेकांमध्ये एकत्रितपणे मिक्स झाले पाहिजे.

हे वाचा:   घरी बनवा ही अशी क्रीम, चार चौघात उठून दिसायचे असेल तर आतापासूनच करा तयारी.! या फुलापासून फक्त पंधरा मिनिटात तयार होईल घरगुती क्रीम.!

छोटे छोटे बॉल्स तयार होऊ नयेत म्हणून वारंवार मिश्रण एकजीव करत राहायला हवे. या पेस्ट चा वापर तुम्ही तुमच्या हातापायांवर देखील करू शकता. सोबतच तुमच्या मानेवर किंवा कोपरावर लावायचा आहे ज्यामुळे त्वचेवरील काळपटपणा कायमचा निघून जाईल आणि तुमच्या चेहऱ्यावर एक निखार येण्यास मदत होईल. चेहऱ्यावरील पिंपल्स, छोटे-छोटे डाग निघून जातील. आपल्याला परत कधीही पिंपल्स देखील येणार नाही यापेक्षा वापर आठवडा मधून चार वेळा आपण करू शकतो.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.