मिरची विकत घेताना ही काळजी घ्या.! मिरची नेमकी कोणती विकत घ्यावी लाल की हिरवी.! आरोग्याच्या दृष्टीने कोणती मिरची सर्वात बेस्ट आहे.!

आरोग्य

मिरची नसेल तर कोणत्याही पदार्थाला चांगली चव येत नसते. कुठलाही पदार्थ मिरची शिवाय अधूरा आहे. आपण अनेक प्रकारचे पदार्थ बनवत असतो बऱ्याच पदार्थांमध्ये मिरचीचा उपयोग केला जात असतो. अनेकांना मिरची बाबतची एवढी माहिती नसते. कोणती मिरची उपयुक्त कोणत्या मिरचीचे सेवन करावे हिरव्या मिरचीचे की लाल मिरचीचे?

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला यासंदर्भात सविस्तर पणे माहिती सांगणार आहोत. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या उपलब्ध असतात. हिरवी मिरची व लाल मिरची परंतु कोणती मिरची सेवन करावी व कोणती करू नये हे आपल्याला माहिती नसते. हिरवी मिरची ही हाय ब्लड प्रेशर ला नियंत्रणात करण्यासाठी खूपच उपयुक्त मानली जाते.

ज्या लोकांना बी’पीची समस्या आहे अशा या लोकांनी आपल्या आहारामध्ये हिरव्या मिरचीचा समावेश करायला हवा. यामध्ये भरपूर असे फायबर असतात जे आपल्या पचन तंत्राला मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. हिरव्या मिरच्या हा विटामिन ई आणि विटामिन सी चा खूप चांगला स्रोत आहे. यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक तत्व असतात जे आपल्या हृदय संबंधीच्या समस्यांना दूर करत असतात.

हे वाचा:   आंधळे होण्याआधी नक्की वाचा.! मोबाईल बघून बघून डोळ्याचे वाटोळे झाले आहे.! त्यासाठी आजपासूनच व्हा सावध आणि करत जा हे एक काम.!

यामुळे आपले आरोग्य आणखी निरोगी राहत असतील. यामुळे हृदयासंबंधीचा त्रास देखील होत नाही. आणखी एक मिरची बाजारामध्ये उपलब्ध असते ती म्हणजे लाल मिरची. लाल मिरची ही आयरन चा खूप चांगला स्रोत मानला जाते. ही मिरची आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानली जाते. यामध्ये असलेले विटामिन हे शरीरामध्ये आयरण ला अवशोशित करण्याचे काम करत असते.

यामुळे शरीरामध्ये गर्मी निर्माण होत असते ही गर्मी शरीरामध्ये असलेल्या कॅलरीज बर्न करण्यासाठी उपयोगी ठरत असते. ज्या व्यक्तीला सर्दी झालेली आहे अशा व्यक्तीला लाल मिरची खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे नाक गळती थांबत असते. आपल्या आहारामध्ये मिरचीचा समावेश करावा. यामध्ये खूपच ताकदवान एंटीऑक्सीडेंट असतात जे धमन्यांमधून रक्त वाहण्यासाठी खूपच उपयुक्त ठरत असतात.

कोणत्या मिरचीचे सेवन करणे आहे फायदेशीर: हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्हीही उपयुक्त आहे. परंतु लाल मिरचीचा बनवलेल्या पावडरचे थोडे कमी सेवन करावे. यामुळे पचनासंबंधीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. ज्या लोकांना पचनाचा खूपच त्रास होतो अशा लोकांनी अशा लाल मिरचीच्या पावडर पासून नेहमी दूरच राहावे. हिरवी किंवा लाल मिरची तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता.

हे वाचा:   गोळ्या औषधांवर खर्च होणारे लाखो रुपये वाचतील.! जिथे सापडेल तिथून घरी घेऊन या.! याचे असे आरोग्याला फायदे बघून तुम्ही देखील थक्क व्हाल.!

बाजारामध्ये मिळणाऱ्या हिरव्या मिरच्या ह्या ताज्या असतात तसेच याचा उपयोग आपण आपल्या आहारात सहजपणे करू शकतो परंतु ज्या दुकानात मिळणाऱ्या वाळलेल्या लाल मिरच्या असतात त्या त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. भेसळयुक्त पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक असते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका. सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.